शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

प्रेमात पडलं की...

प्रेमात पडलं की...


प्रेमात पडलं की...


प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो...

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

…… पावसात ती …..

पाण्याने भिजलेली …
थंडी ने शहारलेली …
विजांच्या कडकडाटाने घाबरलेली …
पावसाच्या थेंबांनी नटलेली …
ओलाव्याने सजलेली …
छत्रीत लपलेली …
चिखलावर थोडीशी रागावलेली …
पण वार्याने सुखावलेली …
दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …
स्वतः ची स्वतःच सावरलेली …
खोटी खोटी रुसलेली …
थोडीशी लाजलेली …
माझ्याशी हसलेली …
जोराच्या पावसात ….
काळ्या ढगांच्या काळोखात … 
छत्र्यांच्या गर्दीत ….
खरंच ती … 
ती फार …. सुंदर दिसत होती …

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे

"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि
१ तास = ६० मिनिट
१ मिनिट = ६० सेकंद
पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि
१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you ♥

प्रेमाचे गुणधर्म...


प्रेमाचे गुणधर्म--
१) प्रेम हे रंगहीन किवा गुलाबी असून त्याला आल्हाददायक सुगंध असतो .
२) खरे प्रेम माणसाला आनंदी किवा उत्साही बनवीते.
३) प्रेम हे अत्यंत ज्वालाग्राही सुधा आहे .
४) प्रेम हे विनाशकाले विपरीत बुद्धि हि ठरू शकते..

सूत्र --
१) प्रेम + मनुष्य = स्वर्ग
२)मनुष्य + प्रेम + नकार (प्रेयसिचा , प्रेय्कराचा ) = आत्महत्या किवा निराशा (एकतर्फी)
३)मनुष्य - प्रेम = नर्क

प्रेमाचे उपयोग --
१)अन्नाची मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण प्रेमात मनुष्याची तहान-भूक हरपते.
२)प्रेमामुळे प्रेयसीचा पैसा वाचतो, तर प्रियकराचा कीसा रिकामा होतो .
३)प्रेमामुळे गिफ्टशॉप तूदुब चालतात, परिणामी अर्थे व्यवस्थेला चालना मिळते .
४) प्रेमामुळे लग्नाची मानसिक तयारी होते; कुणासोबत तरी करण्यासाठी.......

पहिल्या प्रेमाची आठवण....

पहिल्या प्रेमाची आठवण....

अजूनही आठवतोय मला तो पहिला दिवस...! ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो! तिला भेटण्याच्या अतुर्तेमध्ये मला त्या आदल्या रात्री झोप आली नाही कधी एकदाची ती रात्र संपते आणि सकाळ होते, आणि कधी एकदाचा मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, अघोळ केली..! फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण, स्वच असा ड्रेस मी घातलेला होता..! केस व्यवसित करून तयार झालो. आदल्या दिवशी मित्राकडून, आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी, माझ्या कपड्यावर ओतली. तेवढ्यातच आई ने आवाज दिला, नाश्ता तयार आहे खावून जा., आईला मला नाश्ता नको असे, बोलत मी खिशामध्ये हाथ घातला, बघतो तर काय माझाकडे, फक्त २ नच रुपये होते, मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी , ५०रुप्ये मागितले तर तिने नकार दिला, मी तसाच निराश होवून निघालो, जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील, एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले...
कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी, आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो. तिला भेटण्याचा एक एक क्षण, जवळ जवळ येत होता तस-तशी, माझा मनातली भीती वाढतच जात होती, पण आज मी निचय करूनच आलो होतो की, आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही. सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली, नि माझा समोर येवून उभी राहिली. मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो, तिने पण मला गुड मोर्निंग केले. तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले, नंतर मी तिला बोललो, मला तुला काही तरी सांगायचे आहे, ती लाजत लाजत बोली "बोल" मी डोळे मिटून धीर धरून तिला आय लव यु ...! म्हटलं. तसं तिने खाली वाकून सँडल, पकडणार एवढ्यातच मी तीचापासून, दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा, राहिलो पण ती सँडल ची पट्टी लावत, मला सेम टु यु...!!! म्हणाली.......

खरच पहिल्या प्रेमाचा सुंगंध जीवनात कधीच विसरता येत नहीं...

ब्रेक-अप नंतर काय ???..

ब्रेक-अप नंतर काय ???..

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका, मनातील न्यूनगंड आधी झटका..
* दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे, त्यावर आत्मपरिक्षण करा.
* अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते, अणि हीच वेळ असते जेव्हा मित्रांची खरी किम्मत ही जवळून कळते..
* तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून गेले तर छान.
* अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद जोपासण्याची मनापासून इच्छा आहे..
* दर्दी गाणे ऐकत बसण्यात दुखी मंन शांत होत नाही, हे तर गोष्टी असतात ज्या छान वाटतात पण त्या पासून दूर राहण्याची सवय घाला..
* एकांत एकटे राहून मंन शान होते हा गैर समझ आहे तुमचा, एकटे राहून ते जुने क्षण मनाला छळत राहतात अजून काही नाही, एकटेपणा टाळा..
* शेवटचे एवढेच कि, तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये, हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा, ..

मित्रांनो प्रेम हे छान आणि घाण अशा एका नाण्याचे दोन बाजू आहे, ब्रेक-अप-अप नंतर जीवनाचा ब्रेक-अप होत नाही, अशे कितीतरी नाते, कार्य आणि जिम्मेदारी बाकी असतात त्यांच्या साठी जीवनाची पाली नवीन पद्धतीने खेळा आणि विजयी व्हा!
Remember: Dont Cry because its Over, Smile Coz it happened...

आणि त्याने डोंगराला पायर्‍या कोरल्या...

आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे.
रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.

दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.

शूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.


एके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.


त्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.....

खाली दिलेल्या लिंक वर त्यांचे वास्तविक चित्र आणि अजून माहिती पहा.....
http://www.asianoffbeat.com/default.asp?Display=1278


महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले...

महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले...

पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्यातच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतले. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांच्या प्रेमाची कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे.

इज्जत बेगला फिरण्याचा खूप शौक. त्याने आपल्या वडिलांची परवानगी घेऊन देश फिरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एके ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्व काही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव महिवाल पडले. महिवाल अतिशय सुंदर होता. महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.

पण सोहनीच्या आईला ही बाब कळली तेव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्यावरील प्रेमाखातीर जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात जाऊन सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न इतर कुणाशी तरी करून देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.

इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सोहनीला पाठवली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवालने साधूचा वेष धारण करून सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करून महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासंतास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकरातूर सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला आपल्या बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली. :( :(

सकाळी मच्छिमारांनी माशांसाठी जाळे टाकले, त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी व महिवालचे परस्परांना बाहूपाशांत घेतलेले मृतदेह मिळाले. गावकर्यांानी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी व मुस्लिम लोक मजार म्हणतात.

अर्थात असे असले तरी प्रेम हे प्रेमच असते त्याला धर्म, जातीचे बंधन नसते, हेच खरे.

म्हणुन ती पुढे गेली आहे...

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....
थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे...

तुझे आडनाव ....

मुलगा : तू सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आहेस..!
म्हणजे सुंदर आहेस, स्वभाव छान आहे...
बोलतेस सुद्धा खूप खूप छान...,
पण एकच गोष्ट मला तुझ्यातील बदलावीशी वाटते...

मुलगी : कोणती ???

मुलगा : तुझे आडनाव ....