शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच
खाते.

'त्याला' किंवा 'तिला' वाईट वाटले तर... 'तो' किंवा 'ती' दुखावेल... अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे 'त्याने' किंवा 'तिने' म्हटल्यानुसार आपण वागत असतो. 'तो' किंवा 'ती' आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्‍या गोष्टीही आपल्यावर लादून 'हक्क' सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला 'नाही' म्हणता येत नाही. अर्थात 'नकार' देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्‍या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.


'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् 'ती' मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला 'तो' सांगतो, तसं करावंच लागतं....

महाविद्यालयीन जीवनात प्रेमाची उधळण करणार्‍या तरूण-तरूणीमध्ये 'न'ची बाराखडी त्यांच्याच होणार्‍या वादाचे कारण बनत असते. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून तरूण- तरूणी मन मारत एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे 'त्या' दोघांतील 'प्रेम' अधिक दृढ होण्याऐवजी गुंतागुंतच वाढत जात असते. त्यांना 'नाही' म्हणायची सवय नसते किंवा 'नाही' ऐकायचीही सयव नसते. त्यामुळे कमी वेळातच त्यांच्यातील नात्याला तडे पडतात व प्रेमाला कधी न सुटणारं 'ब्रेकअप'चं ग्रहण लागतं.

यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला 'नकार' देता येत नाही. प्रेमातच काय तर कुठल्याच नात्यामध्ये 'नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि 'नाही' म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. मन मारत आपण 'होकार' देत आपल्या मनातल्या मनात झुरत असतो. परंतु, आपल्या या भूमिकेमुळेच नको ते घडते. पाणी डोक्यावर गेल्यावर हात पाय हलवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग, एकदाचा वैतागून नकार दिला जातो नि गाडी कायमची रूळावरून खाली उतरते. प्रेमात पडतानाच 'नाही' म्हणणे शिकणे महत्त्वाचं आहे.

'प्रेम' जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.

प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे... थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा 'त्याला' किंवा 'तिला' नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. 'नाही' म्हटलं तर 'तो' किंवा 'ती' आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे 'तो' किंवा 'ती' मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे 'नाही' म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच 'नाही' म्हणणेच 'त्याच्या' किंवा 'तिच्या'साठी गरजेचे असते.
 
 

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याचे आई वडिल ........खूपच छान ( वेळ काढून वाचा )


प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याचे आई वडिल ........खूपच छान ( वेळ काढून वाचा )



मित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा,
पण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते....
अश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनःस्थिती मी येथे मांडन्याचा प्रयत्न करत आहे...
खरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे...

आई…

आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?

ठाउक आहे मला,
आई तू बोलायचिस,
बाळा तू फसत आहेस,
आतल्या आत का धसत आहेस?

ठाउक आहे मला,
मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,
तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,
परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...

आई,तरी आज तू मला समजुन घे,
माझ्या केसात हात तुझा फिरवत,
माझा चेहरा वाचून घे,
डोळ्या कड़े मात्र बघू नकोस,
आसवान आड़ तिला डोळ्यातच राहून दे...

आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,
मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,
आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,
मी सर्व सांगत असताना मात्र तू धीर सोडू नकोस...

मी तिच्या बद्दल जे काही सांगेन
ते तू खुल्या मनाने ऐक,
तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,
पण तू माझी बाजू बघून अश्रु ढाळू नकोस,

आई मी कदाचित माझा धीर सोडेन,
रडून-रडून तुझे पदर ओले करेन,
तरी तू तिच्यावर रागावू नकोस,
आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,

तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,
तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,
पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,
विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...

माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,
तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,
आई...तरी ज़रा सबुरिने घे,
मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...

तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,
थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,
तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?



मुला…

मुला ,कसे सांगू मी तुला,
तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...

असे वाटते तुला जवळ घ्यावे,
कुशीत तुझे डोके घेउन ,
केसांना हळूवार कुरवाळावे,
मग हात मागे घेते,कारण समोर असून देखिल,
तू भासतो कोणात तरी हरवलेला,
मुला ,कसे सांगू मी तुला,

तुला ठाउक नसेल,असेल ही कदाचित,
मला तुझे दुःख कळते ते...
अरे आजवर तूच म्हणायचासना,
आई तुला माझे डोळे कसे कळतात?
मग आज असे डोळ्यात आसव लपवत आई पासून का दुरावला ?
मुला ,कसे सांगू मी तुला,

खर्‍या प्रेमाची व्याख्या मीच तुला सांगितलेली,
आता प्रश्न पडतो तुला ती का नीट समजलेली?
राहून गेलेले जे सांगायचे ते आता सांगते ,
ऐक,मुला खर्‍या प्रेमामध्ये हार-जित नसते रे,
पण मीही तर पाहू शकत नाही तुला हरलेला...
मुला ,कसे सांगू मी तुला,

काल रात्री तू परत तू उशिरा घरी आलास,
माझे मिटलेले डोळे पाहून पुन्हा उपाशी पोटी झोपी गेला,
मला वाटले विचारावे काय झाले?
मी उठलिही बिछान्यातुन,पण,
तुला रडताना पाहून,माझाही तोल गेला,
वाटले तुझी समजूत काढावी,हाताचा बनवून झूला...
मुला ,कसे सांगू मी तुला,

आज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,
रागात असे वाटले तिला जाब विचारावा,
प्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,
त्याला जवळ का करते"?
सोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते?
पण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,
मुला ,कसे सांगू मी तुला,

मुला,आता तुझे ओलावालेले डोळे पाहून,
माझे पदरही भिजलेरे..
तुला नेहमी जिंकताना पाहणारे,माझे डोळे ,
तुला हरलेला पाहून पुरते खचले रे,
माहीत आहे शक्य नाही,
म्हणुनच सांगत नाही,विसर आता तिला....
मुला ,कसे सांगू मी तुला,
तुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...


प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई....हि कविता लिहिल्या नंतर काहीतरी चूक-चुकल्या सारखे वाटत होते,खरतर मी वरचे-वर ह्या एका नाजूक विषयाला स्पर्षले, पण राहून-राहून वाटत होते कि ह्या सर्वात त्या मुलाच्या वडिलाना मी जाणीवपूर्वक विसरत आहे.
खरतर आपल्या मुलाकडून आई आणखीन त्याचे बाबा दोघांच्याही काही अपेक्षा असतात.मुलगाही मोठा होत असताना ह्या अपेक्षा पूर्ण करतो,पण त्याच्या वाढणाऱ्या वयासोबत तो प्रेमाची एक व्याख्या बरोबर घेऊनच मोठा होतो.बऱ्याचदा हि निर्मळ प्रेमाची व्याख्या तो आपल्या आई वडिलांच्या असलेल्या प्रेमाच्या नात्यातूनच शिकत असतो.
त्यामुळे मला सतत वाटत होते कि जर ह्या मुलाला होणारे अनुभव त्याने शिकलेल्या प्रेमाच्या व्याख्ये पेक्षा जर वेगळी असेल तर,नकळत हा मुलगा आपल्या आई-वडिलांपासून दुरावत जातो.त्याच्यात होणाऱ्या बदलावाना त्याची आई फार जवळून अनुभवत असते.
पण ह्याच आपल्या तरुण मुलाची मनःस्थिती त्याच्या वडिलां पासून काही काळ लपून रहाते.कारण वडिलाना आपल्या घरासाठीची जबाबदारी घराबाहेर राहून पार करायची असते.
ह्या सर्वात वडिलाना आपल्या मुलाचे मोठेहोने थोडे उशिराच जाणवते.आणि जेव्हा त्याना आपल्या मुलाच्या तुटलेल्या प्रेमाच्या स्वप्नाबद्दल कळते तेव्हा ते धड त्याच्याशी मोकळेपणे संवादही साधू शकत नाही.
हि सर्व मुलाच्या मनाची घालमेल वडील थोडे आशायाच्याबाहेर राहूनच हाताळत असतात.
हि वडिलांची धडपड फक्त त्यांनाच माहित असते.
आणि त्यामुळेच मी अनेक प्रयत्न करुणाही ह्या कवितेत वडिलांची बाजू मांडू शकलो नव्हतो.
आणि कालच (११/०१/२०१०) t .v . वर सौमित्रांच्या तोंडून ऐकलेली ओळ हे सर्व एकदम सहजपणे स्पष्ट करते.
वडील म्हणजे express न करता आलेली एक आईच...
सौमित्र.. ..
आणि हे एकाताच बऱयाच दिवस अडकेलेले काहीतरी मनातून मोकळे झाले

काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...


पहाटे मी जाताना गाढ झोपेत असतोस,
आणि संध्याकाळी नेमकी माझी परतीची वेळ साधून घर सोडतोस...
कोठे जातोस तिन्हीसांजेला रोज,
मलाही सांग ,म्हणजे तिथे कधीतरी आपण दोघेमिळून जाऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

आठवते तुला लहान होतास तेव्हा,
मी परतल्यावर,माझ्या हातून खाउची पिशवी हिसकावून घ्यायचास,
तेव्हा भले तुझ्यावर रागे भरायचो मी,
पण मला मात्र तू नेहमीच तसाच हवा-हवासा वाटायाचास
सांग आता काय आणू मणजे ,बाळा तू परत धावत माझ्या मिठीत येशील,
तुला हवे ते शक्या असेल तर देऊ,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

काल तुला आईच्या कुशीत डोके ठेऊन रडताना पहिले,
कसे सांगू त्या क्षणी मी का-काय हरले,
अरे तुझ्या वयातून मी हि गेलोयाच कि कधीतरी,
कधीतरी,बघ माझ्याकडेही मन मोकळे करून,
मग मी हि साथ देईन तुला,
बघेन मीही घटका-दोन घटकाभर रडून...
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

एखादा रविवार साधून तुला गाठेन म्हणतो,
तर तू शनिवारीच रात्री मित्रांसोबत बाहेर निघून जातो,
मग वाटते,चला बरेच झाले,
तुझे मन तिथेतरी कदाचित जाईल रमून,
पण कधीतरी मला भीतीही वाटते बरका !
कधी उचलू नकोस चुकुनही वाईट पाउल,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

अभ्यासासाठीही कधीच पहाटे जागा न होणारा तू,
हल्ली कधीतरी भल्या पहाटे जागा दिसतोस,
हळूच डोकावून पाहिले,तर डायरीत काहीतरी लिहिताना दिसतोस,
काल मी चोरून तुझी डायरी वाचलीच,
त्यात लिहिलेल्या कविता वाचून न रहावून डोळे ओलावालेही,
वाटले बोलावे,"छान लिहितोस,इंगीनीरिंगच्या अभ्यासासोबत,ह्याकडेही लक्ष दे,
कवी हो आणि झालाच तर ह्यालाच पुढे करिअर म्हणून निवड",
पण नको,कवी हो सांगेन पण कसे सांगू,कि कवितेसाठी "विरह" विषय निवड,

पण एव्हढे मात्र आता नक्की सांगतो,
बोलू आपण ह्याही विषयावरही पुढे जाऊन,
काय चालू आहे मनात तुझ्या,
तसे मलाही आहे थोडे ठाऊक...

आणि अश्या प्रकारे वडील हा विषय टाळून जातात,पण मुलाच्या मनातील तळमळ त्यांच्या मनालाही एक कळ-कळ देऊन जाते
 
 
 

स्वप्नातली तू परी

स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा बावरी

सये निशा अशी दिवाणी
मिठीत स्वप्न जागतो मी
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोर तो मी
अधरे जुळली या मिठीत मावली
स्वप्नातली तू परी...

गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधता हे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलला हलवा हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...

तुझेच स्वप्न पाहतांना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना
बघ ना वळूनी चांदणीही लाजली
स्वप्नातली तू परी...
 
 

माझ्या मोबाइलवर...

माझ्या मोबाइलवर तुझी रिंगटोन ऐकली..की
मी धावत पळत येतो...
तुझा फोन आला ह्या नादात
तुझा फोन रिसीव करायला विसरुन जातो.....

फोन उचलल्या वर तुझ ते "हॅलो" एकुन
माझ्या काना मध्ये मध घोळतो..
आणि त्या नादात
तुला "हॅलो" बोलायचं विसरुन जातो..

फोनेवर बोलताना मधेच तुझे गोड हसणे...
बालिशपणा त्यात उसळत असतो..
त्यात मी वाहुन जातो.
मला काय बोलायचं हेच मी विसरुन जातो..

तुझ्याशी बोलताना मनात एक उमेद येते..
दु:खी असलेले माझे मन ही मग,
तुझ्या बरोबर हसायला लागते
काही क्षण का होईना,
माझ दु:ख सुद्धा मी विसरुन जातो..

माझ्या अशा विसरण्याने..
तुझे ते लटके रागावणे..:
अस्स नाही हा करायचे हा
असे तुझे ते लाडिक बोलणे..
आणि मग रागावुन तुझं फोन ठेवण्..

तुझ्या अशा वागण्याने मी पार विरून जातो..
आणि तु फोन ठेवला तरी..
मी मात्र फोन ठेवायचा विसरुन जातो..

काय हरकत आहे....?

जीव ओवाळतो ना मी
वाट पाहतो तुझ्या येण्याची
काय हरकत आहे....?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहतो स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..मग काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बांधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?
 
 

एक सुंदर प्रपोज...

एक सुंदर प्रपोज...♥

मुलगी- तु माझा पाठलाग का करतो आहे...??

मुलगा- जेव्हा मी लहान होतो तेव्हा...,

माझ्या आईने मला सांगितले होते..

"नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा..!!!!!
 

जाउ नकोस अशी...

जाउ नकोस अशी सांज अजुन ढळली नाही
थांब जराशी..तुझ्या केसांत लाली अजुन माळली नाही

असा ना किंतु मनात साठवु जराही तु
प्रिये प्रित माझी अजुन मळली नाही

ठाउक मज बदनाम प्रेमात तुझ्या जरी
रित जगाची तरी कधी मी पाळली नाही

मी कधीचा गप्प... तुझ्या नयनांशीच बोलतो आहे
मौनाची भाषा माझी तुज अजुन कशी कळली नाही

मला टाकुन अशी जाउ नकोस आता
थांब जराशी तुही...वाट तुझी मी कधी टाळली नाही...
 
 

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

जादू

लव आज-कल


तुझी भेट व्हावी...


कधीच हिम्मत करतोय


माझ्या चित्र चारोळ्या













तुझा वाढदिवस चारोळ्या




अप्सरा आली...


मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

हे आपला अबोल प्रेम

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातl
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम
प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
... पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???
तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे...
 
 

भावना अंतरीच्या


विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसला तू असा कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!!
-भावना अंतरीच्या

माझिया प्रियाला प्रीत कळेना...!!

घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे...
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते...
साऱ्या सरी या, माझ्याचपाशी चिंब तू होईना...
माझिया प्रियाला प्रीत कळेना...
नवीन तारे चंद्र नवा हा.,
नवीन आहे ऋतु हवासा,
अनोळखी हा बहर घेऊन, पुन्हा पुन्हा भेटना...
माझिया प्रियाला प्रीत कळेना...!!
 
 

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

मी वादलाशीही लढले असते..

 एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात
पडली... तिने त्याला प्रपोस पण केल... पण
मात्र
चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त
... उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच
उडु शकतेस मग... मग चिमनीने
त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले...
नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस
घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात

संसार करायला लागले... पण
मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,
त्या वादळात चिमना हळु-हळु करूनउडुन
गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे
ती उडु शकली नाही... नंतर वादळ शांत
झाल्यावर चिमना आला आणि त्याने
बघितले कि चिमनि मरून
पडलेली होती आणि तिने फांदीवर लिहिले
होते कि"एकदा बोलला असतास
कि मी परत येणार आहे तर
मी वादलाशीही लढले असते..