सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत..

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत.. 
 
गीतकार
- आरती प्रभू
गायक
- लता मंगेशकर
संगीतकार
- पं. हृदयनाथ मंगेशकर
नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी..

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी..
 
 
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची

तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची
गीतकार
आरती प्रभू
गायक
पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीतकार
पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट
निवडुंग

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची...

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची...
 
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची

घन ओथंबून येती...

घन ओथंबून येती...
घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

मधु इथे अन चंद्र तिथे...

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे...

 
कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा 
... रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर 
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

सुंदर ते रूप ......

 
सुंदर ते रूप ......
सुंदर ते रूप तुझे मनोहर 
नाही दिसे परी रुतले मनात........... 

काय वर्णू ख्याती बोलण्याची 
काय सांगू मी चाल हरिणीची 
गाली खळी फुलते गुलाबाची 
सुंदर ते रूप .......

थोडसं लाजणे,थोडसं रागवणे
तरीही पुन्हा वळून तेच पाहणे 
अशी माझीच तू सुंदरी सखे 
सुंदर ते रूप.......

काय तुझा तो हळवा अबोला
काय तुझा तो लटका रुसवा
मनी नसे कधीही तो दुरावा 
सुंदर ते रूप............

हा दिखावा दाखवणे मजला 
 तुझा हा नुसताच ग बहाणा 
ओळखून आहे सखे तुजला 
सुंदर ते रूप...........

नको दूर सारू आज मजला 
साथ ना कुणाची एकट्याला 
नको फेकू काट्यांत जीवाला 
सुंदर ते रूप...............

तुझाच आहे ना मी या समया 
प्रिये सांग ना एकदा तू मजला 
साक्ष ठेवून स्वतःच्या मनाला 
सुंदर ते रूप.............

नको दाखवू मनीच्या भावना 
तरीही मी जानिल्या साऱ्या
केव्हाच पहिल्या मनी माझ्या 
सुंदर ते रूप................

वर वरले सर्व मज समजले 
अंतरी काय हे मी जाणिले 
नको समजावू शब्दात आज हे 
सुंदर ते रूप....................

वाट मी पाहीन त्याच क्षणाची 
या जन्मी मज जमले जर नाही 
तर पुढला जन्म घेईन तुजसाठी 
सुंदर ते रूप....................

रुक्मिणीच्या एका तुलसीपत्राने 
श्रीकृष्ण मनोमन आनंदे हसले 
नको स्वार्थ, फ़क़्त ते "प्रेम"जगी असुदे  
सुंदर ते रूप.

ती बघते तेव्हा..!






 
ती बघते तेव्हा..!
.
ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!" 
... 

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे 


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो 
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो 


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते 

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो 
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो 

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो  
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !

मिलन ...

 
 मिलन 

मनातल्या त्या हूर हुरीला, 
किती थांबवायचं ग..

मिलनाच्या त्या उत्कटतेला, 
किती लांबवायच ग.....

  
दररोज उद्या च्या आशेवर, 
किती जगायचं ग..


हातात रोज फोटो घेवून तुझा, 
किती पाहायचं ग ..


मनीच्या भावनांना काव्यात, 
किती गोवायचं ग ..


तुला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्यांना,
किती विचारायचं ग ..


तुझ्या घराकडे जाणाऱ्या वाटेला,  
किती बघायचं ग...

नजर..

 
नजर..
ती नजर, ती नजर, वेड जीवाला लावते
का कशी, कुठेही कधीही, भुरळ मनाला पाडते
प्रेम इथे रुजतंय, प्रेम इथे रुजतंय... 

न बोलता, न हसता, ती अशी बघते
पापण्या झुकलेल्या, अशी उचलते
धस्स मनी होतंय, धस्स मनी होतंय

ती जेव्हा हसते, अशी बघते, मन विरघळते
क्षण साठवते, सतत आठवते, स्वतःवरतीच खुश होते
मन रिमझिम भिजतंय, मन रिमझिम भिजतंय

नजर झुकवते, खळी गाली पडते, ती अशी लाजते
ती बोलली नाही जरी, नजरच सांगते 
तिचही मन बसतंय, तिचही मन बसतंय...

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

अविस्मरणीय संध्याकाळ........

 अविस्मरणीय संध्याकाळ........



"अरे .... अमित एक सांगू का?" हसू नकोस हा..

मी हसत हसत म्हणालो "हा सांग... नाही हसत.."

"अरे! काल कि नाही तू माझ्या स्वप्नात आला होतास..."

मी .. "हो का ! ....."मग कायं केलं मी येऊन हां..हां ."?

डोळ्यात लाजरेपणा दिसला .. "छे! पुरे आता तुझा चावटपणा.. तू फक्त आला होतास आणि मग गेलास..

" ऑय्येंग ! मी आलो... नि गेलो!! .. असं होऊच शकत नाही ... मी आलो तर नकीच काहीतरी romantic करून गेलो असेन."

“हाहाहा “

"हसतेस काय? .. खरचं.. !"

ती - "अरे वेडू मग सांग न तूच तू काय केलंस ते.."

असं होय मग ऐकच..

हो ऐकतेय .. व्हा सुरु..

थांब मीच सांगतो मी काय केल ते ..



शांत संध्याकाळ झाली होती.. थंड वारा सुटला होता... सगळं कसं शांत...निःशब्द.. कदाचित ती संध्याकाळ आपलीच वाट पाहत होती .. आपण भेटण्याची ..मी आलो .. तुझ्या जवळ .. तुझं ते स्मितहास्य...लुकलुकणारे डोळे.. थरथरणारे ओठ.. आणि थोडीशी कुडकुडणारी तू... तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहातच राहिलो .. बराच वेळ मी हरवूनच गेलो होतो.. तुझ्या डोळ्यात ... आपण बसलेल्या झाडाखाली.. पानांची सळसळ कानावर ऐकू पडत होती..



तुझा हात हातात घेतला... तु ही तो घट्ट धरलास मी तुला कधीच न सोडून जाण्यासाठी ...



तू मधेच हसायला लागलीस.. माझं तसं रूप पाहून.. आणि नकळत म्हणालीस...

"असं काय रे बघतोस..? आज मी काय वेगळी दिसते आहे का? "



मी म्हणालो - "तू रोज वेगळी दिसतेस मला.. डोळेभरून पाहतच राहवसं वाटत "



तू थोडंस चिडून – “ पुरे नको करू बनवाबनवी.. !”



मी हलकेच तुझ्या केसातून हात फिरवला.. तु ही बेधुंद होऊन डोळे मिटून घेतलेस..नंतर माझे हात तुझ्या गाली लावून...बराच वेळ तू माझ्यकडे पहात राहिलीस.. जवळ आलो तुझ्या मी..खूप.. एकमेकांचे श्वास ऐकू यायला लागले..होते ..हृदयाची धडधड हळू हळू वाढत होती .. हाताचा घट्टपणा अजून घट्ट होत चालला होता...त्यात थंड वार्याची एक झुळूक येऊन हळूच तुझे केस माझ्या चेहऱ्यावर उडवून गेली .... आणि नकळत माझे डोळे मिटून गेले....



ऐकता ऐकता .. ती हरवून गेली.. नि मधेच उदास स्वरात म्हणाली..



“अमित! बरं झालं हा ...हे स्वप्नच होतं..ते ”



माझा चेहरा लगेच पडला... म्हणजे.. ती खरच आपल्यावर प्रेम नाही करत .. असं वाटलं.. मी काही म्हणायच्या आत तिने सारं ओळखलं होतं



"अमित आय luv u रे..... किती छान बोलतोस रे तू ?... खरंच अस घडेल का रे कधी? ... स्वप्नात नाही तर सत्यात तरी कधी?



तू माझं होशील का ..?"



मी - "मी तुझाच आहे गं.." फक्त तुला ते उशिरा कळतंय ...



तिच्या स्वप्नात येऊन मी सर्वस्वी तिचा झालो.. प्रत्यक्षात तिचा होण्याआधी … भावनेनी व्याकूळ दोघे..एकमेकांच्या घट्ट मिठीत अडकलो..अन अशी एक संध्याकाळ अविस्मरणीय ठरली..

तू ..... माझ्यासाठी...


प्रियकर :- तुझे सर्वात आवडते मराठी अक्षर कोणते ?
प्रेयसी :- तुझे नांव विशाल आहे म्हणून माझे आवडते अक्षर "व" आहे .....आणि तुझे ?
प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर म्हणजे "ल" आहे.
प्रेयसी :- पण माझे नांव तर "ल" वरून नाही सुरु होत ....... कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;) 
... प्रियकर :- कारण ...
ल ......... लाल रंगा साठी
लाल रंग ......... रक्ता साठी
रक्त .............. हृदयासाठी
हृदय .............. प्रेमासाठी
प्रेम ...... तुझ्यासाठी 
तू ............... माझ्यासाठी" ♥ ♥ ♥

पुरावा मिळाला...

♥ ♥ ♥ त्या संध्याकाळी अचानक तू माझ्या समोर आलीस, ..... मला असे वाटते कि त्यावेळी आकाशातील सारे तारे जणू आपल्या भेटीची वाटच बघत लटकले होते ............ ♥ कारण,"ज्या क्षणी तुला मी पाहिले त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तेव्हड्यात तिकडे तो तारा सुद्धा गळून पडला ....... आणि "आपण दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत" ह्याचा आपल्याला पुरावा मिळाला " ♥ ♥ ♥

एक एक क्षण बहुमोल बनवितोस...

"कधी भांडतोस तर कधी माझ्यासाठी प्रार्थना करतोस 
कधी Good Night म्हणतोस तर कधी झोपेतून उठवितोस
पण जेव्हा जेव्हा माझ्या साठी कविता लिहितोस 
माझ्या आयुष्यातील एक एक क्षण बहुमोल बनवितोस"  ... ♥ ♥ ♥ 
" ♥ You made my life Precious ........ I Love You So Much ♥ "


"आपण भेटत राहिलो तरच जगू"...

 
♥ "नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू" .......... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू" ♥

खुप छान असा रंग...

 "ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान असे रंगविले आहे,.....मी देवाचा खुप खुप आभारी आहे, कारण माझे आयुष्य रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे"

आयुष्यातील सारे रंग तुझ्यातच आहेत ♥

♥ एक स्मितहास्य ♥
तुझ्या गालाला लाल रंग देते
तुझ्या दातांना पांढरा रंग देते
तुझ्या ओठांना गुलाबी रंग देते
तुझ्या डोळ्यांना चंदेरी रंग देते
म्हणून नेहमी हसत रहा .............. आयुष्यातील सारे रंग तुझ्यातच आहेत ♥

इतके सुंदर बनविण्याची ?

 "इच्छा आहे प्रिये तुला मिळवण्याची 
बाकी कसलीच आशा नाही ह्या प्रियकराची 
तक्रार माझ्याकडे नाही देवाकडे कर  
काय जरुरत होती तुला इतके सुंदर बनविण्याची ??" ♥ ~~~ ♥

तू आणि तुझं सर्व विश्व......


तू आणि तुझं सर्व विश्व....
तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये 
... मी स्वतःला सामावून घेतल होतं
तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला 
मी अंतर्मनाने भुलली होती ...

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

सुपर प्रेम कविता..

भेट तुझी माझी...


"प्रपोज केल्यानंतर " मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे"मिळू शकतात त्याबद्दल काही....

 
"प्रपोज केल्यानंतर " मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे"मिळू शकतात त्याबद्दल
काही.... __________ __________ ____________________ __________ __________ ___
१. नाही SSSSSSS 
२. शी.........!!!!!! किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?... 
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच... नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] मित्र मानते ...
. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
. प्लीज, माझा असल्या"फालतू गोष्टींवर" विश्वासनाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय'महत्त्वाचे आहेत....
. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हेकदाचित "आकर्षण" असावे ...
. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी"बांधली होती !!!!
. माझी अशा गोष्टींसाठ ी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख माणसा..... .....,एवढी छोटीशी आणि महत्त्वाची गोष्टसांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४."आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानतनाही ना !!! ] 
१६. होय, मला पण तू आवडतोस ,पण तूमाझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली 
[ म्हणजे दुसरे कोणते तरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता .... 
१९. नालायका , तुझी हिंम्मतकशी झाली मला असेविचारायची ?" 
[ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ... 
तो :नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....] 
ती : ७ जन्म ....[ यानंतर मुलगा बेशुद्ध ...] 
२१. नीच माणसा..... ................तुझी हिंम्मतकशी झाली मला असे विचारायची ?"
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावरप्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हाहा हाही ही ...ही ही ही ... ही ही ही ही 
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतूगोष्टीत गुंतण्याचा विचारनाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकशील ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा....
२८. मी तुझ्याबद्द ल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावूनसांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपनाच्या" मागे होतास , तिने कायथप्पड वगैरे मारली का ? 
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक,माझी जाण्याची वेळ झाली आहे..." 
३४. कित्तीSSSSछान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पण फुल्लआहे ... 
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वाटतयं कदाचित मी"एंगेज" असेन ...
३९. माझ्याकडे तुझ्यापेक् षा जास्त चांगले "ऑप्शन आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्द ल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतरती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंड ला" कळले तर तुला त्रास होईलकारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोसम्हणून मग ..... 
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणारनाही .........
४४. नाईस जोक ...
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्ष ा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं .....
४७. "काय पाहिलसं माझ्यात?????"
तुम्हीही पहा,  कदाचिततुम्हाला मिळालेली(मुलांच ्या बाबतीत)किंवा तुम्ही कोणलातरी दिलेली (मुलींच्या बाबतीत) उत्तरे पण तुम्हाला ह्यातच सापडतील... .................... ..... 
ह्यावर एक नजर टाकून तर बघा आणि पहा भूतकाळ समोर येऊन उभा राहतो की नाही...... .......

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

मिलनाची रात

मिलनाची रात

ठरवले नव्हते काही
कसे अचानकच हे घडले
अबोल्याने माझ्या तुला
अजूनच जवळ आणले.

होता तुझा सर्वांगावर स्पर्श
राग माझा वितळू लागला,
बाहुपाशात मग तुझ्याच
स्वत:ला हरवू लागला.

सुरु केलेस तुझे चाळे
मन माझे भटकवलेस,
भिडवून देहाला देह
कौमार्य कायमचे मिटवलेस.

प्रेमाच्या वर्षावात जणू
दोघंही न्हाहून निघालो,
चरणसीमा गाठताच
पुन्हा एकमेकांना बिलगलो.

तू अन मी पण तेव्हाच
कायमचे गळून पडले,
आपण हेच आता खूप
जवळचे वाटू लागले.

दूर कुठेतरी

दूर कुठेतरी

दूर कुठेतरी
शांत समुद्रकिनारी ...
कुशीत तुझ्या मी
अन गुंफलेले हातात हात...
थोडेसं लाटांसोबत अन
थोडेसं एकमेकांसोबत खेळून ...
मावळत्या सूर्याच्या साक्षीने ...
एकमेकांकडे पाहत
सारया जगाला आज विसरून जावू ...
मिठीत एकमेकांच्या ...
चल ना रे सख्या
आज आपण विरघळून जावू ...

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

तेव्हा मी चंद्रालाच विसरतो...

 
 ♥ "मुलगा व मुलगी आरशा समोर उभे असतात,
मुलगा :- काय दिसत आहे ?
मुलगी :- माझे राहिलेले आयुष्य !! ♥ ♥ ♥ 
♥ "आयुष्याची मजा छोट्या छोट्या क्षणांमध्ये - Keep loving & living the life truly" ♥



"जेव्हा मी चंद्राला पाहतो, तेव्हा मला तुझा चेहरा आठवतो 
पण जेव्हा मी तुझा चेहरा पाहतो, तेव्हा मी चंद्रालाच विसरतो"

माझा दिवाळी-दसरा..

 
"तूच माझ्या जीवनाचा आसरा 
नको हवा मला पसारा दुसरा 
ज्या ज्या क्षणी बघतो तुझा चेहरा हसरा  
त्या त्या क्षणी साजरा होतो माझा दिवाळी-दसरा" ♥ ♥ ♥

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

एक चिंब सर बनून येशील???

 
माझया डोळ्यांतल्या स्वप्नांना..
तुझ्या पापण्यांवर सजवशील का?
विखुरलेल्या 
अपेक्षांची धुळ गोळा करुन ..माझी ओंजळ भरशील का?
कुठेतरी दूर पाऊलवाटेवर ..
मला एक साद देशील?
अंधारल्या राती..
माझ्या हाती तुझा हात देशील??
तेज माझ्या डोळ्यांतले ..
विझत जात असताना..
तू..
प्रकाश होऊन येशील?
आकाशात भरारी घेताना,
जर कधी थकले,
माझ्या पंखांना ..पुन्हा उडण्याचं बळं देशील??
जर आलेच अश्रुंचे पूर कधी..
तर त्यांना स्वतःमध्ये सामावून घेणारी.. 
एक चिंब सर बनून येशील???

वेड्या, खूप प्रेम आहे माझे तुझ्या वर ...

 
प्रपोज
एकटीच मला ती दिसली होती
उनाड पावसात भिजली होती
मी हि भिजत होतो
ती बघेल म्हणून बघत होतो
तिने पहिले अन विचारले
कारण मला भिजण्याचं
मी हि विचारलं कारण तिचं
एकटी बाहेर पडण्याचं
असंच भिजावं वाटतंय
आभाळ फुटावं असं वाटतंय
मला म्हणाली, चल भिजूया
बघ, पावसाची सर आली
तिच्या बरोबर भिजण्याची
खरच इच्च्या झाली
तिचं अल्लड धावणं
पावसासारखं
मातीत खेळणाऱ्या
पोरानं सारखं
वाकलेल्या झाडाची फांदी
तिने हळूच धरली
शुभ्र मोगर्यांच्या फुलांनी ओंजळ
भरली
किती छान फुले आहेत या
झाडाला
मी चरकलो,
कशी येतील मोगऱ्याची फुले
कडू निम्बाला
तिला समजले हा प्रयत्न
माझाच होता
पुढच्याच क्षणी तीचा
हात माझ्या हातात होता
म्हणाली,
मनात होतं, मग एवढा उशीर का?
मला कधीच कळलंय अन तू एवढा बधीर का?
वेड्या, खूप प्रेम आहे माझे तुझ्या वर 
♥ ♥ ♥, तुझ्या वेडेपणावर!

नाही तर पश्याताप...

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

कॉलेजला असताना...

कॉलेजला असताना,
पावसात भिजायला मज्जा यायची,
वर्गात पण माझी ओलीचिंब एन्ट्री व्हायची,
ते बघून ती पण थोडी लाजायची,

... ... मला पाहून ती ही जरा पावसात भिजायची,
हलकेच रुमाल चेहऱ्यावरून फिरवायची,
नाक मुरडून तेव्हा रुसलेली असायची,
विचारेल कधी मी तिला म्हणून रुसायची,

पाऊस फक्त तिच्यासाठी बहाणा असायचा,
मी तिला बघावं म्हणून इशारा असायचा..

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं...

 
प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,
... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,
व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,
तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,
जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं
प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं, 
समाधान देणार एक सुख भेटलं...

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

मी परदेशी चालले आहे...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मरतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...

आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर...

प्रिय सुनिता,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
बंड्या

एखादं रोपटं लावा....

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो" पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार" त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स" असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण..

पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू
कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही
विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.

खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी
त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं
चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे. एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन
ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला
सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्‌
अर्ध्या तासात माघारी फिरलो..

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या
शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो
अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह स्टोरी" माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही.
खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.'
writer: Amol Kalshett

वेड मात्र तुज़े आहे ...

वेड मात्र तुज़े आहे .......................
ज़ोप मात्र माज़ि असली तरी
स्वप्न मात्र तुज़ेच आहेत
शब्द माज़े असतील तरी
सामर्थ्य मात्र तुज़ेच आहे
सूर माज़े असतील तरी
गीत मात्र तुज़े आहे
प्राण मज़ा असला तरी
श्वास मात्र तुज़ा आहे
प्रेम माज़े असले तरी
सुगंध मात्र तुज़ा आहे
वेडा मे असलो तरी
वेड मात्र तुज़े आहे ......

तु बोलली नाहीस तर....

तु बोलली नाहीस तर
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
तुझा शोध घेत माझ्या नजरा दुरवर जातात, आणि मगं
तुझ्या शोधात त्यासुद्धा भरकटुन जातात.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
सुख सुद्धा दु:खासारखे होते, आणि मगं
दु:ख तर अजुन जिव घेते.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
माझे डोळे अश्रुनी भिजतात, आणि मगं
अश्रुंचे थेंब सुद्धा तुझ्या बोलण्याची वाट पाहत डोळ्यात उभे असतात.
तुझ्या न बोलण्याने मग ते सुद्धा डोळ्यातुन गळुन पडतात.
तु जरी बोलली नाहिस तरि,
माझे मन नेहमी खंबीरपणे बोलत असते-
तु बोलशील, तु बोलशील, तु बोलशील....
तु जरी बोलली नाहिस तरि,
तुझ्या प्रत्येक जुन्या आठवणींशी बोलत असतो.
मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट पहात असतो.
तु खरंच बोलशील ना????

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का....


आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का

थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का

प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का

आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का...

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

तू गेल्यापासून आपल्या अंगणात...


तू गेल्यापासून आपल्या अंगणात...
पहिल्यासारखा मुसळधार ..
पाऊस नाही ग कोसळत ..!

कारण ..
त्याला हि समजलेय कि ..
तू नाहीयेस आता या घरात ..
पाहिलं कसं तू घरात ..
यायच्या अगोदर ..
तो धुंवाधार कोसळायचा ..
आणि
तुला चिंब चिंब भिजवायचा ..

अगदी मनसोक्त ....!
आता तो येतो फक्त ..
काळेभोर ढग आणि ..
विजांचा कडकडाट घेऊन ..
अगदी रागावून ..
बहुतेक ..तुलाच हाक मारत असावा ..!
माझ्यासारखाच त्यालाही ....

तुझा विरह सहन होत नाही म्हणून ..!

कदाचित ..माझ्या इतकंच तुझ्यावर
त्या पावसाचं देखील प्रेम होतं...
हे आजकाल मला प्रत्येक ..
पावसाळ्यात पटायला लागलंय ..!

रात्री उशिरा पर्यंत काम करायला फार आवडायचं....

पूजा ने तिचा email open केला...
hi पूजा.. दररोज रात्री इतक्या उशिरा पर्यंत का काम करत असतेस??
तुला मित्र नाहीत काय ग??
तू इतक्या रात्री पर्यनात काम नको करत जावूस...

आभारी आहे विनीत
--------------------------
-----------------------------------------------------------
हे वाचल्या नंतर पूजा जाम रागावली. काही पण काय म्हणतo mail delete केला...
क|माल निघून गेली...त्या रात्री पासून रोज तिला त्याचा email id वरून email येवू लागले..
आणि ती वाचून delete करायची...

-------------------------------------------------------------------------------------------------
एका रात्री mail आला with subject line "प्रिये "
त्यामुळे पूजा ने email लगेच open केला...
प्रिये आज तू फारच छान दिसत आहेस... लाल साडी मध्ये...
मला माहित आहे तू माझे emails वाहन बंद केला आहेस...
म्हणून आज मी काही advice देता नाही...
पण माझा तुझ्या वर प्रेम जडलाय.. आणि हे मना पासून आहे...
मला खात्री आहे तू ह माझ्या प्रेमात नक्की पडशील....
तुझा प्रियकर विनीत
---------------------------------------------------------------------------------------------------
हा mail वाचल्या नंतर पूजा shock झाली..
ती म्हटली ह्याला कसं कळाल कि मी ह्या रंगाची साडी घातली आहे...
ज्याला ती कधी भेटली नाही.. बघितलं नाही तो ..
त्याला आपला id कुठून भेटला ह्याचा विचार करू लागली...
तिनी मग reply केला...
hi विनीत
मला तुझा carrier खराब नाही करायचा आहे...
तू मला emails send कारण बंद कर...
नाहीतर मी तुला block करेन...
.
पूजा..
--------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यांनतर तिला काही दिवस emails आले नाही...
पूजा हि विचार करायची mail नाही आला आज... :(
अचानक ५ दिवसांनी रात्री mail आला...

प्रिये
मी काही गेले दिवस busy होतो...
मी तुला खूप miss केला तू मला केलंस कि नाही..
तुझा block केर्ण्यानी माझा प्रेम नाही कमी होणार तुझ्या वरचा...
.विनीत
पूजा गालातल्या गालात हसली... आणि कानाची बट बोटात पकडून खेलायली लागली
तेवढ्यात लगेच एका mail आला...

प्रिये
केस्नाशी खेळण बंद कर...
.vinit
---------------------------------------------------------------------------------------------------------
आता मात्र पूजा ला धक्काह बसला... ह्याला हे कसं कळाल...
तिनी आजूबाजूला पाहिलं कोणी नव्हत.. मग ह्याला कसं कळाल...
लगेच एका mail आला...

पूजे
मला शोधात आहेस...
तू पण माझ्या प्रेमात आहेस न...
तुझा प्रियकर
विनीत...

आता पूजा mail करते त्याला
"तू कुठ आहेस?"
.
reply येतो
"आग तुझ्या समोर... तुला जाणवत नाही का ग....'
-----------------------------------------------------------------------
मग पूजा ने लगेच comp बंद केला आणि घरी गेली...
दुसर्या दिवशी तिने boss ला सगळा प्रकार सांगितला...
आणि म्हटली विनीत नावाच्या मुलाकडून mail येत आहेत...
boss म्हणाला खरच विनीत नवा आहे...??
ती म्हणाली हो...
तेव्हा boss म्हणाला "आग तो गेल्या वर्षी चा वारला आहे...??'
पूजाचा विश्वास चा बसला नाही...
तिने सगळे id check केले आणि लक्षात आला सध्या ह्या नावाचा कंपनी त कोणी नाही..
-------------------------------------------------------------------------------------------
नंतर तिने परत mail ओपेन केला...
दोन mail होते..
पहिला
प्रिये
आग तू मला नको घाबरू...
अशी पळत घरी जाशील तर मग मला तुझ्या शी बोलता येणार नाही...
.
दुसरा
प्रिये
मला माहित आहे तू आमच्या boss कडे गेलीस न..
कळलच असेल तुला सगळ खर..
-----------------------------------------------------------------
पुन्हा एका mail आला
प्रिये
मी तुला प्रिये म्हटलेलं चालत न...
.
पूजा ने reply दिला
नाही रे माझा न|व चा छान आहे त्या नावाने बोलावत जा...
.
विनीत
:ग मला एखादी व्यक्ती खूप आवडली कि मी तिला असह नावाने हक मारतो...
चालेल न...
i love u
विनीत
-----------------------------------------------------------------------------------

पूजाच्या मनातून हि विनीत चा विचार जात नसतो...
ती एका सारखी सुरी कडे धारदार वासून कडे पाहत असते...
.
तिला एका mail येतो..
प्रिये
तुझ्या सारखेच मला हि मित्र नव्हते...
मी हि रात्री पर्यनात काम करायचो...
त्यामुळे मला "निद्रानाश झाला..."
आणि त्यातच आजारी पडून माझा मृत्यू झाला..
म्हणूनच तू काळजी घे...
.
विनीत
.--------------------------------------------------------------------------------------
त्यावर पूजा reply करते..
"मला हि तुझ्या कडे यायचा असेल तर काय कराव लागेल...."
.
reply येतो "तू असा काही करणार नाही आहेस.... "
.--------------------------------------------------------------------------------------
आणि तेवढ्यात पूजा बाजूला असलेली सुरी खुपसून घेते....
.
आणि तेवढ्यात एका mail येतो...
.
"प्रिya boss
आम्ही इथे दोघही एकत्र आहोत...
हा comp असाच चालू ठेवा आणि इथे जो हि कामाला बसावा ज्याला कोणी मित्र नाही...
मी आणि माझी प्रेयसी त्याचे मित्र बनू...vinit&pooja"
.
boss च्या हातात रक्तालेली पूजाची body होती आणि विनीत च्या रात्री जागरण करून लिहिलेली कवितांची वही होती....आणि ते emails
प्रेम अशी गोष्ट आहे... जीव अडकला तर mail मध्ये हि अडकतो...
आणि प्रेम मिळतच...