माझ्या चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

माझ्या चारोळ्या 4

माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद



 
हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले

रविवार, ६ जानेवारी, २०१३

विस्तीर्ण नभाच्या खाली...

विस्तीर्ण नभाच्या खाली...






बुधवार, २ जानेवारी, २०१३

मराठी चारोळ्या प्रेम संग्रह YOUTUBE वर

मराठी चारोळ्या प्रेम संग्रह YOUTUBE वर
खालील लिंक ला नक्की भेट द्या VIDEO पाहण्यासाठी. . .











मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

चारोळ्या


चारोळ्या. .





शनिवार, १ डिसेंबर, २०१२

प्रेमाची रांगोळी. .

" होळी असो वा दिवाळी

श्रीखंड असो वा पुरणाची पोळी


कधीच विसरू नका काढायला 


प्रेमाची रांगोळी "

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

माझ्या चारोळ्या. .









शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२


मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

भावना अंतरीच्या


विचारातून काढलाय केव्हाच तुला
पण माझ्या काव्यातून तू जात नाही
काळजात बसला तू असा कि
तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!!
-भावना अंतरीच्या

रविवार, २२ जुलै, २०१२

तु मला भेटतेस रोजच...

तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,
Photo: तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,

हुरळून जातो मी त्या एका स्पर्शामधे,



मधेच कधि जाग न यवी तु स्वप्नी अस्ताना

पहुडून जावे आपण दोघे चीम्ब ओल्या काळोखामधे…. <3



रविवार, २२ एप्रिल, २०१२

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!


शुक्रवार, २३ मार्च, २०१२

चारोळ्या

मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना..?
-
... ... तुला स्वप्नातही वाटणार नाही
इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
-
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
-
स्वप्नांच्या दुनियेत हरवशीलही तू
अवकाश्यात उंच झेप घेशीलही तू,
मात्र माझ्या इतके प्रेम करणारे हृदय
सांग सखे, पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू..?

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

चारोळ्या..


तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले
-- शुभा


जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो
-- शुभा


मी रोज खिडकीत उभी असते
तु येतोस का ते पाहण्या साठी
ये ना कधी तरी असाच
माझं मन राखण्या साठी
-- शुभा

रविवार, २५ डिसेंबर, २०११

खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!

आजहि मन माझे खूप उदास....
अजून होतो तुझ्या त्या ,
आठवणींचाच आभास ....
होत नाही आजही विश्वास....
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

माझ्या चारोळ्या..

माझ्या चारोळ्या..




 

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

आयुष्यातील सारे रंग तुझ्यातच आहेत ♥

♥ एक स्मितहास्य ♥
तुझ्या गालाला लाल रंग देते
तुझ्या दातांना पांढरा रंग देते
तुझ्या ओठांना गुलाबी रंग देते
तुझ्या डोळ्यांना चंदेरी रंग देते
म्हणून नेहमी हसत रहा .............. आयुष्यातील सारे रंग तुझ्यातच आहेत ♥

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

माझ्या चारोळ्या ...

माझ्या चारोळ्या
वाळवंटात हरवले
तरी जगण्याची जिद्द आहे 
कुठंच नसले म्हणून काय झाले 
माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे!
 
 
 
 
प्रेम खरे कि खोटं  हे,
कधीच कळलं  नाही मला,
पण ज्या वळणावर आणून सोडलेस,
आता अवघड जातंय परतणे मला..
 
 
 
त्याने मागितलेच नाही,
जे मी गमावत गेले..
त्याने गमावले जे माझ्यात,
ते मी मागत गेले.. 
 
 
 
 माझे मन माझ्यासोबत नाही,
हे मला कळलेच नाही,
ते केव्हाचं तुझंच झालंय,
ते तुला अजून उमगलंच नाही..
 
 
 
तू नसलास समोर जरी,
शब्द कानात कुजबुजतात,
दिला नसलास होकार तरी,
स्वप्ने मनात गजबजतात.
मला वाट पाहायला लावं,
आता हे ही मला चालेल,
पण मी वाट पाहतेय तुझी,
हे तू विसरून कसं चालेल..?
 
 
 
प्रेम कसे असावे,
निस्वार्थी  अव्यक्त,
काहीही  न बोलता व्हावे..
अर्थपूर्ण व्यक्त..

माझ्या चारोळ्या ...



रविवार, २९ मे, २०११

चारोळ्या भाग 2





रविवार, २२ मे, २०११

दोन शब्द माझे...



दोन  शब्द  माझे
दोन शब्द  तुझे 
हृदयाला  स्पर्श करून गेले
त्यातूनच आपले नाते 
पक्के जडून गेले...


तूच आहेस रे राजा
सख्या माझ्या ह्रदयाचा,
मनातही केव्हाच बहरलाय
वसंत तुझ्याच प्रितीचा.



************************************


नाजूक माझ्या ह्रदयाला
नेहमीच तू फुलासारखं जपतोस,
तुझ्या प्रेमाच्या सहवासात
कोमेजलेल्या मनालाही फुलवतोस.



************************************


माझ्या आयुष्यातील तुझं अस्तित्व
नाही ठरवू शकत दुसरं कुणीही,
कारण आपल्यामधील प्रेमाचं नातं
नाही पोकळ इतकंही.



*****************************

तुझ्या प्रेमाची ओंझळ
सदैव सोबत राहू दे, 
माझ्या सहवासाच्या प्रकाशात
कीर्ती तुझी सर्वदूर पसरू दे.



*****************************


स्वप्न की सत्य
खरे की खोटे?
प्रेमात पडल्यावर
फायदे की तोटे?



********************


प्रेमात नसते जबरदस्ती
हवा मनापासून स्विकार,
शेवटपर्यंत करणार असाल
तरच दया तुम्ही होकार.



********************


एकटक तुझं ते पाहणं
माझ्यातल्या मी ला हरविणं,
शिरून तुझ्या बाहुपाशात
माझा मग जगालाच विसरणं.



*********************


आतुर आपण दोघं
एकमेकांच्या सहवासाठी,
गर्दीतही फिरतो असे
जणूकाही अनोळखीच सर्वांसाठी.



********************


हातात हात अन
धुंद पावसाची रात,
एकाच छत्रीत दोघं
करूया प्रेमाची बरसात.



*********************


मिठीत तुझ्या स्वर्ग माझा
डोळ्यांत पाहता प्रेमाचा झरा,
सहवास हवासा वाटे क्षणोक्षणी
स्पर्श सर्वांगावर मोरपिसापरी
उधळून टाकावेसे वाटते रे सख्या
अश्यावेळी स्वत:स तुझ्यावरी.

- संतोषी साळस्कर.