बुधवार, ७ डिसेंबर, २०११

तू आणि तुझं सर्व विश्व...


तू आणि तुझं सर्व विश्व...

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...

तडजोड करा..

जुळवून घेणे
आणि
तडजोड करणे
ह्या दोन्ही ही गोष्टी
आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत....

जुळवून घ्या.. ... जेव्हा कोणाला तरी तुमच्या बरोबर रहावस ... वाटत,
आणि तडजोड करा.. जेव्हा तुम्हाला कोणाबरोबर तरी रहावस वाटत.......


आता फक्त आयुष्य भराची साथ दे.....

 
तो चंद्र नकोय रे मला,
फक्त तुझी शीतल सावली दे....
हे जग नकोय रे मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे...
स्वप्न माझी खूप नाही रे मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे...
नदीला या काठ दे...
वाटेला माझ्या वाट दे...
अडकलाय रे तुझ्यात जीव माझा...
आता फक्त आयुष्य भराची साथ दे.....

रविवार, ४ डिसेंबर, २०११

ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात

"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात .... ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात .......... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!! "

मी विचारले ती म्हणाली...

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
...
मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…
 

माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ...

"पोस्टमन काका म्हणाले शक्यच नाही .....
मालगाडी वाले म्हणाले दिवसातून कमीत कमी १० गाड्या पाठवायला लागतील ....... आणि असे किती दिवस लागतील ते आम्ही सांगू शकत नाही ...

विमान सेवा वाले सुद्धा नाही म्हणाले ......... एवढ वजन विमानात ठेवायला परवानगी नाही म्हणे ....
...
माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे
म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ...

आठवणी

आठवणी
जेव्हा तुम्ही खरे बोलत असता तेव्हा ते
सिध्द करायला कशाची गरज नसते कारण
खोटे बोलतनाचं कारणांचा आधार

... घ्यावा लागतो
गेलेल्या बद्दल कधीचं जास्त विचार करु
नये ... कारण त्याने फक्त दुखः होते
येणार आहे त्याचा ही जास्त विचार करु
नये.... कारण त्यामुळे चिंता होते
... ... आहे तो क्षण आनंदाने घालवा.........
कारण त्याने खरे जीवन जगता येते
जीवनातला प्रत्येक अनुभव
आयुष्याला अधिक चांगले घडवतो
प्रत्येक
येणारी समस्या ही आपणाला रोखायचा प्रयत्न
करते हे आपल्यावर असते तिथेचं थांबायचे
का मार्ग शोधून पुढे जायचे
नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन
शोधा जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल
असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं
सुंदर असतात जमलंचं तर विचार करा.
See More

शोर्टकट प्रपोज ....

मुलगा : कृपा करून आपला घरचा पत्ता सांगशील का ?

मुलगी : का ?

मुलगा : ऐक दिवशी लग्नाची वरात घेवून यायची आहे . म्हणून विचारतोय
 
 

संवाद मनातून मनाचा..

ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच
नाही आवडत
मला....पण "तुझ्या मनातला मी"
आवडतो मला...
... ती : किती प्रेम करतोस
माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान
दिसतंय?
त्या पानावर
जितक्या हिरव्या शिरा आहेत न
तितकंच प्रेम करतो.
जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज
विसरेन....हा आकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण
सारखी सारखी का काढू ?
कधी तरीच काढेन...
पापण्यांची उघडझाप करतील
ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने
मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत
राहिलीस
तर तुला तुझं दु:ख कधीच
एकटीला अनुभवता येणार
नाही.
त्यात
अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी
काढून
ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर
तूझा सर्वात
जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल
माझा हक्क पण...तू
माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून
जाऊ
नाही शकणार..
सगळं ऐकून
आभाळातल्या
उगवत्या सुर्याखाली हातात पान
घेतलेल्या पापण्यांची उघडझाप
करणाऱ्या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात
फक्त पाणीच
होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर
दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण
शिंपल्यातल्या मोत्यासारख
ा होता.... मनात
भरणारा .
 

सांग ना कधी तरी माझीच तू होशील...

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

चार चोघात देखील हात हातात देशील

किती दिवस घाबरत जगणार
...
किती दिवस चोरून भेटणार

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

जगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल

वेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन

जाते जाते म्हणत उगाचच थाबन

काहीतरी बोलून मग लाजण

पाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन

सांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील

चार चोघात देखील हात हातात देशील
See More