शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

…… पावसात ती …..

पाण्याने भिजलेली …
थंडी ने शहारलेली …
विजांच्या कडकडाटाने घाबरलेली …
पावसाच्या थेंबांनी नटलेली …
ओलाव्याने सजलेली …
छत्रीत लपलेली …
चिखलावर थोडीशी रागावलेली …
पण वार्याने सुखावलेली …
दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …
स्वतः ची स्वतःच सावरलेली …
खोटी खोटी रुसलेली …
थोडीशी लाजलेली …
माझ्याशी हसलेली …
जोराच्या पावसात ….
काळ्या ढगांच्या काळोखात … 
छत्र्यांच्या गर्दीत ….
खरंच ती … 
ती फार …. सुंदर दिसत होती …

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे

"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि
१ तास = ६० मिनिट
१ मिनिट = ६० सेकंद
पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि
१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you ♥

प्रेमाचे गुणधर्म...


प्रेमाचे गुणधर्म--
१) प्रेम हे रंगहीन किवा गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो .
२) खरे प्रेम माणसाला आनंदी किवा उत्साही बनवीते.
३) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही सुधा आहे .
४) प्रेम हे विनाशकाले विपरीत बुद्धि हि ठरू शकते..

सूत्र --
१) प्रेम + मनुष्य = स्वर्ग
२)मनुष्य + प्रेम + नकार (प्रेयसिचा , प्रेय्कराचा ) = आत्महत्या किवा निराशा (एकतर्फी)
३)मनुष्य - प्रेम = नर्क

प्रेमाचे उपयोग --
१)अन्नाची मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण प्रेमात मनुष्याची तहान-भूक हरपते.
२)प्रेमामुळे प्रेयसीचा पैसा वाचतो, तर प्रियकराचा कीसा रिकामा होतो .
३)प्रेमामुळे गिफ्टशॉप तूदुब चालतात, परिणामी अर्थे व्यवस्थेला चालना मिळते .
४) प्रेमामुळे लग्नाची मानसिक तयारी होते; कुणासोबत तरी करण्यासाठी.......

पहिल्या प्रेमाची आठवण....

पहिल्या प्रेमाची आठवण....

अजूनही आठवतोय मला तो पहिला दिवस...! ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो! तिला भेटण्याच्या अतुर्तेमध्ये मला त्या आदल्या रात्री झोप आली नाही कधी एकदाची ती रात्र संपते आणि सकाळ होते, आणि कधी एकदाचा मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, अघोळ केली..! फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण, स्वच असा ड्रेस मी घातलेला होता..! केस व्यवसित करून तयार झालो. आदल्या दिवशी मित्राकडून, आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी, माझ्या कपड्यावर ओतली. तेवढ्यातच आई ने आवाज दिला, नाश्ता तयार आहे खावून जा., आईला मला नाश्ता नको असे, बोलत मी खिशामध्ये हाथ घातला, बघतो तर काय माझाकडे, फक्त २ नच रुपये होते, मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी , ५०रुप्ये मागितले तर तिने नकार दिला, मी तसाच निराश होवून निघालो, जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील, एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले...
कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी, आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो. तिला भेटण्याचा एक एक क्षण, जवळ जवळ येत होता तस-तशी, माझा मनातली भीती वाढतच जात होती, पण आज मी निचय करूनच आलो होतो की, आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही. सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली, नि माझा समोर येवून उभी राहिली. मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो, तिने पण मला गुड मोर्निंग केले. तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले, नंतर मी तिला बोललो, मला तुला काही तरी सांगायचे आहे, ती लाजत लाजत बोली "बोल" मी डोळे मिटून धीर धरून तिला आय लव यु ...! म्हटलं. तसं तिने खाली वाकून सँडल, पकडणार एवढ्यातच मी तीचापासून, दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा, राहिलो पण ती सँडल ची पट्टी लावत, मला सेम टु यु...!!! म्हणाली.......

खरच पहिल्या प्रेमाचा सुंगंध जीवनात कधीच विसरता येत नहीं...

ब्रेक-अप नंतर काय ???..

ब्रेक-अप नंतर काय ???..

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका, मनातील न्यूनगंड आधी झटका..
* दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे, त्यावर आत्मपरिक्षण करा.
* अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते, अणि हीच वेळ असते जेव्हा मित्रांची खरी किम्मत ही जवळून कळते..
* तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून गेले तर छान.
* अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे..
* दर्दी गाणे ऐकत बसण्यात दुखी मंन शांत होत नाही, हे तर गोष्टी असतात ज्या छान वाटतात पण त्या पासून दूर राहण्याची सवय घाला..
* एकांत एकटे राहून मंन शान होते हा गैर समझ आहे तुमचा, एकटे राहून ते जुने क्षण मनाला छळत राहतात अजून काही नाही, एकटेपणा टाळा..
* शेवटचे एवढेच कि, तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये, हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा, ..

मित्रांनो प्रेम हे छान आणि घाण अशा एका नाण्याचे दोन बाजू आहे, ब्रेक-अप-अप नंतर जीवनाचा ब्रेक-अप होत नाही, अशे कितीतरी नाते, कार्य आणि जिम्मेदारी बाकी असतात त्यांच्या साठी जीवनाची पाली नवीन पद्धतीने खेळा आणि विजयी व्हा!
Remember: Dont Cry because its Over, Smile Coz it happened...

आणि त्याने डोंगराला पायर्‍या कोरल्या...

आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे.
रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.

दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.

शूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.


एके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.


त्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.....

खाली दिलेल्या लिंक वर त्यांचे वास्तविक चित्र आणि अजून माहिती पहा.....
http://www.asianoffbeat.com/default.asp?Display=1278


महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले...

महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले...

पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्यातच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतले. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांच्या प्रेमाची कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे.

इज्जत बेगला फिरण्याचा खूप शौक. त्याने आपल्या वडिलांची परवानगी घेऊन देश फिरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एके ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्व काही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव महिवाल पडले. महिवाल अतिशय सुंदर होता. महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.

पण सोहनीच्या आईला ही बाब कळली तेव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्यावरील प्रेमाखातीर जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात जाऊन सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न इतर कुणाशी तरी करून देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.

इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सोहनीला पाठवली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवालने साधूचा वेष धारण करून सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करून महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासंतास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकरातूर सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला आपल्या बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली. :( :(

सकाळी मच्छिमारांनी माशांसाठी जाळे टाकले, त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी व महिवालचे परस्परांना बाहूपाशांत घेतलेले मृतदेह मिळाले. गावकर्यांानी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी व मुस्लिम लोक मजार म्हणतात.

अर्थात असे असले तरी प्रेम हे प्रेमच असते त्याला धर्म, जातीचे बंधन नसते, हेच खरे.

म्हणुन ती पुढे गेली आहे...

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....
थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे...

तुझे आडनाव ....

मुलगा : तू सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आहेस..!
म्हणजे सुंदर आहेस, स्वभाव छान आहे...
बोलतेस सुद्धा खूप खूप छान...,
पण एकच गोष्ट मला तुझ्यातील बदलावीशी वाटते...

मुलगी : कोणती ???

मुलगा : तुझे आडनाव ....

मी नसेन तर...

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून बसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..

"मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?"
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील? कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील? कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील, समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल, ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?
कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर,
तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुन्दर धुनही बेकार वाटेल, पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील..
दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील, उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील, माझ्या आठवाने बेचैन होशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील,
गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील, मी नजरेस पडणार नाही,
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील कुठेतरी...
तू लाख स्वत:ला रमवशील, दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील, नवीन ना्त्यांना जोडशील....
पण खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"

हे ऐकून त्याचा डोळ्यात पाणी भरून आले, आणि त्याने जोराची मिठी मारली तिला,,
तो म्हणाला, "तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जनू मी शेवटचे श्वास मोजत होतो, तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू, एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरच हृदयापासून तू मला हवियेस,
आणि एक सांगू"
ती बोलली काय..
तो म्हणाला " Sorry, I Love you"

मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असते त्याला जपून ठेवा, छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चाताप बनु शकते..

तू मला भेटलीस कि...

तू मला भेटलीस कि...
माझा हात हातात घेतेस...
बोटांमधील रिकामी जागा...
अलगद भरून जाते...

खरं प्रेम म्हणजे...

खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे. खरं प्रेम
म्हणजे …
तू अणि मी, कायम जवळ असणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न
उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं...... ♥♥♥

सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो...

 
प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............ पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
 प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सि...गारेट, दारू, चीडचीडपणा ......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ..................
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ................ मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो) 
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण "सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो" हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!! 

"आठवण यायला पहिल्यांदा विसरावे लागते..."

 
प्रेयशी : दुर असलेल्या प्रियकराला " सांग ना तुला माझी आठवण येते." 
प्रियकर : खरं सांगू की खोटं बघ हा रागवणार नसशील तर सांगतो. 
प्रेयशी : नाही रागवणार 
प्रियकर : सांगू खरं सांगतो मला तुझी कधीच आठवण येत नाही.
प्रेयशी : (रडत रडत ) माझा मात्र इकडे तुझ्या आठवणिशिवाय जात नाही आणि तुला माझी आठवणच येत नाहि जा मला नाही बोलायच तुझ्याशी तु खरं प्रेमच करत नाहिस माझ्यावर तुझ दुसरच कोणावर प्रेम आहे जा माझ्य़ाशी बोलू नकोस. 
प्रियकर : झालं आता मी बोलू " अगं वेडी आठवण येण्यासाठी आगोदर त्या व्यक्तीला विसरावं लागत.. पण मी तुला कधी विसरतच नाही तर सांग बरं आठवण कशी येणार" 
सर्मपित सगळ्या REAL प्रेमविरांना.

माझे पहिले आणि शेवटचे प्रेम..

"जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल कि, " बाबा, तुमचे पहिले प्रेम कोण होत" ?
तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत, मला फक्त माझा हाथ वर करून बोटाने दाखवायचे आहे कि, "ती किचन मध्ये उभी आहेना तीच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे "

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

♥ "जरा ऐक ना, काहीसांगायचे आहे तुला....... ♥,
तुला भेटताना....... होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला,
तुला पाहताना.......... हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला,
तुझ्या बरोबर चालताना........... हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला,
तू सोबत असताना....... सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला,
तू नसताना........... तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला,
तुज्या बरोबर बोलताना......... होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा........ हे सांगायचे आहे तुला,
तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.........
प्रेमातील नाजूक भावना सांगायच्या आहेत तुला"

आहेस तु म्हणुन...


विचार करावा बोलण्याआधी...

किती प्रेम करतेस माझ्यावर..?
किती प्रेम करतेस माझ्यावर..?
ब~याच दिवसांनी भेटले होते काय बोलू काही कळत नव्हते..
त्याने विचारले किती प्रेम करतेस माझ्यावर..?
नाही रे सांगता येणार शब्द नाही तेवढे पुरेसे तू संग किती प्रेम करतोस माझ्यावर..
सागराची खोली कमी पडेल आकाश पालथे घातले तरी माझे प्रेम पुरून उरेल.
चालल्या होत्या गोष्टी नंतर फार त्याच्या मनात आला एक विचार
"ए सांग ना माझ काही उद्या बर वाईट झाल तर काय करशील.? तरीही माझ्या वर प्रेम करशील कि मला विसरून जाशील..?
तुला आनंद होईल कि रडत बसशील .?"
तिच्या मनात न जाणे काय आले.. थोडी थट्टा करूया म्हणून मनात आले
"मी ना मी ना! खूप आनंदी होईन मला खूप आनद होईल. सुटका होईल माझी मी सुखी होईन..."
तो पुढे काही नाही बोलला त्याने तो विषय तिथेच सोडला
दुसर्या दिवशी ना फोन ना sms आला,फक्त एक निरोप आला "तुझ्या सुखासाठी काहीही.."
जाता जाता एवढंच तो म्हणाला...
जाता जाता एवढंच तो म्हणाला...
सांगणे एवढेच कि "विचार करावा बोलण्याआधी" नंतर वेळ नाही मिळत चूक सुधारण्यासाठी

जन्मांतरीचे प्रेमतरंग ...!



माझ्या हरेक श्वासात
तुझा प्रिये ध्यास ,
माझ्या हरेक स्वप्नात
तुझ्या मिलनाचा भास !

माझ्या हरेक कामात
तुझाच ग सखे सहवास ,
माझ्या हरेक यशात
तुझ्या प्रेमाचा विश्वास !!

माझ्या हरेक हास्यात
प्रिये तुझेच मनतरंग ,
माझ्या हरेक जन्मात
जन्मांतरीचे जपलेले प्रेमतरंग ...!!

तू.......फक्त तू...

 
तप्त उन्हात मिळालेली सावली म्हणजे तू,
तहानलेल्या ओठांना मिळालेला पाण्याचा एक थेंब म्हणजे तू ,
जगण्यासाठी मिळालेला एक श्वास म्हणजे तू ,
दृष्टी नसलेल्या डोळ्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजे तू ,
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
वाट चुकली कि सरळ मार्गाने नेणारा तू ,
माझ्या पायात काटा रुतला तरी स्वताचे लपवून अश्रू पुसणारा तू ,
पावसात भिजताना छत्री नसताना डोक्यावर हाथ ठेवणारा तू ,
माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी अगदी विदुषक झालेला तू ,
अजून कसे सांगू कि माझ्यासाठी कोण आहेस तू ,
माझा अर्धवट शब्द पूर्ण करणारा तू,
मी काहीच न बोलता समजून जाणारा तू ,
माझ्यासाठीच जगणारा तू , माझ्याशिवाय काहीच न समजणारा तू ,
माझे सर्वस्व आहेस तू ......फक्त तू
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस 
तू.......फक्त तू...

तुझी वाट पाहतो तेंव्हा....

 
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
सांज वेळेची आठवण येते
तुझ्या पाउल खुणांची 
किती दाटण होते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
केवड्यांची त्या आठवण येते
मी आणलेल्या गजरयांची
परत एकदा साठवण होते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा
मनात मेघांची अडचण होते 
ओल्या चिंब पावसात मग 
मन माझे न्हाऊन घेते....
तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची ती साद येते 
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
जड माझी पापणी होते
तुझ्या संसारातल्या वसंतान 
थोडीशी ती हलकी होते... 
खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!!

भेट तुझी स्मरताना...

 
भेट तुझी स्मरताना
भेट तुझी स्मरताना तो क्षण हवासा वाटतो.
न कळत येणाऱ्या आठवणींना , हे हसू आवरेनासं होतं.
अबोल माझ्या ओठांना, तुझ्या ओठांनी चव दिली.
एकाच ठिकाणी तासंनतास बोलण्याची सवय लावली.
विषयाचं ताळ तंत्र दोघांनाही नाही.
काहीही बोलत असतो. जे दोघांनाही पटत नाही.
भेट तुझी स्मरताना
त्या आठवणीत रमून जावसं वाटतं
तासंन तास तुझ्या मिठीत स्वतःला जखडून घ्यावसं वाटतं.
चुंबनाच्या स्पर्शाने, तुला रोमांचित करावसं वाटतं.
अंग अंग शहारुन, तुला वेडां पिसं करावसं वाटतं.
प्रत्येक भेटीत तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
भरभरून मिळालं प्रेम, तरी ते कमीच वाटतं.
भूक माझी भरपूर आहे असं नेहमी तुला वाटतं.
भेट तुझी स्मरताना
नव्याने भेटण्याची इच्छा होते.
तुझ्या प्रेमाची जादू
मला वेड पिस करते.
निरागस तुझं हास्यं, एकटक पहावसं वाटतं
भेट तुझी स्मरताना
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.
कुणाचीही नजर न लागता
तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
शेवटचा श्वासापर्यंत तुझ्यावर फक्त तुझ्यावरच 
भरभरून प्रेम करावसं वाटतं....

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तुझ्या हसण्याच गंध

माझ्या गाली यावा,

तुला फुलवेल तो कुन्द गारवा

मलाही छेडावा,

तुझे असावे झुलणे

सदा सौख्यासंगे

तुला दुखवेल असा शब्द

माझ्या ओठी न यावा

प्रेमात पडलं की सारेच जण...


प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात... c

देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "


एक छोटीसी प्रेमकहाणी

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत....