♥
"एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे, हे बघून
देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर पर्या त्यांच्याकडे पाठविल्या,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर पर्यांना बघून ती आश्चर्य चकित झाली, तेव्हा ....
पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........
बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नवर्याला म्हणाली, "आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे".
नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.
त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको"
तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण
पुढे आश्चार्यची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी
परी देखील आत आल्या.
त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता,
प्रेम-परी म्हणाली ♥ ," जर तुम्ही पैसा-परी निवडली असती तर बाकी परी निघून
गेल्या असत्या, पण देवाच्या नियमा प्रमाणे जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे
पैसा व प्रसिद्धी नको म्हणतले तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर
येत आहेत" ♥ ♥ ♥
तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक
गोष्ट असली तरी, "प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी
देखील नांदते हे मात्र १००% खरे आहे", म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून
प्रेम करत रहावे"
♥ " Love is what all we need .... Keep Loving Truly ♥