मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं...

 
प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं,
समाधान देणार एक सुख भेटलं,
तिच्या मनासारखच मीही वागलो,
घरच्यांपासून मात्र सहज मी दुरावलो,
... आई बाबांना प्रेम विवाह नको होता
माझा मात्र पुरता हट्ट होता,
त्यांना फक्त मी हवा, पण ती नको होती,
अवस्था तर तळ्यात - मळ्यात होत होती,
व्यक्त हे दुखं तरी कुणाकड करावं,
कुणाला धरावं अन कुणाला सोडावं,
न सुटणाऱ्या यक्ष -प्रश्नात सापडलो,
अश्वथाम्यागत वेदना घेऊन भटकलो ,
तिला कधीतरी बाळाची चाहूल झाली,
बाप म्हणून घेताना, छाती फुल झाली,
कळल तेव्हा ,मायबापाचा जीव काय असतो,
खरच एक मुलगा, मायबापासाठी काय असतो,
जुन्या गोष्टी विसरत, तिला साथ देत गेलो,
लाडक्याचे बोबडे बोल ऐकत गेलो,
घरच्यांचं पण मन त्याकरिता पाझरल,
घरटे सोडून गेलेल्यांना बोलावन आलं
प्रेमविवाह करण खूप सोप्प वाटलं, 
समाधान देणार एक सुख भेटलं...

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

मी परदेशी चालले आहे...

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मरतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ' तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..'
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ' तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....
ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग' झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं...

आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर...

प्रिय सुनिता,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
बंड्या

एखादं रोपटं लावा....

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो" पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार" त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स" असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण..

पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू
कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही
विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.

खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी
त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं
चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे. एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन
ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला
सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्‌
अर्ध्या तासात माघारी फिरलो..

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या
शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो
अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह स्टोरी" माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही.
खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.'
writer: Amol Kalshett

वेड मात्र तुज़े आहे ...

वेड मात्र तुज़े आहे .......................
ज़ोप मात्र माज़ि असली तरी
स्वप्न मात्र तुज़ेच आहेत
शब्द माज़े असतील तरी
सामर्थ्य मात्र तुज़ेच आहे
सूर माज़े असतील तरी
गीत मात्र तुज़े आहे
प्राण मज़ा असला तरी
श्वास मात्र तुज़ा आहे
प्रेम माज़े असले तरी
सुगंध मात्र तुज़ा आहे
वेडा मे असलो तरी
वेड मात्र तुज़े आहे ......

तु बोलली नाहीस तर....

तु बोलली नाहीस तर
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
तुझा शोध घेत माझ्या नजरा दुरवर जातात, आणि मगं
तुझ्या शोधात त्यासुद्धा भरकटुन जातात.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
सुख सुद्धा दु:खासारखे होते, आणि मगं
दु:ख तर अजुन जिव घेते.
तु बोलली नाहीस तर दिवसाचा प्रत्येक क्षण रडवत रहातो.
माझे डोळे अश्रुनी भिजतात, आणि मगं
अश्रुंचे थेंब सुद्धा तुझ्या बोलण्याची वाट पाहत डोळ्यात उभे असतात.
तुझ्या न बोलण्याने मग ते सुद्धा डोळ्यातुन गळुन पडतात.
तु जरी बोलली नाहिस तरि,
माझे मन नेहमी खंबीरपणे बोलत असते-
तु बोलशील, तु बोलशील, तु बोलशील....
तु जरी बोलली नाहिस तरि,
तुझ्या प्रत्येक जुन्या आठवणींशी बोलत असतो.
मी खरंच तुझ्या बोलण्याची नेहमी वाट पहात असतो.
तु खरंच बोलशील ना????

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का....


आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का

थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का

प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का

आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का...

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

तू गेल्यापासून आपल्या अंगणात...


तू गेल्यापासून आपल्या अंगणात...
पहिल्यासारखा मुसळधार ..
पाऊस नाही ग कोसळत ..!

कारण ..
त्याला हि समजलेय कि ..
तू नाहीयेस आता या घरात ..
पाहिलं कसं तू घरात ..
यायच्या अगोदर ..
तो धुंवाधार कोसळायचा ..
आणि
तुला चिंब चिंब भिजवायचा ..

अगदी मनसोक्त ....!
आता तो येतो फक्त ..
काळेभोर ढग आणि ..
विजांचा कडकडाट घेऊन ..
अगदी रागावून ..
बहुतेक ..तुलाच हाक मारत असावा ..!
माझ्यासारखाच त्यालाही ....

तुझा विरह सहन होत नाही म्हणून ..!

कदाचित ..माझ्या इतकंच तुझ्यावर
त्या पावसाचं देखील प्रेम होतं...
हे आजकाल मला प्रत्येक ..
पावसाळ्यात पटायला लागलंय ..!

रात्री उशिरा पर्यंत काम करायला फार आवडायचं....

पूजा ने तिचा email open केला...
hi पूजा.. दररोज रात्री इतक्या उशिरा पर्यंत का काम करत असतेस??
तुला मित्र नाहीत काय ग??
तू इतक्या रात्री पर्यनात काम नको करत जावूस...

आभारी आहे विनीत
--------------------------
-----------------------------------------------------------
हे वाचल्या नंतर पूजा जाम रागावली. काही पण काय म्हणतo mail delete केला...
क|माल निघून गेली...त्या रात्री पासून रोज तिला त्याचा email id वरून email येवू लागले..
आणि ती वाचून delete करायची...

-------------------------------------------------------------------------------------------------
एका रात्री mail आला with subject line "प्रिये "
त्यामुळे पूजा ने email लगेच open केला...
प्रिये आज तू फारच छान दिसत आहेस... लाल साडी मध्ये...
मला माहित आहे तू माझे emails वाहन बंद केला आहेस...
म्हणून आज मी काही advice देता नाही...
पण माझा तुझ्या वर प्रेम जडलाय.. आणि हे मना पासून आहे...
मला खात्री आहे तू ह माझ्या प्रेमात नक्की पडशील....
तुझा प्रियकर विनीत
---------------------------------------------------------------------------------------------------
हा mail वाचल्या नंतर पूजा shock झाली..
ती म्हटली ह्याला कसं कळाल कि मी ह्या रंगाची साडी घातली आहे...
ज्याला ती कधी भेटली नाही.. बघितलं नाही तो ..
त्याला आपला id कुठून भेटला ह्याचा विचार करू लागली...
तिनी मग reply केला...
hi विनीत
मला तुझा carrier खराब नाही करायचा आहे...
तू मला emails send कारण बंद कर...
नाहीतर मी तुला block करेन...
.
पूजा..
--------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यांनतर तिला काही दिवस emails आले नाही...
पूजा हि विचार करायची mail नाही आला आज... :(
अचानक ५ दिवसांनी रात्री mail आला...

प्रिये
मी काही गेले दिवस busy होतो...
मी तुला खूप miss केला तू मला केलंस कि नाही..
तुझा block केर्ण्यानी माझा प्रेम नाही कमी होणार तुझ्या वरचा...
.विनीत
पूजा गालातल्या गालात हसली... आणि कानाची बट बोटात पकडून खेलायली लागली
तेवढ्यात लगेच एका mail आला...

प्रिये
केस्नाशी खेळण बंद कर...
.vinit
---------------------------------------------------------------------------------------------------------
आता मात्र पूजा ला धक्काह बसला... ह्याला हे कसं कळाल...
तिनी आजूबाजूला पाहिलं कोणी नव्हत.. मग ह्याला कसं कळाल...
लगेच एका mail आला...

पूजे
मला शोधात आहेस...
तू पण माझ्या प्रेमात आहेस न...
तुझा प्रियकर
विनीत...

आता पूजा mail करते त्याला
"तू कुठ आहेस?"
.
reply येतो
"आग तुझ्या समोर... तुला जाणवत नाही का ग....'
-----------------------------------------------------------------------
मग पूजा ने लगेच comp बंद केला आणि घरी गेली...
दुसर्या दिवशी तिने boss ला सगळा प्रकार सांगितला...
आणि म्हटली विनीत नावाच्या मुलाकडून mail येत आहेत...
boss म्हणाला खरच विनीत नवा आहे...??
ती म्हणाली हो...
तेव्हा boss म्हणाला "आग तो गेल्या वर्षी चा वारला आहे...??'
पूजाचा विश्वास चा बसला नाही...
तिने सगळे id check केले आणि लक्षात आला सध्या ह्या नावाचा कंपनी त कोणी नाही..
-------------------------------------------------------------------------------------------
नंतर तिने परत mail ओपेन केला...
दोन mail होते..
पहिला
प्रिये
आग तू मला नको घाबरू...
अशी पळत घरी जाशील तर मग मला तुझ्या शी बोलता येणार नाही...
.
दुसरा
प्रिये
मला माहित आहे तू आमच्या boss कडे गेलीस न..
कळलच असेल तुला सगळ खर..
-----------------------------------------------------------------
पुन्हा एका mail आला
प्रिये
मी तुला प्रिये म्हटलेलं चालत न...
.
पूजा ने reply दिला
नाही रे माझा न|व चा छान आहे त्या नावाने बोलावत जा...
.
विनीत
:ग मला एखादी व्यक्ती खूप आवडली कि मी तिला असह नावाने हक मारतो...
चालेल न...
i love u
विनीत
-----------------------------------------------------------------------------------

पूजाच्या मनातून हि विनीत चा विचार जात नसतो...
ती एका सारखी सुरी कडे धारदार वासून कडे पाहत असते...
.
तिला एका mail येतो..
प्रिये
तुझ्या सारखेच मला हि मित्र नव्हते...
मी हि रात्री पर्यनात काम करायचो...
त्यामुळे मला "निद्रानाश झाला..."
आणि त्यातच आजारी पडून माझा मृत्यू झाला..
म्हणूनच तू काळजी घे...
.
विनीत
.--------------------------------------------------------------------------------------
त्यावर पूजा reply करते..
"मला हि तुझ्या कडे यायचा असेल तर काय कराव लागेल...."
.
reply येतो "तू असा काही करणार नाही आहेस.... "
.--------------------------------------------------------------------------------------
आणि तेवढ्यात पूजा बाजूला असलेली सुरी खुपसून घेते....
.
आणि तेवढ्यात एका mail येतो...
.
"प्रिya boss
आम्ही इथे दोघही एकत्र आहोत...
हा comp असाच चालू ठेवा आणि इथे जो हि कामाला बसावा ज्याला कोणी मित्र नाही...
मी आणि माझी प्रेयसी त्याचे मित्र बनू...vinit&pooja"
.
boss च्या हातात रक्तालेली पूजाची body होती आणि विनीत च्या रात्री जागरण करून लिहिलेली कवितांची वही होती....आणि ते emails
प्रेम अशी गोष्ट आहे... जीव अडकला तर mail मध्ये हि अडकतो...
आणि प्रेम मिळतच...

प्रेमात पडलं की...

प्रेमात पडलं की...


प्रेमात पडलं की...


प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो...