शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

प्रेमाची परिभाषा. . .



प्रेम ♥
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत
नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...
...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक
भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....♥♥♥

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।



रागवू नकोस मला
मनवता येणार नाही,

लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

... डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ
नाही......
असं मी म्हणतं नाही कारण.... तुझ्याशिवाय जीवनात जीवच
राहणार नाही।

गरज आहे आज मला...


गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या आधाराची

अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

...
गरज आहे आज मला....♥.
त्या तूझ्या मोहक मिठीची

दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून
टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या कोमल प्रीतीची

भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला....♥.
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची

सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे....♥.

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

तो बॉयफ्रेंन्ड असतो. .


 आपली चूक
असताना जो माफी मागतो,
तो प्रामाणिक असतो..
आपली चूक आहे की नाही,
याची खात्री नसतानाही जो माफी मागतो,
तो शहाणा असतो..
आपली चूक
नसतानाही जो माफी मागतो,
तो बॉयफ्रेंन्ड असतो..:p:p:p
बरोबर ना ?????

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

चारोळ्या


चारोळ्या. .





सुपर प्रेम कविता. .





 मिठीतल्या कविता..



शनिवार, १ डिसेंबर, २०१२

स्मितहास्य . .



प्रियकर :- एक सांगू

प्रेयसी :- सांगना.

प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे

प्रेयसी :- मी एक सांगू

प्रियकर :- सांगना

प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे !!! ♥

♥ Love is not taking a credit but giving a credit, is't keep loving .... ♥

प्रेमाची किंमत. .

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती ?


प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :- "आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते. .



"एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे, हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर पर्या त्यांच्याकडे पाठविल्या,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर पर्यांना बघून ती आश्चर्य चकित झाली, तेव्हा ....

पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........

बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नवर्याला म्हणाली, "आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे".

नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.

त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको"

तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे आश्चार्यची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील आत आल्या.

त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ," जर तुम्ही पैसा-परी निवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या, पण देवाच्या नियमा प्रमाणे जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हणतले तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत" ♥ ♥ ♥

तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी, "प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००% खरे आहे", म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे"

♥ " Love is what all we need .... Keep Loving Truly ♥

माझे बाकी राहिलेले आयुष्यभर. .



"प्रेयसी :- माझ्यावर प्रेम करशील , माझे बाकी राहिलेले आयुष्यभर ? 


प्रियकर :- नाही, तुझ्यावर प्रेम करत राहेन, माझे बाकी राहिलेले आयुष्यभर"



 "To love is to have a heart; to be in love, is to make it beat." ♥

मग चंद्रालाच बघना. . .


" प्रेयसी :- असे काय बघतोस ?


प्रियकर :- अरे !!! .... चंद्राला तासन-तास बघत बसलो, तरी तो काही बोलत नाही !!


प्रेयसी :- हो का ? ... मग चंद्रालाच बघना !!


प्रियकर :- बघितले असते ..... पण तो मला श्वास व जीवन जगण्याची आशा नाही देऊ शकत ..... तुझ्यासारखं !!" 
♥ 
 
 ♥ Love is sweet ...Is't It ? ... Keep Loving Truly ♥

ते मेहंदीवाले हाथ. .


♥ ( Mehandi Love Quote ) ♥

" मुलींच्या हाथाला मेहंदी छान दिसते,
.
आणि
.
.
मुलांच्या हाथात " ते मेहंदीवाले हाथ " !!!! :-))


♥ " Keep Loving Truly " ♥

" आयुष्यातील ३ महत्वाचे दिवस. .

" आयुष्यातील ३ महत्वाचे दिवस,

♥ पहिला :- जेव्हा मी जन्मलो !! 


♥ दुसरा :- जेव्हा तू जन्मलीस !!

.................. आणि ...............

♥ तिसरा :- जेव्हा "तू" आणि "मी" ....... "आपण" झालो.!!! 
 
♥ The Day I & YOU Became WE

माझी झोप मला प्रिय आहे. .



" माझी झोप मला प्रिय आहे ................

कारण तो म्हणाला

" मला मिळविणे तुझ्या साठी एक स्वप्न आहे" !!!!

 ♥

मला खात्री आहे कि तो तूच असशील..!!

एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत प्रेयसीला म्हणतो - जर मी अजून गरीब
झालो तरी तू मला स्वीकारशील..?

श्रीमंत प्रेयसी - मी तुझ्यासाठीच बनली आहे..!!

गरीब प्रियकर - जर कोणी श्रीमंत मुलगा आला आणि त्याने तुला लग्नासाठी
मागणी घातली तर..??

श्रीमंत प्रेयसी - मला खात्री आहे कि तो तूच असशील..!!..♥

Love is not only an emotion but an eternity too....
keep loving...♥

What's on your Mind" ?



" मुलगी :- हे २/२ मिनिटाला माझे नांव का पोस्ट करतोस तुझ्या फेसबुक स्टेटस मध्ये ?????

मुलगा :- कारण फेसबुक मला सारख विचारत आहे कि " What's on your Mind" ?

कारण तो स्वर्ग स्वर्गच काय जिथे तू नाहीस. .

♥ ♥ ♥
 "प्रिये, जर मी नरका मधे असलो असतो आणि तू स्वर्गा मधे असली असतीस, तर मला तुझा अभिमान वाटला असता,............... पण जर मी स्वर्गा मध्ये आणि तू नरका मध्ये असली असतीस तर मला नरका मधे तुझ्याजवळ पाठविण्यासाठी मी देवाकडे विनंती केली असती, .......................  कारण तो स्वर्ग स्वर्गच काय जिथे तू नाही
 ♥

पापण्या. . .

♥ 
" जर माझ्या डोळ्यांना पापण्या नसत्या तर बरे झाले असते .......
 कारण जेव्हा केव्हा मी तुझ्या डोळ्यात उतरून बघतो ..............
तेव्हा पापण्या उघडझाप करण्याचा माझा अमोलिक वेळ वाया जातो "
 ♥

जगातील सुंदर शब्द. .


 

"खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत...
पण
खरं तर...
"I LOVE YOU TOO"
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!!  


♥ 

निकाल :- HIV ............. ( Honey in Veins )

" तुझ्या रक्ताची चाचणी होत आहे ..........
.
.

चाचणी चालू आहे

.
.

निकाल :- HIV ............. ( Honey in Veins )
 शिरे मध्ये मध आहे !!!
♥ ह्याचा अर्थ तू पूर्ण मधा सारखी गोड आहेस .......... ♥ you are shooo sweeeeet ♥ ♥ ♥

प्रेमाची रांगोळी. .

" होळी असो वा दिवाळी

श्रीखंड असो वा पुरणाची पोळी


कधीच विसरू नका काढायला 


प्रेमाची रांगोळी "

डोळ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांना सजवून झोपलो असतो. . .



"जर आधीच माहिती असतं, कि ती मला स्वप्ना मध्ये भेटायला येणार आहे....
तर देवाशप्पथ ....

डोळ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांना सजवून झोपलो असतो !!!  ♥

तू माझ्या पहिल्या बायको सारखी दिसतेस !!!

" मुलगा :-  हे .... तू माझ्या पहिल्या बायको सारखी दिसतेस !!!

मुलगी :- किती बायका आहेत तुझ्या ?


मुलगा :- शून्य !!!! ♥ ♥ ♥

♥ सात फेरे ♥

♥ सात फेरे ♥

पहिला फेरा :- जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवर्याची व नवर्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते.



दुसरा फेरा :- नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटाना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम

व प्रामाणीकपणा मागते.


तिसरा फेरा :- जोडपं, आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते तसेच बायको आपल्या नवर्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते.


चौथा फेरा :- आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्या बद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवर्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते. तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते.


पाचवा फेरा :- नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते.


सहावा फेरा :- नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवर्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायको कडून दिले जाते.


सातवा फेरा :- सात जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी हि प्रार्थना केली जाते तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्या साठी सुधा प्रार्थना केली जाते.



♥ जरी वेगवेगळ्या धर्माची रीत वेगळी असली तरी त्यातील विधींचा अर्थ हा एकाच आहे तो म्हणजे " एकबद्धता " ( Commitment ) , तसेच "तुझ्या प्रेमासाठी व साथीसाठी मी लायक आहे" हे खात्रीने व साक्षीने सांगण्याचा हा एक मार्ग आहे.

माझी प्रेयसी हरवली आहे. . .

संध्याकाळी ६ ची वेळ, पुण्यातील तुळशीबागे मध्ये .........

राहुल एका अनोळखी मुलीला :- माझी प्रेयसी हरवली आहे, तू माझ्याशी काही वेळ बोलू शकतेस ?

मुलगी :- मी का म्हणून बोलू ?


राहुल :- कारण जेव्हाकेव्हा मी दुसर्या मुलीशी बोलतो, माझी प्रेयसी बरोबर
मला पकडते !! ;) ;)

पण माझ्या बाजूला असशील. . .

" माझ्या आयुष्यातील सर्वात खुशीचा दिवस तो असेल जेव्हा तू माझ्या मनात नाही 
.....
....
.....
...
..
. पण माझ्या बाजूला असशील " ♥ ♥ ♥

Keep loving truly ♥

माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...

आज ते दोघेही खुश होते....असणारंच ना?....कारण आज ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार होते.
भेटायचे म्हणून आज ती केस मोकळेच सोडून आली होती....कारण त्याला आवडायचे तिचे मोकळे सोडलेले केस.
त्याला ती जशी आहे तशी आवडायची म्हणून ती सुद्धा तशीच आली होती.....न नटता थटता...एकदम साधी...
त्याने तिला लांबूनच येताना पहिले.
दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले.....

दोघेही बीचवर गेले बसायला....
दोघांनीही खूप गप्पा मारल्या....
समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात बसले होते.

"अथांग सागराची लाट,
दोघांचे हातामध्ये हात,
डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात,
स्पर्शाची उब अन....सोबत थंड वाऱ्याची साथ"

मधेच तिच्या लक्षात आले कि,तो तिच्याकडेच पाहत बसलाय....तिला लाजायला झाले,
म्हणाली,
"ये जाणा.....माझ्याकडे का पाहतोयस असा.....समोर बघ ना....समुद्र बघ कसा फेसाळलाय....मस्त दिसतोय"
"अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय."
तिला अजून पाणी पाणी व्हायला झालं....तरीही ती म्हणाली...."बस हा बस झालं..."
तो म्हणाला,"ये ऐक ना....गोव्याचे समुद्र कि नाही मस्त आहेत....शांत एकदम....एकदम......"
"बस बस.....पुरे झाले "गोवा पुराण"......गोव्याचे बीच असे होते...गोव्याचेबीच तसे होते....." तिने त्याचे वाक्य मधेच तोडले.
तो हिरमुसला बिचारा आणि सांगितल्या प्रमाणे समोर समुद्राकडे पाहू लागला.
तिच्या लक्षात आले ते आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले...
म्हणाली,
"तुज्या खांद्यावर डोके ठेवले न कि सगळा त्रास विसरायला होतो......खूप खूप आयुष्य जगावसं वाटतं"
मग काय?......गेला त्याचा सगळा राग.....
ती मधेच शांत झाली,
"माझे बाबा नाही तयार होणार रे आपल्या लग्नाला.....आपणथांबवू हे सगळे...."
"अगं मी समजावेन त्यांना...त्यांना तुला सुखातंच बघायचीय ना.....मी करेन त्यांच्या सगळया इच्छा पूर्ण.जरूर ऐकतील ते"
आणि तो तिला समजावून सांगू लागला....सगळे ऐकून मग ती थोडी शांत झाली....
तिला समजावून मग तो तिच्याकडे थोडीशी पाठ करून बसला,
तिच्या लक्षात आले ते....तिने त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे फिरवला,
त्याचे डोळे पाणावलेले होते,
म्हणाली,"अरे रडतोस काय वेड्या.....काय झाले?
म्हणाला,"काय नाही गं....खरंच तुजे बाबा त्या नाही झाले तर?....हा विचार करत होतो..तेव्हा जो एकटेपणा वाटेल ना तो जाणवत होतो"
"अरे तू पण ना वेडा आहेस....मंद.....मी कुठे जात नाहीयेय.....मी फक्त तुजीच आहे....फक्त तुझीच"
असे बोलून तिने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली,"माझे तुझ्यावर खूप खूप खूप खूप.......खूप प्रेम आहे".
तो म्हणाला,
"काय म्हणालीस?मला ऐकायला नाही आलं....कालपासूनकमी ऐकायला येतंय...
आणि
आता गालावर काय केलंस??????माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...काही जाणवतच नाहीयेय....पुन्हा कर बघू".
लाजली ती...म्हणाली..."हो का?......बावळट....."

आयुष्याची सुरेल स्वप्न..

तो: काय ग...
आज रडलीस वाटत?


कोणाशी तरी भांडलीस वाटत?


ती: तुला कस कळाल?

तो: हो कि नाही ते सांग...

ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना...

तो: कळाल कस तरी...

 
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?...
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?...
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?...
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?....
कस कळत रे तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?...
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?...
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?...
सांग ना...
कस कळत रे तुला, माझ्या मनातल सगळ?...

तो: आग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार....
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार...
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार...
सांग ना...
कोण सांभाळणार..
हे ऐकून ती हस्ते,
अलगद त्याच्या मिठीत जाते...
प्रेमाचे ते गोड शब्द बोलते...
अन आयुष्याची सुरेल स्वप्न रंगवत सुटते...
आयुष्याची सुरेल स्वप्न..
ती रंगवत सुटते...

त्यावेळी मी १० वर्षाची होती...


१३ वर्षाच्या एका मुलाला रस्त्याच्या बाजूला एका १० वर्षाच्या सुंदर मुलीचा फोटो सापडतो....
अन तो मुलगा तिच्या प्रेमातपडतो... LOVE AT FIRST SITE वाले प्रेम...
त्याचे प्रेम त्यीच्याबद्दल दिवसेनदिवस वाढतच जाते...
तो त्या मुलीवर खूप प्रेम करायला
लागतो...
पण तो कधीच तिला भेटू शकत नाही...
***************
नंतर त्याचे लग्न होते....
पन बायाको ला तो खर प्रेम देवू शकत नाही....
खूप वर्षानंतर त्याची बायको फोटो पाहून त्याला विचारते...
तुम्हाला हा फोटो कुठे भेटला..??
तो विचारतो,
का..??
ती बोलते - मी हा फोटो लहानपणी हरवला होता,
त्यावेळी मी १० वर्षाची होती...

तुम्हाला प्रेम झालंय का नाही? हे ओळखण्याच्या आठ निशाणीयाँ

तुम्हाला प्रेम झालंय का नाही? हे ओळखण्याच्या आठ निशाणीयाँ 

१)तुम्ही त्यांचे sms पुन्हा पुन्हा वाचता.. 

२)तुम्ही त्याच्यासमोर यायला घाबरता 

३)जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी विचार करता तेव्हा तुमचं हृदय जोरजोरात धडकु लागतं, 

४)त्याचा नाव ऐकुन आनंदाने एक आपसुक हसु चेहर्यावर उमलते.. 

६)तुम्ही त्याच्यासाठी काहीही करु शकता...

 ७)हा लेख वाचताना देखील तुमच्या मनात त्याच्याविषयीचाच विचार आहे.. 

८)तुम्ही त्याच्या विचारात इतकं गुंतलाय की यामधला पाचवा पॉँईँट मिसिँग आहे, हे देखील कळलं नाही तुम्हाला.... हो रे प्रेम हे असेच असते...

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम..

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर
प्रेम..
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा..
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून..


ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा..

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज
आहे..

ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज
हात जोडत जा..

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता..

ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत
जा..

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात
विरहात तुझ्या..

ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा..

मी म्हणालो ऋतू सुध्दा माझ्यावर हसतो आहे..

ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा..

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू..
तेव्हा मात्र

ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातचं
कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम
करण्याची..

ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव
अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट
बघायची तुझी सखे..

ती म्हणाली नेहमीचं तू तरसवतोस मला आता तू
ही तरसून बघत जा.....

आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???

आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???
.
.
.
.

.
.
जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही ते तोडता...ती आवड
पण
जेंव्हा एखादं फुल चांगलं वाट्टे
आणि तुम्ही त्याला पाणी घालता...ते प्रेम

मन उधाण वार्याचे(एक प्रेमकथा)

मन उधाण वार्याचे(एक प्रेमकथा)

स्वरुप हे अंजलीचे शिक्षक होते.दोघांच्या वयामध्ये जास्त काही अंतर नव्हतंच मुळी.स्वरुपचंअंजलीवर खुप प्रेम होतं.एक दिवस योग्य वेळ बघुन त्याने ते व्यक्त केलं.अंजलीनेही आपल्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळतोय म्हणुन त्याला होकार दिला.त्यांचं लग्नही झालं.पण लग्नाच्या काही दिवसानंतर अंजलीला कळु लागलं की,स्वरुप आपल्यामध्ये पुरेसं अंतर बाळगतोय जे न

वरा बायकोमध्ये कधीचअसत नाही.तिला हेच समजत नव्हतं कीतो असं का करतोय?प्रेमामध् ये त्यानेच पुढाकार घेतला असतानासुद्धा, मनाविरुद्ध लग्न लावुन दिलेल्या माणसासारखा तिला स्पर्शही करत नव्हता.ही बाब तिने त्याच्या काकांना सांगितली.
त्याचे काका एक मनोवैज्ञानिक तज्ञ असल्याने ते त्याची मानसिक स्थिती योग्य पद्धतीने समजु शकतील असं तिला वाटत होतं.काकांनी एक दिवस हवापालटचा बहाणा करुन माझ्याकडे स्वरुपला घेउन यायला सांगितलं.ठरल्या प्रमाणे ती घेऊन आली.योग्य ती वेळबघुन काकांनी स्वरुपला संमोहीत केलं.आणि त्या अवस्थेत काकांनी त्याला काही प्रश्ने विचारली.विचारले ल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली.नंतर त्याला नॉर्मल स्थितीतआणलं गेलं.
काका अंजलीला,स्वरुपक डुन मिळालेली सर्व माहीती एकांतात सांगु लागले....
स्वरुपचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.त्याच्या जन्माच्या दोन वर्षानंतरच त्याचे वडील वारले.त्यामुळे त्याला आपल्या आईजवळच झोपायची सवय लागली.तो कधीही त्याच्या आईला सोडुन दुर झोपलाच नव्हता.आईचं प्रेम म्हणजेजवळजवळ त्याच्यासाठी व्यसनच झालं होतं.पण त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आईचा मृत्यु झाला.त्याचा जबर आघात त्याच्या मनावर झाला.अचानक बदललेली ही परिस्थीती त्याचं मन,त्याचा मेंदु स्वीकारु शकत नव्हता.पण त्यावेळी त्याच्या मनाजवळ/ मेंदुजवळ ही परिस्थिती स्वीकारण्याशिवा य दुसरा पर्यायचनव्हता.त्यामुळे त्यावेळची मानसिक स्थिती त्याला दाबावी लागली.दहा वर्षाँनंतर जेव्हा तो शिक्षक होता तेव्हा तु कॉलेजमध्ये नवीन अॅडमिशन घेतलंस.आणि इतकी वर्षे पर्याय नसलेल्या त्याच्या मनाला आई मिळवण्याचा एक पर्याय मिळाला.कारण तुझ्या आणि त्याच्याआईच्या चेहर्यात जवळजवळ 70%साम्य आहे.त्याची वास्तविक स्थिती आणि त्याचं बालपण अशा दोन वेगळ्या स्थितींचं त्याच्या मेंदुत एक प्रकारचं जबर एकत्रीकरण झालंय.जे एकमेकांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळेच त्याच्या बालपणातली आई मिळवण्यासाठी त्याच्या तरुणपणाने तुझ्याशी लग्न केलंय.....
मनोवैज्ञानिक असणार्या काकांचं हे बोलणं ऐकुन तिच्या पायाखालची जमिन सरकली.तिच्या मेँदुतल्या सगळ्या तारा तुटल्यासारखं तिला वाटु लागतं.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असंही घडु शकतं याचा तिला विश्वासच बसत नव्हता.अंजली काकांना विचारते,मग स्वरुप बरा कसा होऊ शकतो हे सांगाल का?
सांगतो....हे बघ नवरा बायकोच्या बाबतीत स्त्रियांना नॉर्मली असं वाटत असतं की,शरीरसुखाच्या बाबतीत त्यांच्या नवर्याने प्रामुख्याने पुढाकार घ्यावा.पण तुझ्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे.इथे शरीरसुखामध्ये पुढाकार तुला घ्यायचाय.जर तु शरीरसुखामध्ये स्वतःहुन पुढाकारघेतलास आणि त्याच्या मनातल्या तारुण्याच्या भावना जागृत करु शकलीस.तरच तुझा स्वरुप तुला मिळु शकेल.कारण त्याचं तरुणपणच त्याच्या बालपणावर मात करु शकतं..समजलं...ह ो समजलं काका.पुर्ण समजलं,मी तुमची खुप खुप आभारी आहे.मी असंच करेन.
सहा महीन्यानंतर मिठाईचा बॉक्स घेऊन अंजली आणि स्वरुप काकांकडे येतात.अंजली काकांना म्हणते,ही मिठाई कशासाठी माहीतीये का काका?आज मी दोन महीन्यांची गर्भवती आहे.त्यासाठीची आहे ही मिठाई.हे ऐकुन काका दोघांना शुभेच्छा देतात.आणि स्वरुपला ही मिठाई काकुंना देऊन येण्यास सांगतात.स्वरुप आतमध्ये जाताच,अंजली बोलु लागते,काका तुमचे आभार कसे मानावे हेच कळंत नाहीये मला,मी तसंच केलं जसं तुम्ही सांगितलं होतं.त्याने खरंच खुप फायदा झाला आणि आतातर खुपवेळा स्वरुपच अशा गोष्टीँसाठी पुढाकार घेतो.तो प्रचंड रोमँटीक आहे जे मला खुपच आवडतं.
अगं हेच तर हवं होतं मला तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगताय याशिवाय मला आणखी काय हवं.....
मित्रांनो मी लिहीलेल्या कथा या दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पोस्ट होतात....
Story presented by एक प्रियकर

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1
अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेँड्स होते,पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले,जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला,चार पाच वर्षांच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली,पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्याने तिथे ओळखीचं असं नव्हतंच कोणी.पण मुंबईत गेल्यावर कळलं कि इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे.काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्
ता शोधुन काढला.घरात प्रवेश करताच त्याला जयश्री दिसली.जयश्रीचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ त्याच्या मनात काहुर निर्माण करुन गेलं.अतुलला पाहुन जयश्रीलादेखील आश्चर्य वाटलं.पण थोड्या वेळेच्या शांतते नंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं.ती म्हणाली,आमच्या लग्नांनंतरच्या तीन वर्षांत त्यांना एका अपघातात ते गेले..
तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला..शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता.त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी त्याला सांगितली,तिला आनंदझाला.पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली,तु इथेच राहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल.पण तो म्हणाला,अगं पण तुझे mistar नाहियेत ना आता,त्यामुळे लोक उगाच गैरसमज करुन घेतील त्यामुळेनको.
अरे लोकांना हजार तोँडं असतात,पण सत्य तर एकच असतं ना?त्यामुळे तु इथे बिनधास्त राहा मी लोकांची परवाह नाही करत..
त्यानंतर ते दोघे एकत्रच राहु लागले..दोघांचेह ी workind periods जवळ जवळ same असल्याने,ते एकत्र जेवण घेऊ लागले,एकमेकांसो बत वेळ घालवु लागले.कंटाळवाणं आयुष्य जगणार्या जयश्रीच्या जीवनात रंग चढु लागला,एकमेकांसो बत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परतआल्यासारखे भासु लागले.
अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा.म्हणुन जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलवर ठेवुन जायची.नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा.
हळुहळु त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली.लोक त्यांच्या विषयी कायकाय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही.अतुल हळुहळु जयश्रीच्या प्रेमात पडला होता.शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली.जया लगेच त्याच्यावर भडकली,मी तुला फक्त एक चांगला मित्र मानत होते,पण तु असं बोलुन आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस.एका विवाहीत स्त्रिलाअसं विचारणं तुला शोभतं का अतुल?
अगं पण तुझा नवरा या जगात नाहीये,आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर...
पण मला हे मंजुर नाहीये,मी माझ्यानवर्यावर अजुनही खुप प्रेम करते,आणि मी त्याला विसरु शकत नाही..
.
ठीकेय तुझी जी इच्छा असेल ती मला मान्य आहे,असं बोलुन तो झोपी गेला.सकाळी जया उठुन त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन जॉबवर निघुन गेली.दुपारी launch time मध्ये जेव्हा ती घरी आली तेव्हा तो नाष्टा तसाच टेबलवर होता.आणि एक चिठ्ठी तिथे होती.त्यामध्ये त्याने आत्तापर्यँत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते.आणि तो तिथुन निघुन गेला होता.
तिने अतुल जिथे काम करतो तिथे त्याची चौकशी केली,पण कळलं कि अतुल राजीनामा देऊन काम सोडुन गेला आहे.
दिवसामागे दिवस जात होते,तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली.जेवताना त्याच्या बरोबर केलेली मस्ती,एक मेकांसोबतकेलेले छोटेमोठे वाद तिला आठवु लागले.हळुहळु तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत गेलं,त्याची आठवण सतावु लागली.सर्व गोष्टी समोर असायच्यापण मन सैरभैर असायचं.कशातच लक्ष लागेनासं झालं.तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीणिला सांगितली,मैत्री णीने सांगितलं की,तुझं प्रेम जडलंय त्याच्यावर.जर खरंच या परिस्थितीतुन तुला बाहेर यायचं असेल,तर अतुलशी तु लग्न करुन टाक.आणि तसंही तु या समाजाला जुमानत नाहीस,त्यामुळे त्यांची तु अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस.तिचं म्हणणं जयाला पटलं.दिवसभराची रजा टाकुन ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली.तिथे त्याची म्हातारी आई होती.याआधीही आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच.अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या,तो सकाळपासुन बाहेरच आहे,कुठे गेलाय ते नाही माहीती.हळुहळु वेळ पुढे सरकत होती,जया तिची वाट पाहत होती.जेवणेही त्यांनी उरकुन घेतली.पण अतुल अजुन आला नव्हता.सायंकाळच े चार,चाराचे पाच वाजले.दुसर्या दिवशी कामावर हजर राहायचं होतं.शेवटी वैतागुन जयाने आईँचा निरोप घेतला,आणि ती मुंबईच्या गाडीत बसली.गाडी चालु झाली,त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती.गाडीतुन जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं,जुन्या आठवणी त्याज्या झाल्या.गाडी थांबवुन ती थोडावेळ उतरली.कॉलेजचे गेट,क्लास हे बघुन आपण केलेला दंगा,मागे बसुन मैत्रीणीँच्या काढलेल्या खोडी,कॉलेजचे तास चुकवुन कॅँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवु लागल्या.
.
काय झालं जयाचं?काय अतुलचं प्रेमयशस्वी झालं?जयाला अतुलची साथ लाभली?अतुल गेला कुठे? या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर थोड्याच वेळेत ईथेच या प्रेमकथेचा उर्वरीत भाग प्रदर्शित होईल तोपर्यँत वाट पहाया कथेच्या पुढच्या भागाची.......


एक मिश्कील प्रेमकहाणी(भाग २)
या कथेचा हा दुसरा पार्ट आहे,हा वाचण्याआधी काल पोस्ट झालेली कथा"एक मिश्कील प्रेमकहाणी"ही वाचा.तरच हा भाग तुम्हाला समजेल....
part 2
त्या निश्चल स्टेजकडे पाहुन अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला,ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं.जे तिला प्रचंड आवडलं होतं.बंद वर्गाँवरून नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती,ज्याचा दरवाजा उघडा होता,तिला वाट

लं कदाचित तिथे कोणीतरी असावं.ती आत गेली,तर खिडकीतुन सुसाट येणार्या वार्याने एका बॅँचवर ठेवलेली एक notebook जिची पाने आपोआप पलटत होती.तिने ती खिडकीची दारे बंद केली,आणि ती notebook आपल्या हाती घेतली.जेव्हा तिने पाहीलं कि यात लिहीलेली कविता कुठेतरी वाचली आहे.तेव्हा तिच्या लक्षात आलं कि ही कविता अतुलनेच लिहीली होती,जेव्हा college चा शेवट दिवस होता त्याच वेळी ही कविता त्याने सर्वाँसमोर वाचली होती.त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कि अतुल ईथेच कुठेतरी आहे.तिने कॉलेजभर त्याची शोधाशोधसुरु केली.तो कुठे सापडत नव्हता.शेवटी ती टेरेरेस वर त्याचा शोध घेत गेली.अतुल टेरेरेसच्या कडावंर दोन हात टेकवुन,येणार्या हवेची झुळुक डोळे झाकुन अनुभुवत होता,त्याला पाहताच जयाच्या डोळ्यातले अश्रु थांबले नाहीत.आणि आनंदाच्या भराततिने पळत जाऊन अतुलला मागुन मिठी मारली.
अतुलचे डोळे मिटलेलेच होते.तो म्हणाला,आलीस तु, किती वाट पाहीली तुझी.मला माहीती होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता.काय जादु आहे या प्रेमात....आता नाही ना सोडुन जाणार मला?
नाही रे माझ्या राजा,कधीच नाही.तु दुर गेल्यानंतर कळलं,कि तु किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या....त् यामुळे मी कधीच तुला नाही सोडुन जाणार.......
.
मित्रांनो ही होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी,अतुल ने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज,आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवसरोप होईल,रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा म्हणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याला त्याचं प्रेम मिळवुन दिलं......
तर मित्रांनो कथेतुन घ्यायचा बोधतो एवढाच की,आपण म्हणतो की "माझं या मुलीवर प्रेम आहे/मुलावर प्रेम आहे."
या वाक्यातला बाकीच्या गोष्टी ठीक आहेत हो,पण प्रेम,प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय गृहीत धरता ते महत्त्वाचं आहे."प्रेम"या शब्दात अक्षरे जरी अडीच असली तरीही,त्या अडीच अक्षरांसोबत खुपशा गोष्टी जोडलेल्या असतात,ज्यांचा आपण रिलेशनशिपमध्ये असताना कधीही विचार नाही करत.त्या गोष्टी म्हणजे,विश्वास, समजुन घेणे,वेळोवेळी प्रेमाची जाणीव करुन देणे,कठीण प्रसंगी साथ न सोडणे,त्याग,निष ्ठा,आपुलकी....
एका typical महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या हे शब्द डोक्यावरुन जातील पण खर्या प्रेमाची जाणीव असणार्याँना त्यांचा अर्थ आणि महत्त्व नक्कीच समजेल.......





तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस
ना ?

 तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ
सोडते का, मी तर तुझी सावली आहे.. 

ती : पण मग अंधारात ? अंधारात
जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण
मला विसरशील ?

मला अंधाराची खुप
भीती वाटते रे.... 
तो : भिवु नकोस...
मी आहे ना...
अंधार पडला तर
मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना... 
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात
जगावं लागलं तरी चालेल ...

तुझ्या पेक्षा लवकर जात आहे...

एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये
रोज भेटला जात असे...
.
मुलगा रोज वेळेवर जात होता,
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..

. पण तो कधीही तिच्यावर नाराज होत
नव्हता.....
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्कला येत
नाही म्हणून ती मुलगी रागाने घरीजाते.....
. तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड cancer
आहे.....
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणिती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते......
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते, आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे आणि तिथे
मी तुझी वाट पाहीन"..