शुक्रवार, २३ मार्च, २०१२

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी...

लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!

१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.
२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.
३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.
४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.
५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.
६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.
७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.
८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.
९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.
१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.
११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.
१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.

- Ajay Panchal -

तीचं माझं नातं...

तीचं माझं नातं अस असावं
कोवल्या उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं
वाटत तीन जवळ बसावं
स्वत:शीच गालात हळुच हसावं
जमलंच तर् एखाद गाण म्हणावं
किंवा नुस्तच मुक्याने बोलत रहावं

तिच माझ नात अस असावं….
वाटत तीला जवळ घ्यावं
नुस्तच तीच्याकडे बघत रहावं
मिठीत तीच्या हरवुन जावं
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्यावं

तिचं माझ नातं असं असावं…
माझं सुख तीला सांगावं
दुख्ख तीचं जाणून घ्यावं
हळुच तीच्या कुशीत शिरावं
मोठं होउन सांत्वन करावं

तिचं माझं नातं असं असावं…

मिठीत घे ना रे ..

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा... ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा... , ♥

त्या गाजवलेल्या मद रात्री... ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट..., ♥

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ...,
ते गोड निरंतर असे संवाद...,♥

आज न जाणो तू कुठे आहेस ...,
तुझे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे.., ♥

या गुलाबी अशा थंडीने..,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय...♥

खूप थंडी आहे ..,
मला अलवार मिठीत घे ना रे ...♥

लग्न लग्न म्हणजे काय असतं?


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्याचेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचंकोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांनातिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुणअसतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळालाचहाबरोबर संपवायचं असतं.


लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.



लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं

तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे..

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-
छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत,
तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण
प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन
समोरच्या झुडपात उडी टाकली, ते झुडूप
गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून
बसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम
काही मिळाले नाही, शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून
समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं, पण
तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण
ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात
खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील
म्हणजेच
मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर
राहीन ...............
♥ तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण
प्रेमात वेडा आहे. ♥
 

आठवण...

आठवण...
एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...
हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!

शनिवार, १७ मार्च, २०१२

साद हि अंतरीची, समजू दे स्पंदना..



साद हि अंतरीची,
समजू दे स्पंदना,
आठवण तुझी सखे,
हुरहूर लावी मना,
येऊ दे तू साज,
प्रीतीच्या अंगना......

आवाज तुझ्या मनीचा,
समजू दे माझ्या मना,
साथ तुझी गं साजणी,
लाभू दे जीवना,
तू सदैव सुखी रहा,
हिच ईशाकडे कामना......

?
घडला माझा गुन्हा,
परतून नाही आलीस,
जीवनी माझ्या पुन्हा,
वेडापिसा मी जीवनी,
जगतो तुझ्याविना........

सांगु कसे गं तुला मनीचे,
विचार माझ्या राणी,
घेऊन हात-हाती,
चल विहारू पाखरावाणी......

तुझ्याविन न माझ्या,
सोबतीला गं कोणी,
आठवण तुझी गं येता,
तरले डोळ्यांत माझ्या पाणी.....

करी हळुवार स्पर्श,
साजन साजनीच्या तना,
येई अंगा शहारा,
उठे मनी गोड संवेदना......

कशासाठी ?

डोळे कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ! ! !

आला भरून पाउस,
नको एकता जाउस,
सरी कशासाठी ?
तुला बिलगून भिजुन जाण्यासाठी . . .

नाव तुजे मनातले
चान्दनेच रानाताले
शब्द कशासाठी ?
तुला आठवून भरून घेण्यासाठी

वेल मोहरून आली,
फुले अंगभर झाली
वारा कशासाठी ?
गंधवनातुन पाखरू होण्यासाठी . . .

असा तुजा भरवसा
चाँदन्याचा कवडसा
ओठ कशासाठी ?
उरी थरारून जुलून गाण्यासाठी

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

मन् वेडं प्रत्येकाच असतं.....

मन् वेडं प्रत्येकाच असतं.....


मन वेडं,

प्रत्येकाच असतं

कुणाच कमी,

कुणाच जास्त असत..

मन वेडं...

कधी ना कधी

नक्की फ़सतं

कुणाच रडत बसतं

कुणाच उगाचच् हसतं

मन वेडं...

हे खुप नशीबवान असतं

आपल्याच नकळत हे

तिच्यासोबत असतं

मन वेडं...

हे पाखरां सारख असतं

ते पंखाने उडत असतात

हे मात्र

पंखाविना उडत असतं

मन वेडं...

हे कधीच आपलं नसत

ते फ़क्त तिचच असत

कधी हरवल तर्

तिच्या सावली मागे सापडतं....

मन् वेडं

प्रत्येकाच असतं

कुणाच कमी

कुणाच जास्त असत.. ..

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

पहिली भेट



पहिल्या परिक्षेसारखी !!
उत्तरांची वाट
पाहणाऱ्या प्रश्नांसाराखी !!

...
पहिल्या भेटीत
एकमेकांची नजर चुकवून
एकमेकंकडे पहायचे असते !!
स्वत मात्र साळसूदपणे
नजर भिडताच नजर झुकवुन लपयाचे असते !!

पहिल्या भेटीत
अगदी सावधपणे वागायचे असत !!
हसतानाही चेहर्यावर
खोटे गांभीर्य जपायाच असत !!

पहिल्या भेटीत
एकमेकाना समजायाच असत !!
निदान जे समजयल नाही
ते कळलय असा भासावायच असत !!

पहिल्या भेटीत
अनेक शंन्कांचे ओझे वहायचे असत !!
त्यांच्या सोबत आपणही स्वताला
अपेक्षांच्या ताराजुत तोलायाच असत !!

पहिल्या भेटीत
स्वत बद्दल मनातून खुप काही सांगायच असत !!
नेमक अशाच वेळी ओठांनी
जिभेवरच्या शब्दांना आवरायच असत !!!

पहिल्या भेटीत
सतत घडाळयात निरखून बघायच असत !!
एकमेकांच्या शब्द काट्यांमध्ये
इतक्या लवकर गुंतायच नसत !!

पहिल्या भेटीत
आपण "काय घेणार?" विचारायच असत
त्या मेनू कार्ड पहाताना
आपण खिश्यातिल वोलेटमध्ये डोकवायाच असत !!

पहिल्या भेटीत
त्या जे काही calericious कांटिनेंटल diet मागवातिल
ते आपण मुकाट्याने खायचे असत !!
कितीही बेचव असल तरी "किती छान डिश आहे "
अस आवंढा गिळुन म्हणायचे असत !!

पहिल्या भेटीत
त्यांच्या आनंदासाठी
स्वताच्या अस्तित्वाला विसरायच असत !!
एक संध्याकाळ त्यांच्या सोबत
एका वेगळया दुनियेत रमयच असत !!

पहिल्या भेटीत
सगळ्या प्रश्नांसाराखी उत्तरे येत असली
तरी मुद्दामून नापास व्हायच असत !!
त्यानी दिलेल्या लाल भोपाळ्याना
आयुष्यभर रक्तात भिनवून ह्रुदयात जपवून ठेवायच असत !!!