मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

चारोळ्या..


तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले
-- शुभा


जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो
-- शुभा


मी रोज खिडकीत उभी असते
तु येतोस का ते पाहण्या साठी
ये ना कधी तरी असाच
माझं मन राखण्या साठी
-- शुभा

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

 
तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले

तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली

ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले

तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती
तरंगातूनी काय कोणता संदेश वदती

ती:
शांत पाण्याला जीवन देण्या
तरंग असले आले जन्मा
जळात ते जवळी राहून
लडीवाळ काही गोड गुपीत बोलले

तो:
फुले माळलीस तू या वेणी
गंध तयांचा गेला रानी

ती:
भ्रमर झाला बघ तो वेडा
जवळी आला रस घेण्या चुंबूनी
भ्रमर कुणी का तो नसे काही वेडा
बोल प्रितीचे मी त्यातून ऐकले

- पाभे

सोमवार, २३ जानेवारी, २०१२

मिठीत घेता धुंद अबोली ....


निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....


कवि : रुपेश सावंत

“तु प्रेम आहेस माझं”


“तु प्रेम आहेस माझं”

तु प्रेम आहेस माझं,
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..

तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..

तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
तु प्रेम आहेस माझं.....!!!!

तू बरोबर असतोस तेव्हा,

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
... फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...

आणि रोज माझ हस होत...

तुला पाहण्यासाठी,
आता माझ्या बरोबर चंद्र हि थांबतो,
तारे हि लाऊन बसतात डोळे, तुझ्या वाटेकडे,
वाराहि गाऊ लागतो, तूझ्या येण्याचे गाणे,
अन वेडे होऊन वाट पाहतो, आम्ही सारे शहाणे...
...
तू दिसताच, चंद्र हि लाजतो,
तारे हसू लागतात,
अन वारा नाचू लागतो...

मी हि हसतो, तुला पाहून ,
वार्या बरोबर नाचतो, मी हि थोडा जाऊन...
आज तरी सांगेन तुला मनातल गुपित ,
अस रोज मी ठरवतो...
पण तू समोर येताच,
कळतच नाही कधी, मी तुझ्यातच हरवतो...

रात्र निघून जाते तुझ्याशी बोलण्यात,
पण मनातल गुपित मनातच राहत...
तुला पाहून रोज माझ असच होत,
रोज ठरवतो मी बोलायचं,
अन तू समोर येताच,
शब्द गोठतात माझे,
आणि रोज माझ हस होत...
आणि रोज माझ हस होत...

ह्रषिकेश व्हटकर....

तिला सहज विचारलं

तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? 
ती म्हणाली 
माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...? 
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? 
* *
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? ... 
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...? 
... ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का ?

आपल्याला हि कोणी तरी मिळत...

कळतच नाही कधी मनाशी मन जुळत ,
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,
... आपल्याला हि कोणी तरी मिळत...
आपल्याला हि कोणी तरी मिळत...

ह्रषिकेश व्हटकर... @>`~~

"चाहूलं...!"

मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...
जीवनात चालू आलं... माझ्या प्रियेचं पाऊलं...
रिक्त चौकट भरली... सारी सारुनिया धूळ...
गहिवरला गाभारा... असं सजलं राउळं...
... मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

ओढ लागली जीवाला... जणू पडली भुरळ...
मोहोरला रानोमाळी... एक विरक्त बकुळ...
रोमी शहारे उठवी... तिच्या आठवांचे खूळ...
स्पर्शभासाने फुलली... गोड गुलाबांची फुलं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

को-या आकाशी दाटली... गर्द ढगांची झाकोळं...
टपोर थेंब टिपायला... मनचातक व्याकूळ...
गर्दी जाहली स्वप्नांची... आतुरलं स्वप्नांकुल...
दारी उंबराही झाला... तिच्या स्वागता काकुळं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!
.........महेंद्र

मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
तू नक्कीच होशील माझी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
तू असशील माझ्या बाहूपाशी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
... माझ्या मनीच्या भावना, समजू लागतील तुलाही;
माझी स्वप्नं सत्यात उतरतील, मी वाट
पाहतोय त्या दिवसाची....
तुझ्याही मनात रुजू लागेल, प्रितीची निखळ
भावना;
मोडून बंधनं तू येशील मजपाशी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
सर्वांच्या मग अनुमतीने, नात्याला आपल्या रुप
मिळेल;
तू बनशील माझी अर्धांगी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
आयुष्य माझे सखे, समृध्द करशील तू सहवासाने; आमरण आपुली साथ असेल, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....

असं प्रेम करावं..

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,

... पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..

रविवार, २२ जानेवारी, २०१२

काय दिसते ग तू साडीत .......

काय दिसते ग तू साडीत ..........
... 1 number तुलाच बघण्यात होतो मी मग्न .....
असे वाटते कधी होणार आपले लग्न .....
तुज्या रुपाची तारीफ करायला शब्द अपुरे पडतायत ...
तुला बघून हृदयाचे ठोके जोर जोरात पडतायत ...
एकदा का आपले लग्न झाले कि मी तुला सोडणारच नाही ..
जाते मी आता bye म्हणायचा chance देणारच नही ...
नको इतकी नटून येत जाऊ ग माज्यास्मोर , मी मजा राहत नाही ...
पाहून तुला गोजिरी मन थार्यावर राहत नाही ...
♥ ♥ ♥
-सोनाली कुलकर्णी
किती गोड आहे आपले हे प्रेम...............
किती सुंदर आहे आपले हे नाते.............
एकमेकांच्या प्रेमात चिंब बुडालेले असणे..........
एकमेकांच्या आठवणीत एकटेच हसणे ...........

... नजर न लागो कोणाची आपल्या या नात्याला .........
उभी रहा अशी दृष्ट काढतो नजर न लागो आपल्या प्रेमाला......
दूर झालो एकमेकांपासून तर एकटे जगू शकणार नाही.....
दूर झालो एकमेकांपासून तर स्वताला सांभाळू शकणार नाही ..........

सवय झालीय तुज्या मोहक हास्याची............
सवय झालीय तुज्या लाडिक बोलण्याची..............
सवय झाली आहे तुज्या स्वप्नांची......
सवय झाली आहे आयुष्य तुज्याबरोबर पाहण्याची....

जेव्हा भेटतो दोघे आपण......

जेव्हा भेटतो दोघे आपण............
एकमेकांच्या प्रेमात विरघळतो आपण ....
त्या एका भेटीत पूर्ण आयुष्य जगतो आपण...
त्या एका भेटीत आयुष्यभरासाठी आठवण साठवतो आपण...

...
तुज्या भेटीसाठी किती आतुर
मी सांगू शकत नाही.......
तुला पाहिल्यानंतर होणारा आनंद
शब्दात व्यक्त होत नाही...............
तुज्या भेटीसाठी किती तडपतो
मी दाखवू शकत नाही..
तुला पाहिल्यान्नंतर मिळणारे सुख
हृदयात साठवत नाही...

जेव्हा तू मला भेटते ...
स्वर्गात असल्याचा भास होतो...
अचानक मनात स्वप्नांचा पाउस पडतो..
जेव्हा तू मला भेटते .......
मनाशीच काय काय ठरवत असतो...
अचानक स्वप्न सत्यात उतरते...

तुज्या भेटीनंतर दुरावा नको वाटतो..
हा मिलनाचा प्रहर किती लवकर संपतो..
तुज्या भेटीनंतर चे क्षण जगावेसे न वाटतात ...
हे क्षण तू पुन्हा कधी भेटाव ते सांगतात ....

ती समोर असताना …

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..
तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..
तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
... हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..
तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..
तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..
तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..

माझे आभाळ बोलले!!!

तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
माझी कविता अधुरी
... तुझ्या एका शब्दाविना
जसा जीव चातकाचा
तडफडे थेंबाविना

तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले

तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!

वाट बघणार आहे..

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
मी तुला रोज सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो ...पर्यंत मी वाट बघणार आहे

... प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
हीच प्रेमाची भाषा आहे

प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे...

एक नितांत सुंदर प्रेम कहाणीउल्हास हरी जोशी


उल्हास हरी जोशी
रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉन माझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत घेतात. बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, बर्फ असो, त्यांच्या या प्रोग्रॅम मधे खंड पडलेला नाही. मधे त्यांची तब्येत बरी नव्हती तरी सुध्धा ते नीयमीतपणे येत होते. ते रोज गुलाबाची फुले घेतात म्हणजे नक्कीच आपल्या बायकोसाठी घेत असणार! त्यांचे त्यांच्या बायकोवर फारच प्रेम दीसते!
एक दीवशी जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी जॉन साहेबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तसे ते फार मीतभाषी. कधी कोणाशी फारसे बोलत नाहीत. पण त्यांचा मुड पण जरा वेगळा दीसत होता.
“ फुले कोणासाठी? बायकोसाठी वाटत!” मी प्रश्न केला
... “ बायको?” जॉनसाहेब क्षणभर गोंधळले व म्हणाले, “ नाही! मी अनमॅरीड आहे!”
“मघ ही फुले?” मी विचारले
“ ती माझ्या मैत्रिणीसाठी!” जॉनसाहेब उत्तरले.
“मैत्रीण?” मी जरा खोचकसारखे विचारले.
“ शाळेमधे असताना आमचे प्रेम प्रकरण होते. पण त्याला बरीच वर्षे झाली. मग तिचे लग्न झाले आणि मी अनमॅरीड राहिलो.” सहज सांगावे तसे जॉनसाहबांनी सांगीतले.
“तुमची मैत्रीण इथेच असते कां?” मी विचारले
“हो इथेच असते, हॉस्पीटलमधे!” जॉनसाहेब म्हणाले.
“हॉस्पीटलमधे?” मी म्हणालो.
“होय! गेली दहा वर्षे ती हॉस्पीटलमधे आहे. कार ऍक्सीडेन्टमधे तिचा नवरा गेला. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती स्मृती हरवुन बसली आहे. कोणाला ओळखत सुध्धा नाही. मी रोज सकाळी बरोबर नऊ वाजता तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो.” जॉनसाहेब म्हणाले
“ पण ती तुम्हाला तरी ओळखते कां?” मी जॉनसाहेबांना विचारले
“बहुतकरुन नसावी!” जॉनसाहेब म्हणाले. “तिला एव्हडेच ठाऊक आहे की रोज सकाळी नऊ वाजता कोणीतरी एक माणुस तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घ्यायला येतो. याची तिला येव्हडी सवय झाली आहे की जर एखाद्या दीवशी मी गेलो नाही तर ती दीवसभर उपाशी बसते.”
जॉनसाहेबांच्या सामानाची पीशवी त्यांच्या हातात देताना मी त्यांना विचारले, “ पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे कां?”
“ठाऊक नाही!” सामानाची पीशवी उचलताना जॉन साहेब म्हणाले, “पण माझे तिच्यावर प्रेम आहे ना!”
वयाच्या सत्तरीत सुध्धा आपल्या प्रेयसीवर निरपेक्षपणे प्रेम करणार्याल जॉनसाहेबांना बघुन माझे डोळे भरुन आले. माझे आश्रृ आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते की आणखी कशाचे होते माझी मलाच कळले नाही..

कशासाठी ?

डोळे कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ! ! !

आला भरून पाउस,

नको एकता जाउस,
... सरी कशासाठी ?
तुला बिलगून भिजुन जाण्यासाठी . . .

नाव तुजे मनातले
चान्दनेच रानाताले
शब्द कशासाठी ?
तुला आठवून भरून घेण्यासाठी

वेल मोहरून आली,
फुले अंगभर झाली
वारा कशासाठी ?
गंधवनातुन पाखरू होण्यासाठी . . .

असा तुजा भरवसा
चाँदन्याचा कवडसा
ओठ कशासाठी ?
उरी थरारून जुलून गाण्यासाठी

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

काल्पनिक पत्र

 


 





आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!


१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!
...
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!

८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

'मज वाटते आज....'

'मज वाटते आज....'

सांजवेळी समुद्र्किनारी
वाटते की असावी तु जवळी
गुज मनीचे सांगावे नजरेतुनी
... ... ओठांची मात्र अळीमिळी

वाटते की असावी तु जवळी
चुंबावी हळुक गाल लाली
होउनी तु गोरीमोरी
लाजुन व्हावी बिलगलेली

वाटते की मज तु हवी
या चंद्रचांदण्यासम सखे
लुकलुकणारी मोहीत चांदणी
तुच सखी ग तुच सखी

वाटते मज आज प्रिये
मंद या लाटेवरी
स्वार होउन तुजसवे
सैर व्हावी न संपणारी

- मयूरपंख.
13 डिसेंबर 2011
सायं. 6:41 वा.
(स्थळ: गणपतीपुळे )

साथ तुझी हवी आहे...

 
प्रिय सखे,

तुझ्या मनातले रंग
घराला द्यायचे आहेत
रांगोळी दारातली
... तुझ्या हाताने कोरायची आहे

वादळे आयुष्यातली
तुझ्यासवेच झेलायची आहेत
कधी कोलमडलोच तर
सावरायलाही साथ तुझी हवी आहे

मनातले शब्द न शब्द
तुलाच सांगायचे आहेत
भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने
सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये...
त्यासाठी,
साथ तुझी हवी आहे...

- मयूरपंख...
(आज आत्ता ताबडतोब...)

वाटत कधी..

वाटत कधी.. जगाव चांगल आयुष्य
हसाव खूप खळखळून
उडाव उंच भरारी घेऊन..
सुंदर कोवळ्या हिरवळीला

...
वाटत कधी.. असाव कोणी आयुष्यात..
हातात हात धरून,
बघाव स्वप्न मिळून..

वाटत कधी.. नसावी एकटी कधी आयुष्यात..
मनातल सुख दुख वाटून,
बघाव हलका होऊन..
ओठातले हे शब्द,
ऐकावे कोणी हळूच..

वाटत कधी... भेटाव माझ आयुष्य
डोळ्यातले हे अश्रू,
पुसावे कोणी प्रेमाने हळूच..
चेहर्यावरचे खरे हास्य,
द्यावे कोणी आणून..



वाटत कधी.. बघाव निरखून हे आयुष्य..
डोळ्यात कोणाच्या प्रेम
आणि मनात समाधान साठवून..
आयुष्यात त्याच्या गरज,
माझी द्यावी त्याने पटवून..!



काळजीत त्याच्या हरवून
बघाव सोबत चालून..
बघाव स्पर्श करून..

By:- Dnyanesh Rasa

तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

तू नेहमी सुखांशी केला करार राणी
मी नेहमी सुखांची झालो शिकार राणी
... आहे सदैव याची जाणीव पांघरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

फिरलो किती कितीशी अज्ञात अंतराळे
जपले किती कितीसे अश्राप पावसाळे
जाते क्षणात सारे वार्‍यावरी विरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

देऊन हूल आता या ऊन सावल्यांना
जाऊ निघून राणी आपापल्या दिशांना
हृदयातले उधाण जाईल ओसरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

पाहीले न मी तुला, तू मला न पाहिले...


पाहीले न मी तुला, तू मला न पाहिले

ना कळे, कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही, कांती तव पाहूनी

तारका नभातल्या, लाजल्या मनातूनी

ओघळले हिमतुषार, गालावर थांबले

मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी

पाहिलेस तू तुला आरश्यात ज्या क्षणी

रुप देखणे बघून, नयन हे सुखावले

Chitrapat : Gupchup Gupchup

Singer : Suresh Wadkar

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना ...

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरुप आले, मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढ़ते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रुप या क्षणांना