गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट...

 

एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या
दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन
तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ
कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी
रोज त्या दुदुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू शकला
नाही. त्याचं तेवढं धाडसंच झालं नाही.
एका महिन्यानंतर दुखणं बळावलं आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरचं त्याचं प्रेम
त्याच्या मनातच राहून गेलं.
बर्‍याच दिवस तो येत का नाही म्हणून सीडीच्या दुकानातली मुलगी एकदा त्याचा
पत्ता शोधत घरी पोहोचली. घरी त्याची आई होती. आईला तिने त्याच्याविषयी विचारलं.
त्या माऊलीच्या ओघळत्या आसवांनीच तिला सारं काही सांगितलं. त्याची आई तिला
त्याच्या खोलीत घेऊन गेली.
त्या खोलीत गेल्यानंतर तिनं पाहिलं. सगळ्या सीडी जशा नेल्या तशाच ठेवल्या
होत्या. न उघडता.
आता मात्र तिला रडू आवरेना. कारण माहितेय?
कारण तिनं त्याला लिहिलेली सगळी प्रेमपत्र त्या सीडीच्या पाकिटात तशीच राहून
गेली. त्यानं न वाचता. तीही त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करत होती. पण.....
*म्हणून कुणावर प्रेम करत असाल तर त्या** **प्रेमाला वेळीच अभिव्यक्त करा.
याबाबतीत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं एवढं नक्कीच** **लक्षात ठेवा.** *
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंडयासारखा फडकू नकोस.
*उधळून दे तूफान** **सगळं**,*
*काळजामध्ये** **साचलेलं**,*
*प्रेम कर** **भिल्लासारखं**,*
*बाणावरती खोचलेलं*
*मातीमध्ये** **उगवूनसुद्धा**,* 
*मेघापर्यंत पोहचलेलं.*

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

माझ्या चारोळ्या ...

माझ्या चारोळ्या
वाळवंटात हरवले
तरी जगण्याची जिद्द आहे 
कुठंच नसले म्हणून काय झाले 
माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे!
 
 
 
 
प्रेम खरे कि खोटं  हे,
कधीच कळलं  नाही मला,
पण ज्या वळणावर आणून सोडलेस,
आता अवघड जातंय परतणे मला..
 
 
 
त्याने मागितलेच नाही,
जे मी गमावत गेले..
त्याने गमावले जे माझ्यात,
ते मी मागत गेले.. 
 
 
 
 माझे मन माझ्यासोबत नाही,
हे मला कळलेच नाही,
ते केव्हाचं तुझंच झालंय,
ते तुला अजून उमगलंच नाही..
 
 
 
तू नसलास समोर जरी,
शब्द कानात कुजबुजतात,
दिला नसलास होकार तरी,
स्वप्ने मनात गजबजतात.
मला वाट पाहायला लावं,
आता हे ही मला चालेल,
पण मी वाट पाहतेय तुझी,
हे तू विसरून कसं चालेल..?
 
 
 
प्रेम कसे असावे,
निस्वार्थी  अव्यक्त,
काहीही  न बोलता व्हावे..
अर्थपूर्ण व्यक्त..

माझ्या चारोळ्या ...



आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...


ढगाळ आकाश अन..
गार वारा सुटलेला..
तुझ्या आठवणींचा मनात..
...पाऊस दाटलेला..

ढगाळलेल आकाश..
मला पाहून हसलं..
वारा गुदगुल्या करू लागला..
अन माझं मन फसलं..

आकाशातून हळूच एक थेंब..
माझ्या हातावर आला..
त्याचा तो स्पर्श तेव्हा..
तुझी आठवण देऊन गेला..

वारा खट्याळ वेड्यासारखा..
पावसा सोबत खेळू लागला..
तुझ्या आठवणीही मग..
मनात मला वेधू लागल्या..

हळूच तुझा आवाज..
काना मध्ये घुमू लागला..
तू जवळ असल्याच भास होऊन..
पाऊस जोरात कोसळू लागला..

माझ्या मनात तुझा अन तुझ्या मनात माझा..
हळुवार गारवा दाटत होता...
तेव्हाच आपल्या प्रीतीचा पहिला पाऊस...
आपले थेंब वाटत होता..

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

ती.....


 
ती..... 
           तिच्या नाराजीचं कारण समजलं असतं तर मी तिची समजूत काढली ही असती..पण ती आहे की कधीच रागाचे कारण सांगत नाही..सगळ काही मनात ठेवते ..तिची अपेक्षा असते की मी समजुन घ्यावे..पण मी काही कोणी जादुगार नाही की तिने न सांगता तिच्या मनातलं ओळखणारा..पण तिला ते पटत नाही...मी तिच्या साठी आणलेली फुले देखिल ती घेत नाही...तशीच रागवून निघून जाते..आणि मी मात्र तसाच हातातल्या फुलांन कढ़े बघत तिच्या रागाचे कारण शो...धत बसतो....फुले देखिल सुकून जातात ..पण तिच्या रागाचे कारण कळत नाही...ती तशीच २-३ दिवस बोलत नाही..मग पुन्हा परत पूर्वी सारखी बोलायला लगते...काहीच न झाल्या सारखी....खरच सांगतो अजुनही मला ती उमगली नाही..इतकी वर्षे झाली आमची ओळख होऊंन पण मला ती अजूनही एक कोडंच वाटते इतरांना वाटते तशी ..कधी ही न सुटणारं !!!!!!!!!

अशी आपली बायको असावी. हजार जणीत उठून दिसावी....

 
अशी आपली बायको असावी. हजार जणीत उठून दिसावी....
थोडीसुद्धा तिला मात्र त्याची मिजास नसावी..
अशी आपली बायको. भक्कम पगाराची कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र ती मला घरीच दिसावी....अशी आपली बायको चतुर शहाणी अभिमानी असावी 
नम्रपणे माझ्यापुढे मात्र मन तिची खाली असावी
अशी आपली बायको सभेत धीट कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र ती गरीब गाय असावी
अशी आपली बायको बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र तिला कधी आठवण नसावी
अशी आपली बायको प्रसन्न सदा हसतमुख असावी
माझ्या आक्र्स्तलीपनावर मात्र तिच्या भाळी आठी नसावी
अशी आपली बायको शांत गंभीर पोक्त असावी
माझ्या बालीशपनावर मात्र तिची काही प्रतिक्रिया नसावी
अशी आपली बायको व्यवहारी काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र तिची कधी टीका नसावी
अशी आपली बायको एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या धीसालपनाबद्दल मात्र तिची काही तक्रार नसावी
अशी आपली बायको सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र मुलाबाळांवर सावली नसावी
अशी आपली बायको असावी माझ्यापलीकडे तिची दृष्टी नसावी 
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र तिची कधी हरकत नसावी......

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

वयानुसार मुलाचे प्रेम...

♥ वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-
५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥ 
१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥ 

...१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥
 

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥ 


२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥ 
 


३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥ 


५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥



 ६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥