गुरुवार, ३० जून, २०११

एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं...
 
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू, लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का? ........... बघत्यात

रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु
लुकलुक डोळं करुन भोळं बघत फुलपाखरु
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं

बेजार झाले सोडा सजना, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू...
 
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हात, धूके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दवांने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रित साजणी

जळी यौवनाचा डूले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाळी, नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे...
 गायक - अरुण दाते
दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे..

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे...

शुभ्रफुले वेचित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे

भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो, मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे...

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे...
 डाव मांडुन भांडून मोडू नको..
गीतकार- ना. घ. देशपांडे
 गायक - सुधीर फडके
                                                                                         संगीतकार-- राम फाटक
 
डाव मांडुन भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको ...

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
डाव मोडू नको ...

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको
डाव मोडू नको ...

काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
डाव मोडू नको ...

मंगळवार, २८ जून, २०११


प्रेमायण लेख 1




रविवार, १९ जून, २०११

Romantic प्रेमकविता


शनिवार, १८ जून, २०११

छान प्रेमकथा>तिचा प्रेमाचा गुलाब...

तिचा प्रेमाचा गुलाब...

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .............. 
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे .................... 
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते............... हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल......
- हर्शल जाधव 
संपर्क-9637351400

रविवार, १२ जून, २०११

सुपर प्रेम कविता >प्रेमपत्र...

प्रेम पत्र 
कवीवर्य- श्री हणमंत शिंदे .
संदेश पाठवणारा -आदर्श नगारे.  संपर्क :9637989762

सगळीच पत्र तिच्या पर्यंत पोहचतात असं नाही
आणि पोहोचलीच तरी पत्र सगळच बोलतात अस हि नाही
काही पत्र जिंकतात,जन्माला येवून सार्थ ठरतात
काही पत्र हरतात म्हणून का ती व्यर्थ जातात !!
तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच कि आणि 
तिने फाडलेल पत्र आपण पुन्हा पुन्हा पाहतोच कि...


ती अशी बसायची ,खळीखळीन हसायची 
साडी नेसून संमेलनात किती छान दिसायची 
कोणते बरे गाणे तिने संमेलनात गायलेलं 
आणि गाता गाता आख्या वर्गात फक्त माझ्या कडेच पाहिलेलं
वाटते ना सगळ  कसं काल घडल्या सारखं
वाटते ना पायावरती पत्र पडल्या सारखं
म्हणून पत्र लिहायचं पटेल किंव्हा फाटेल
                                              आठवणींच्या वृंदावनात निदान राधा तरी भेटेल.... 

शनिवार, ११ जून, २०११

तिची प्रेमपत्रे...,

प्रिय हर्षु...
              शाळेत ले ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची.


नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! . नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. शाळेचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते.

पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?

- तुझीच,

अनामिका