शनिवार, ९ मार्च, २०१३

तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं....



तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
आपण
दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून,
तोडकं मोडकं का होईना,पण
आपला दोघांचं छानसं असं घरटं बांधायचं,
दोघानी एकाच ताटात जेवायचय, ...
मग थोडसं उपाशी राहून
पन सोबत जेवताना एकमेकांना भरवत,
मग मात्र पोटभर जेवायचं,
तूला आवडत ना म्हणून एक घरटं
बांधायचं……..
थंडीत कूडकूडताना थोडी तूला थोडी मला
असं करत एकाच चादरीत झोपतांना,
तूझ्या प्रेमाच्या उबेत मात्र,
मला संपूर्ण आयूश्य घालवायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं
बांधायचं……..
खूप खूप प्रेम करतांना, थोडसं तुझ्यावर
रागवायचंय,
तूझा प्रेमात प्रत्येक दिवस
नव्या उमेदिने जगायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
तोडकं मोडकं का होईना,पण आपल्या दोघांच छानसं असं घर
बांधायचंय……….
♥♥♥

भेदक नजर तुझी ...

Photo: भेदक नजर तुझी ...
डोळ्यांना थेट भिडते,
हृदयात तुझी प्रतिमा...
परफेक्ट सेट होते.
नाजूक स्माईल तुझी...
अशी काही जादू करते, 
कधी कधी मला ...
एकटेच हसवत बसते.

एक विलक्षण प्रेमकथा...

Photo: एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे
रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work
मध्ये असणारा निरव दररोज
संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य
कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey
dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय
अदितीला कधी झोपच यायची नाही.एक
दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं
त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन
नीरव तिला घरी घेऊन
गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं
सांगितलं.त्याच्या आई
वडीलांनी मोठ्या मनाने
त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते
कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार
करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त
केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं
मागितलं
की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं
आहे तुझ्याकडे..निरवने मागणं मागितलं
कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते
तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त
करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण
तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं
काही थांबलं नव्हतं.
एक दिवस
अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन
दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर
जोराचा अपघात होतो.त्यामध्ये
त्याला त्याचा जीव
गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण
ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं
काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु
शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप
नंतर
जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे
आईवडील त्याच्याविषयी सांगणं
टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने
तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल
ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार
का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं
कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व
हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न
पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?
गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये
आहोत,त्याने मला कालच तर call
केला होता.ती तिच्या cellphoneमधील
recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन
पाहताना तो नंबर बिझी दाखवत
असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन
देण्यासाठी सांगते कि निरव every
evening 9.pmला मला कॉल
करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल. उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर
विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच
तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन
बाजुला तिघे जण बसलेले
असतात.तिघांच्याही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्याही मनात
एक चलबिचल
आणि भीती असते.घड्याळात 9
चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग
वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन
लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन
त्याच्या आई वडीलांना हा विश्वास
पटतो की हा निरव आहे
तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!
दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत
की मी मेलोयते अगदी खरंय.. अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत
कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने
देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण
करण्याचे
मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस
तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच
इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं
आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर
बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु
नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने
ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण
तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते
तुला मिळो,आणि देवाने
तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल
उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास
सांगतो आणि लगेच फोन कट होतो.... अदितीच्या मनातला एक प्रश्न तर
अनुत्तरीतच
राहतो की निरवची तिसरी wishकाय
होती.
.
. .
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे
झाली.ती एका श्रीमंत घरात
नांदतीये.संध्याकाळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग
वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन
आवाज येतो,hey i love u dear!निरव
हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर
तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच
बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर
असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन
ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन
वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन
हसत असतो.आत्ता तिला कळतं
की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish
कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज
तिने तीच्या मुलाच्या रुपातील
निरवला मिठीत घेऊन मोकळीक
दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं
झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप
वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान
मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य
किंमत कळत नाही.अन
जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत
ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत
राहीलेली नसत

♥ " माझे डोळे, तुझे झाले पाहीजे..........
तेव्हाच तुला कळेल
माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते
माझे हृदय, तुझे झाले पाहीजे .........
तेव्हाच
तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून
येतील माझे कान , तुझे झाले पाहीजे ..........
तेव्हाच
प्रत्येक
क्षणाला माझ्या मनातून निघणारा आवाज
(I Love You) हा तू ऐकू शकशील!!" ♥ ♥
you
can not even imagine how much I love
you ♥

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

माझ्या चारोळ्या 4

माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद



 
हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले

रविवार, १३ जानेवारी, २०१३

तुला पहिले कि...


भेट आपली...


गुरुवार, १० जानेवारी, २०१३

सुविचार 1






रविवार, ६ जानेवारी, २०१३

आठवते आपली ती पहीली भेट...

आठवते आपली ती पहीली भेट
एकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहीली
... भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशी माझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहीली भेट
पुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनात
मी एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहीली भेट
मन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलत मनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहीली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरी तुझ्या अंतरी ऊरून आहे..

विस्तीर्ण नभाच्या खाली...

विस्तीर्ण नभाच्या खाली...






बुधवार, २ जानेवारी, २०१३

मराठी चारोळ्या प्रेम संग्रह YOUTUBE वर

मराठी चारोळ्या प्रेम संग्रह YOUTUBE वर
खालील लिंक ला नक्की भेट द्या VIDEO पाहण्यासाठी. . .











शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

प्रेमाची परिभाषा. . .



प्रेम ♥
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत
नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...
...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक
भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....♥♥♥

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।



रागवू नकोस मला
मनवता येणार नाही,

लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

... डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ
नाही......
असं मी म्हणतं नाही कारण.... तुझ्याशिवाय जीवनात जीवच
राहणार नाही।

गरज आहे आज मला...


गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या आधाराची

अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

...
गरज आहे आज मला....♥.
त्या तूझ्या मोहक मिठीची

दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून
टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या कोमल प्रीतीची

भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला....♥.
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची

सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे....♥.

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

तो बॉयफ्रेंन्ड असतो. .


 आपली चूक
असताना जो माफी मागतो,
तो प्रामाणिक असतो..
आपली चूक आहे की नाही,
याची खात्री नसतानाही जो माफी मागतो,
तो शहाणा असतो..
आपली चूक
नसतानाही जो माफी मागतो,
तो बॉयफ्रेंन्ड असतो..:p:p:p
बरोबर ना ?????

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

चारोळ्या


चारोळ्या. .





सुपर प्रेम कविता. .





 मिठीतल्या कविता..



शनिवार, १ डिसेंबर, २०१२

स्मितहास्य . .



प्रियकर :- एक सांगू

प्रेयसी :- सांगना.

प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे

प्रेयसी :- मी एक सांगू

प्रियकर :- सांगना

प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे !!! ♥

♥ Love is not taking a credit but giving a credit, is't keep loving .... ♥

प्रेमाची किंमत. .

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती ?


प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :- "आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते. .



"एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे, हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर पर्या त्यांच्याकडे पाठविल्या,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर पर्यांना बघून ती आश्चर्य चकित झाली, तेव्हा ....

पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........

बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नवर्याला म्हणाली, "आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे".

नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.

त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको"

तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे आश्चार्यची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील आत आल्या.

त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ," जर तुम्ही पैसा-परी निवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या, पण देवाच्या नियमा प्रमाणे जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हणतले तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत" ♥ ♥ ♥

तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी, "प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००% खरे आहे", म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे"

♥ " Love is what all we need .... Keep Loving Truly ♥