रविवार, २९ मे, २०११

मराठी प्रेम गिते...2>जीव दंगला,रंगला,गुंतला

जीव दंगला गुंगला रंगला असा 

स्वर - हरिहरन / श्रेया घोशाल 
चित्रपट - जोगवा 
संगीत - अजय - अतुल 


जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू 
जीव लागला लाभला 
ध्यास ह्यो तुझा 
गहिवरला श्वास तू 

पैलतीरा नेशील 
साथ मला देशील 
काळीज माझा तू 

सुख भरतीला आलं 
नभ धरतीला आलं 
पुनावाचा चांद तू 

जीव दंगला गुंगला रंगला असा 
पीरमाची आस तू 
जीव लागला लाभला 
ध्यास ह्यो तुझा 
गहिवरला श्वास तू 

चांद सुगंधा येईल 
रात उसासा देईल 
सारी धरती तुझी 
रुजाव्याची माती तू 

खुलं आभाळ ढगाळ 
त्याला रुढीचा ईटाळ 
माझ्या लाख सजणा 
हि काकाणाची तोड माळ तू 
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन 
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू 
जीव लागला लाभला 
ध्यास ह्यो तुझा 
गहिवरला श्वास तू 

मराठी प्रेमगिते...1>तुजवीण सख्या रे... ... ...

तुजवीण सख्या रे... ... ..
पावसाचे गुज...
पाखरांची कुजबूज...
का ऐकु येंत नाही...
सावलीची आलगुज...
रिता आहे वारा..
गंध वेडा तो नाही..
सुर तेच तरीही...
रास रंगला नाही...
आस तुझी ध्यास तुझा...
भेटशील ना रे...
स्वप्न राहील अपुरे तुजवीण सख्या रे... ... ...!

चारोळ्या भाग 2





तू एकदा मला भेटावीस...


शुक्रवार, २७ मे, २०११

उखाणे...

 काही दिवसांनी तिच्या आणि त्याच्या स्वप्नातील  संसार प्रत्येक्षात थाटला जातो...
आणि लग्नाच्या या समारंभात तिने त्याची अशी नावे घेतली...




मस्त वाजतो तबला,
मस्त वाजतो विना,
......रावांचे नाव घेते वन्स मोअर्र म्हणा.



माणसाला समाधान देते देवापुढची सांजवात,
 संसाराच्य सुखी वाटचाली करिता  _ _ _ _रावांच्य हाथी दिला हाथ..


नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा




 आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास

 आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा



अमुल्य आहेत तुम्हा सर्वाचे  आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठीशी  राहोत हिच माझि मनिषा

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

बारिक मणी घरभर पसरले,
-----रावान साठी माहेर विसरले

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...रावांची सुन
 

 मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, 
 ---रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

 केळीच पान पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना लई  भारी  वाटत




शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने


संथ संथ वाहे वारा,मंद मंद चाले गाडी,
देवा सुखी ठेव ------- ची जोडी


 रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


 श्रावणात पडतात सरीवर सरी
                                                              ----- रावांचे  नाव घेताना मी होते बावरी 

 

बुधवार, २५ मे, २०११

छान प्रेमकथा>खरे प्रेम..

खरे प्रेम ...
           एक चिमणी एका पांढऱ्या  गुलाबावर प्रेम करत असते.
एके दिवशी ती आपले प्रेम व्यक्त करते पण गुलाब मानतो कि जेव्हा तो स्वत लाल रंगाचा बनेल तेव्हा  तो चिमणीवर प्रेम करेल...
चिमणी आपले पंख कापून रक्त गुलाबावर सांडते.. गुलाब लाल बनतो पण आता चिमणी नसते...
हेच खरे प्रेम असते...

रविवार, २२ मे, २०११

चारोळ्या भाग 1

प्रस्तावना 
प्रेमात 'भेट' म्हणजे एक अविस्मरणीय क्षण...
चला तर मग वाचूया भेटीवर आधारित काही चारोळ्या,कविता...

 प्रत्येक वेळी...
प्रत्येक वेळी भेटीचे वाचन मीच मागायचे का?
पहा, कधीतरी स्वताहून देता आले तर!
पाखर सुद्धा भेटतात परस्परांना ओढीन,
बघ, त्यांच्या कडून काही शिकता आले तर!

तुला भेटून मी...
तुला भेटून मी
घरी जायला निघतो
जाताना शरीर घेतो
मन मात्र तिथेच ठेवतो... 
तू समोर असलीस कि...
तू समोर असलीस कि,
मला काहीच सुचत नाही,
तुझ्या शिवाय जगण्याची
  मला कल्पना सुद्धा रुचत नाही.. 
तुझा आणि माझा एकपणा...
तुझा आणि माझा एकपणा,
कसा कालवा शब्दांना,
दोन आपल्या भिन्न आकृती,
अंतकरणात एकच प्रीती.
भाषा प्रेमाची आज मला काळात आहे...
भाषा प्रेमाची आज मला काळात आहे.,
नकळत मन माझे तुझ्या कडे वळत आहे...
दूर असूनही मन मनाशी जुळत आहे,
आठवणीतील सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळत आहे..

जीवन जगण्याची आशा आहेस तू...
जीवन जगण्याची आशा आहेस तू,
माझ्या हृदयाची राणी आहेस तू,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहेस तू,
माझ्या विचारांपेक्ष्याही  सुंदर आहेस तू...
-हर्षु जाधव

दोन शब्द माझे...



दोन  शब्द  माझे
दोन शब्द  तुझे 
हृदयाला  स्पर्श करून गेले
त्यातूनच आपले नाते 
पक्के जडून गेले...


तूच आहेस रे राजा
सख्या माझ्या ह्रदयाचा,
मनातही केव्हाच बहरलाय
वसंत तुझ्याच प्रितीचा.



************************************


नाजूक माझ्या ह्रदयाला
नेहमीच तू फुलासारखं जपतोस,
तुझ्या प्रेमाच्या सहवासात
कोमेजलेल्या मनालाही फुलवतोस.



************************************


माझ्या आयुष्यातील तुझं अस्तित्व
नाही ठरवू शकत दुसरं कुणीही,
कारण आपल्यामधील प्रेमाचं नातं
नाही पोकळ इतकंही.



*****************************

तुझ्या प्रेमाची ओंझळ
सदैव सोबत राहू दे, 
माझ्या सहवासाच्या प्रकाशात
कीर्ती तुझी सर्वदूर पसरू दे.



*****************************


स्वप्न की सत्य
खरे की खोटे?
प्रेमात पडल्यावर
फायदे की तोटे?



********************


प्रेमात नसते जबरदस्ती
हवा मनापासून स्विकार,
शेवटपर्यंत करणार असाल
तरच दया तुम्ही होकार.



********************


एकटक तुझं ते पाहणं
माझ्यातल्या मी ला हरविणं,
शिरून तुझ्या बाहुपाशात
माझा मग जगालाच विसरणं.



*********************


आतुर आपण दोघं
एकमेकांच्या सहवासाठी,
गर्दीतही फिरतो असे
जणूकाही अनोळखीच सर्वांसाठी.



********************


हातात हात अन
धुंद पावसाची रात,
एकाच छत्रीत दोघं
करूया प्रेमाची बरसात.



*********************


मिठीत तुझ्या स्वर्ग माझा
डोळ्यांत पाहता प्रेमाचा झरा,
सहवास हवासा वाटे क्षणोक्षणी
स्पर्श सर्वांगावर मोरपिसापरी
उधळून टाकावेसे वाटते रे सख्या
अश्यावेळी स्वत:स तुझ्यावरी.

- संतोषी साळस्कर.

शनिवार, २१ मे, २०११

तिचे प्रेमपत्र 1

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.

   
सख्या हर्शल,      
          तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या २८ एप्रिलला आपल्या प्रेमाला चार वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या चार  वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '

- तुझी आणि तुझीच मनमोहिनी