गुरुवार, ३० जून, २०११

एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं...
 
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू, लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का? ........... बघत्यात

रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु
लुकलुक डोळं करुन भोळं बघत फुलपाखरु
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं

बेजार झाले सोडा सजना, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू...
 
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हात, धूके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दवांने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रित साजणी

जळी यौवनाचा डूले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाळी, नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे...
 गायक - अरुण दाते
दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे..

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे...

शुभ्रफुले वेचित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे

भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो, मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे...

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे...
 डाव मांडुन भांडून मोडू नको..
गीतकार- ना. घ. देशपांडे
 गायक - सुधीर फडके
                                                                                         संगीतकार-- राम फाटक
 
डाव मांडुन भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको ...

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
डाव मोडू नको ...

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको
डाव मोडू नको ...

काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
डाव मोडू नको ...

मंगळवार, २८ जून, २०११


प्रेमायण लेख 1




रविवार, १९ जून, २०११

Romantic प्रेमकविता


शनिवार, १८ जून, २०११

छान प्रेमकथा>तिचा प्रेमाचा गुलाब...

तिचा प्रेमाचा गुलाब...

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .............. 
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे .................... 
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते............... हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल......
- हर्शल जाधव 
संपर्क-9637351400

रविवार, १२ जून, २०११

सुपर प्रेम कविता >प्रेमपत्र...

प्रेम पत्र 
कवीवर्य- श्री हणमंत शिंदे .
संदेश पाठवणारा -आदर्श नगारे.  संपर्क :9637989762

सगळीच पत्र तिच्या पर्यंत पोहचतात असं नाही
आणि पोहोचलीच तरी पत्र सगळच बोलतात अस हि नाही
काही पत्र जिंकतात,जन्माला येवून सार्थ ठरतात
काही पत्र हरतात म्हणून का ती व्यर्थ जातात !!
तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच कि आणि 
तिने फाडलेल पत्र आपण पुन्हा पुन्हा पाहतोच कि...


ती अशी बसायची ,खळीखळीन हसायची 
साडी नेसून संमेलनात किती छान दिसायची 
कोणते बरे गाणे तिने संमेलनात गायलेलं 
आणि गाता गाता आख्या वर्गात फक्त माझ्या कडेच पाहिलेलं
वाटते ना सगळ  कसं काल घडल्या सारखं
वाटते ना पायावरती पत्र पडल्या सारखं
म्हणून पत्र लिहायचं पटेल किंव्हा फाटेल
                                              आठवणींच्या वृंदावनात निदान राधा तरी भेटेल.... 

शनिवार, ११ जून, २०११

तिची प्रेमपत्रे...,

प्रिय हर्षु...
              शाळेत ले ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची.


नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! . नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. शाळेचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते.

पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?

- तुझीच,

अनामिका

छान प्रेमकथा>असं असतं का प्रेम?

असं असतं का प्रेम?

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.


""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''

""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.''

""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''

""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''

""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?''

""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?''

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.''

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-

""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.''

यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं....

खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

छान प्रेमकथा >प्रेम करण्याचे कारण...

प्रेम करण्याचे कारण...
(एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे.)

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम
करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले
असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत
होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....

- मुन्ना बागुल
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक

शनिवार, ४ जून, २०११

सांग सांग भोलानाथ मन प्रेमात पडेल काय...

सांग सांग भोलानाथ मन प्रेमात पडेल काय...



शुक्रवार, ३ जून, २०११

प्रेमायण sms संदेश भाग १


खरच  तु  पण  ना,
अशी  कशी  वेड्यासारखी  वागतेस,
फोनवर  रोम्यानटिक  गप्पा  मारून,
भेटल्यावर  हवा -पाण्याबद्दलच  बोलतेस...
तुच  माझी 
रूपमती 
साऱ्या मैत्रीणीत 
तुच
सौंदर्यवती 
म्हणूनच केली मी 
तुझ्यावर प्रीती
कधी बनशील तु
माझी
सौभाग्यवती...


विसरून मला प्रेमात ,
प्रेम परक्याचे होऊ नकोस,
तु माझी आहेस माझीच राहा,
कुणाच्या बापाला भिऊ नकोस...



प्रेम कसे करावे 
याचा हि कुठेतरी क्लास असावा,
प्रेम कसे करावे 
याचा हि कुठेतरी क्लास असावा
आणि प्रेमात नापास होणार्यासाठी १७ नंबर चा फॉर्म असावा ...


प्रत्येक सहवासात आस तुझी,
माझ्या प्रश्न मध्ये उत्तर तुझी.
माझ्या आठवणीत  कधी येऊन बघ
कळेल माझ्या जीवनात काय जागा तुझी...


रोज भेटायला कारण लागत नाही,
भेट नाही म्हणून  अंतर वाढत नाही
सुखदुख वाटून घेयला  सांगायला लागत नाही
प्रेमाशिवाय या आयुष्याला  अर्थ लागत नाही...


नजरेला तुझ्या प्रेमाचा नकार नाही,
आता कोणाची प्रतीक्षा नाही,
चूप चूप आहे मी
हा माझा अंदाज आहे,
तु हे नको समजु कि माझा तुझ्यावर प्रेम नाही...


विश्वास ठेव माझ्या मैत्री वर 
मला कोणाचं मन दुखवायचे नाही
तु आणि तुझा स्वभाव मला आवडला
नाही तर मी कोणाशी मैत्री बनवत नाही...



माझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबात
फक्त तुझेच प्रतिबिंब  पाहीन 
कुणाची शप्पथ घेवू  सांग
आयुष्यात मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन...

वाटले  नव्हते
स्वप्नात   सुद्धा ,
जुळतील  तुझे  नि  माझे
ऋणानुबंध..
निभावू  शकू  आपण  हे..
प्रेमाचे  रेशमी  बंध..!

रातराणी  उमलावी  तशी  उमलतेस,
मनापासून  दरवळ्तेस  
खरे  सांगू  का  तुला ,
मला तु खूप खूप आवडतेस  !

देवाच्या
मंदिरात  मी 
एकच  प्रार्थना
करतो 
सुखी  ठेव  तिला 
जिच्यावर  मी
प्रेम  करतो.. 

कळत नकळत  कधी  जुळतात  नाती
सुवास  याचा  असा  जशी  पावसाळ्यातली  माती
ऋणानुबंध  म्हणावे   कि  रेशीमगाठी 
कोणी   नाही  कुणाचे  तरी  जगतो  एकमेकांसाठी... 

कोणी माझ्यावरहि  अस प्रेम करेल
माझ्यावर हि कोणी जीव लावेल
आयुष्य ओवाळून टाकीन तिच्या एका हस्यासाठी,
कोणी एकदा माझ्यावर विश्वास ठेवेल...


पावसाचे  थेंब  जमिनीवर  पडताच,
मातीचा  सुगंध  दरवळतो.
तुझी  आठवण  येताच  तुला  भेटण्यासाठी  जीव  माझा
हुरहुरतो...

तुझ्यावर  राग  येणं हा  तुझ्याशी  बोलण्याचा  एक  बहाणा  आहे...
तू  बोलायला  लागलीस  कि  तो  लगेच  जातो...
तसा  माझा  राग  शहाणा  आहे.... 


तुझ्यात नि माझ्यात खरेच कुठे दुरावा आहे
तुझ्यात नि माझ्यात खरेच कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे निघाली कि
उचकी इकडे पुरावा आहे...

अशांत  मनाचा
विश्वास  आहेस  तू ,
कित्येक  सवंगड्यात
खास  आहेस  तू ,
जिवंत  आहे  मी  कारण
श्वास  माझा  आहेस  तू ,
आभारी  आहे  मी  तुझा 
फक्त  माझी
आहेस  तू...

ती  कॉलेजात  दिसली कि 
कॉलेज कसे ''विधानसभे'' सारखे वाटते,
आणि तु माझ्या कडे एकदा हसलीस कि 
मला बिनविरोध ''आमदार'' झाल्यासारखे वाटते..

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलो आहे 
कि
मलाच मी सापडत नाही,
एकदा शोधावे म्हंटल 
तर 
तुझ्या शिवाय काहीच सापडत  नाही....


प्रेम इतके निरागस का असावे 
जे जोडीदाराला आपले जग समजते 
आणि 
इतके आंधळे का असते 
जे फुलाच्या वासावरून त्याला सुंदर ठरवते...