तिची प्रेमपत्रे... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तिची प्रेमपत्रे... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२
गुरुवार, ५ जानेवारी, २०१२
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११
रविवार, २ ऑक्टोबर, २०११
आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर...
प्रिय सुनिता,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.

तुझा प्रियकर
बंड्या
बंड्या
लेबल:
तिची प्रेमपत्रे...
शनिवार, ११ जून, २०११
तिची प्रेमपत्रे...,
प्रिय हर्षु...
शाळेत ले ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची.नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! . नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. शाळेचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते.
पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?
- तुझीच,
अनामिका
लेबल:
तिची प्रेमपत्रे...
शनिवार, २१ मे, २०११
तिचे प्रेमपत्र 1
“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.

सख्या हर्शल,
तू माझ्या आयुष्यात आलास , तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही , की मी केव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला , तेव्हाही मला वाटत नव्हतं , की मी प्रेमात पडले आहे. या २८ एप्रिलला आपल्या प्रेमाला चार वर्षं पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या चार वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसणं , थोडंसं हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झालं नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे , की फक्त चेहऱ्याच्या हालचालीवरून आपल्याला काय बोलायचं आहे , हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस , असं तुला का वाटतं ? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे , त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , की पुढे काय होईल , याची कल्पना नाही. आपला विश्वास , आपलं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्यातील नि:स्वाथीर् , निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना , की आपलं प्रेम फार वेगळं आहे... ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत राहायचं असतं. कधीकधी वाटतं , की तू एवढं करतोस , तर मीच कमी नाही पडणार ना ? कुठे कमी पडले किंवा काही चुकलं , तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान छान लिहिता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना , काहीतरी लिहित जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही , त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस , मला समजून घेतलंस , खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे , ' हृदयाचा ठोका चुकला तरी , तू मात्र चुकू नकोस , प्रेमाचं नातं परी , साथ कधी सोडू नकोस... '
लेबल:
तिची प्रेमपत्रे...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)