बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

♥ "जरा ऐक ना, काहीसांगायचे आहे तुला....... ♥,
तुला भेटताना....... होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला,
तुला पाहताना.......... हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला,
तुझ्या बरोबर चालताना........... हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला,
तू सोबत असताना....... सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला,
तू नसताना........... तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला,
तुज्या बरोबर बोलताना......... होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा........ हे सांगायचे आहे तुला,
तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.........
प्रेमातील नाजूक भावना सांगायच्या आहेत तुला"

आहेस तु म्हणुन...


विचार करावा बोलण्याआधी...

किती प्रेम करतेस माझ्यावर..?
किती प्रेम करतेस माझ्यावर..?
ब~याच दिवसांनी भेटले होते काय बोलू काही कळत नव्हते..
त्याने विचारले किती प्रेम करतेस माझ्यावर..?
नाही रे सांगता येणार शब्द नाही तेवढे पुरेसे तू संग किती प्रेम करतोस माझ्यावर..
सागराची खोली कमी पडेल आकाश पालथे घातले तरी माझे प्रेम पुरून उरेल.
चालल्या होत्या गोष्टी नंतर फार त्याच्या मनात आला एक विचार
"ए सांग ना माझ काही उद्या बर वाईट झाल तर काय करशील.? तरीही माझ्या वर प्रेम करशील कि मला विसरून जाशील..?
तुला आनंद होईल कि रडत बसशील .?"
तिच्या मनात न जाणे काय आले.. थोडी थट्टा करूया म्हणून मनात आले
"मी ना मी ना! खूप आनंदी होईन मला खूप आनद होईल. सुटका होईल माझी मी सुखी होईन..."
तो पुढे काही नाही बोलला त्याने तो विषय तिथेच सोडला
दुसर्या दिवशी ना फोन ना sms आला,फक्त एक निरोप आला "तुझ्या सुखासाठी काहीही.."
जाता जाता एवढंच तो म्हणाला...
जाता जाता एवढंच तो म्हणाला...
सांगणे एवढेच कि "विचार करावा बोलण्याआधी" नंतर वेळ नाही मिळत चूक सुधारण्यासाठी

जन्मांतरीचे प्रेमतरंग ...!



माझ्या हरेक श्वासात
तुझा प्रिये ध्यास ,
माझ्या हरेक स्वप्नात
तुझ्या मिलनाचा भास !

माझ्या हरेक कामात
तुझाच ग सखे सहवास ,
माझ्या हरेक यशात
तुझ्या प्रेमाचा विश्वास !!

माझ्या हरेक हास्यात
प्रिये तुझेच मनतरंग ,
माझ्या हरेक जन्मात
जन्मांतरीचे जपलेले प्रेमतरंग ...!!

तू.......फक्त तू...

 
तप्त उन्हात मिळालेली सावली म्हणजे तू,
तहानलेल्या ओठांना मिळालेला पाण्याचा एक थेंब म्हणजे तू ,
जगण्यासाठी मिळालेला एक श्वास म्हणजे तू ,
दृष्टी नसलेल्या डोळ्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजे तू ,
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
वाट चुकली कि सरळ मार्गाने नेणारा तू ,
माझ्या पायात काटा रुतला तरी स्वताचे लपवून अश्रू पुसणारा तू ,
पावसात भिजताना छत्री नसताना डोक्यावर हाथ ठेवणारा तू ,
माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी अगदी विदुषक झालेला तू ,
अजून कसे सांगू कि माझ्यासाठी कोण आहेस तू ,
माझा अर्धवट शब्द पूर्ण करणारा तू,
मी काहीच न बोलता समजून जाणारा तू ,
माझ्यासाठीच जगणारा तू , माझ्याशिवाय काहीच न समजणारा तू ,
माझे सर्वस्व आहेस तू ......फक्त तू
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस 
तू.......फक्त तू...

तुझी वाट पाहतो तेंव्हा....

 
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
सांज वेळेची आठवण येते
तुझ्या पाउल खुणांची 
किती दाटण होते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
केवड्यांची त्या आठवण येते
मी आणलेल्या गजरयांची
परत एकदा साठवण होते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...
तुझी वाट पाहतो तेंव्हा
मनात मेघांची अडचण होते 
ओल्या चिंब पावसात मग 
मन माझे न्हाऊन घेते....
तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची ती साद येते 
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....
तुझी वाट पाहतो तेंव्हा 
जड माझी पापणी होते
तुझ्या संसारातल्या वसंतान 
थोडीशी ती हलकी होते... 
खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!!

भेट तुझी स्मरताना...

 
भेट तुझी स्मरताना
भेट तुझी स्मरताना तो क्षण हवासा वाटतो.
न कळत येणाऱ्या आठवणींना , हे हसू आवरेनासं होतं.
अबोल माझ्या ओठांना, तुझ्या ओठांनी चव दिली.
एकाच ठिकाणी तासंनतास बोलण्याची सवय लावली.
विषयाचं ताळ तंत्र दोघांनाही नाही.
काहीही बोलत असतो. जे दोघांनाही पटत नाही.
भेट तुझी स्मरताना
त्या आठवणीत रमून जावसं वाटतं
तासंन तास तुझ्या मिठीत स्वतःला जखडून घ्यावसं वाटतं.
चुंबनाच्या स्पर्शाने, तुला रोमांचित करावसं वाटतं.
अंग अंग शहारुन, तुला वेडां पिसं करावसं वाटतं.
प्रत्येक भेटीत तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
भरभरून मिळालं प्रेम, तरी ते कमीच वाटतं.
भूक माझी भरपूर आहे असं नेहमी तुला वाटतं.
भेट तुझी स्मरताना
नव्याने भेटण्याची इच्छा होते.
तुझ्या प्रेमाची जादू
मला वेड पिस करते.
निरागस तुझं हास्यं, एकटक पहावसं वाटतं
भेट तुझी स्मरताना
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.
कुणाचीही नजर न लागता
तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
शेवटचा श्वासापर्यंत तुझ्यावर फक्त तुझ्यावरच 
भरभरून प्रेम करावसं वाटतं....

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तुझ्या हसण्याच गंध

माझ्या गाली यावा,

तुला फुलवेल तो कुन्द गारवा

मलाही छेडावा,

तुझे असावे झुलणे

सदा सौख्यासंगे

तुला दुखवेल असा शब्द

माझ्या ओठी न यावा

प्रेमात पडलं की सारेच जण...


प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात... c

देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "


एक छोटीसी प्रेमकहाणी

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला

बागेतून एक फुल घेवून ये.

ती मुलगी फूल आणायला गेली ,

तिला एक फूल आवडल ,

पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

ती पुढे चालली गेली ,

पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

तिला खूप पश्चाताप झाला ,

तिने देवाला येऊन सांगितलं ,

तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

तेव्हा त्याची कदर नाही करत ,

पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत....