शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११
कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे...
कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
... रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?
लेबल:
मराठी प्रेम गिते...
सुंदर ते रूप ......
सुंदर ते रूप ......
सुंदर ते रूप तुझे मनोहर
नाही दिसे परी रुतले मनात...........
काय वर्णू ख्याती बोलण्याची
काय सांगू मी चाल हरिणीची
गाली खळी फुलते गुलाबाची
सुंदर ते रूप .......
थोडसं लाजणे,थोडसं रागवणे
तरीही पुन्हा वळून तेच पाहणे
अशी माझीच तू सुंदरी सखे
सुंदर ते रूप.......
काय तुझा तो हळवा अबोला
काय तुझा तो लटका रुसवा
मनी नसे कधीही तो दुरावा
सुंदर ते रूप............
हा दिखावा दाखवणे मजला
तुझा हा नुसताच ग बहाणा
ओळखून आहे सखे तुजला
सुंदर ते रूप...........
नको दूर सारू आज मजला
साथ ना कुणाची एकट्याला
नको फेकू काट्यांत जीवाला
सुंदर ते रूप...............
तुझाच आहे ना मी या समया
प्रिये सांग ना एकदा तू मजला
साक्ष ठेवून स्वतःच्या मनाला
सुंदर ते रूप.............
नको दाखवू मनीच्या भावना
तरीही मी जानिल्या साऱ्या
केव्हाच पहिल्या मनी माझ्या
सुंदर ते रूप................
वर वरले सर्व मज समजले
अंतरी काय हे मी जाणिले
नको समजावू शब्दात आज हे
सुंदर ते रूप....................
वाट मी पाहीन त्याच क्षणाची
या जन्मी मज जमले जर नाही
तर पुढला जन्म घेईन तुजसाठी
सुंदर ते रूप....................
रुक्मिणीच्या एका तुलसीपत्राने
श्रीकृष्ण मनोमन आनंदे हसले
नको स्वार्थ, फ़क़्त ते "प्रेम"जगी असुदे
सुंदर ते रूप.
लेबल:
सुपर प्रेम कविता
ती बघते तेव्हा..!
ती बघते तेव्हा..!
.
ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!"
...
ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे
ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो
ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते
ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी
ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो
ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !
लेबल:
सुपर प्रेम कविता
मिलन ...
मिलन
मनातल्या त्या हूर हुरीला,
किती थांबवायचं ग..
मिलनाच्या त्या उत्कटतेला,
किती लांबवायच ग.....
दररोज उद्या च्या आशेवर,
किती जगायचं ग..
हातात रोज फोटो घेवून तुझा,
किती पाहायचं ग ..
मनीच्या भावनांना काव्यात,
किती गोवायचं ग ..
तुला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्यांना,
किती विचारायचं ग ..
तुझ्या घराकडे जाणाऱ्या वाटेला,
किती बघायचं ग...
लेबल:
Romantic प्रेमकविता
नजर..
नजर..
ती नजर, ती नजर, वेड जीवाला लावते
का कशी, कुठेही कधीही, भुरळ मनाला पाडते
प्रेम इथे रुजतंय, प्रेम इथे रुजतंय...
न बोलता, न हसता, ती अशी बघते
पापण्या झुकलेल्या, अशी उचलते
धस्स मनी होतंय, धस्स मनी होतंय
ती जेव्हा हसते, अशी बघते, मन विरघळते
क्षण साठवते, सतत आठवते, स्वतःवरतीच खुश होते
मन रिमझिम भिजतंय, मन रिमझिम भिजतंय
नजर झुकवते, खळी गाली पडते, ती अशी लाजते
ती बोलली नाही जरी, नजरच सांगते
तिचही मन बसतंय, तिचही मन बसतंय...
लेबल:
Romantic प्रेमकविता
शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११
अविस्मरणीय संध्याकाळ........
अविस्मरणीय संध्याकाळ........
"अरे .... अमित एक सांगू का?" हसू नकोस हा..
मी हसत हसत म्हणालो "हा सांग... नाही हसत.."
"अरे! काल कि नाही तू माझ्या स्वप्नात आला होतास..."
मी .. "हो का ! ....."मग कायं केलं मी येऊन हां..हां ."?
डोळ्यात लाजरेपणा दिसला .. "छे! पुरे आता तुझा चावटपणा.. तू फक्त आला होतास आणि मग गेलास..
" ऑय्येंग ! मी आलो... नि गेलो!! .. असं होऊच शकत नाही ... मी आलो तर नकीच काहीतरी romantic करून गेलो असेन."
“हाहाहा “
"हसतेस काय? .. खरचं.. !"
ती - "अरे वेडू मग सांग न तूच तू काय केलंस ते.."
असं होय मग ऐकच..
हो ऐकतेय .. व्हा सुरु..
थांब मीच सांगतो मी काय केल ते ..
शांत संध्याकाळ झाली होती.. थंड वारा सुटला होता... सगळं कसं शांत...निःशब्द.. कदाचित ती संध्याकाळ आपलीच वाट पाहत होती .. आपण भेटण्याची ..मी आलो .. तुझ्या जवळ .. तुझं ते स्मितहास्य...लुकलुकणारे डोळे.. थरथरणारे ओठ.. आणि थोडीशी कुडकुडणारी तू... तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहातच राहिलो .. बराच वेळ मी हरवूनच गेलो होतो.. तुझ्या डोळ्यात ... आपण बसलेल्या झाडाखाली.. पानांची सळसळ कानावर ऐकू पडत होती..
तुझा हात हातात घेतला... तु ही तो घट्ट धरलास मी तुला कधीच न सोडून जाण्यासाठी ...
तू मधेच हसायला लागलीस.. माझं तसं रूप पाहून.. आणि नकळत म्हणालीस...
"असं काय रे बघतोस..? आज मी काय वेगळी दिसते आहे का? "
मी म्हणालो - "तू रोज वेगळी दिसतेस मला.. डोळेभरून पाहतच राहवसं वाटत "
तू थोडंस चिडून – “ पुरे नको करू बनवाबनवी.. !”
मी हलकेच तुझ्या केसातून हात फिरवला.. तु ही बेधुंद होऊन डोळे मिटून घेतलेस..नंतर माझे हात तुझ्या गाली लावून...बराच वेळ तू माझ्यकडे पहात राहिलीस.. जवळ आलो तुझ्या मी..खूप.. एकमेकांचे श्वास ऐकू यायला लागले..होते ..हृदयाची धडधड हळू हळू वाढत होती .. हाताचा घट्टपणा अजून घट्ट होत चालला होता...त्यात थंड वार्याची एक झुळूक येऊन हळूच तुझे केस माझ्या चेहऱ्यावर उडवून गेली .... आणि नकळत माझे डोळे मिटून गेले....
ऐकता ऐकता .. ती हरवून गेली.. नि मधेच उदास स्वरात म्हणाली..
“अमित! बरं झालं हा ...हे स्वप्नच होतं..ते ”
माझा चेहरा लगेच पडला... म्हणजे.. ती खरच आपल्यावर प्रेम नाही करत .. असं वाटलं.. मी काही म्हणायच्या आत तिने सारं ओळखलं होतं
"अमित आय luv u रे..... किती छान बोलतोस रे तू ?... खरंच अस घडेल का रे कधी? ... स्वप्नात नाही तर सत्यात तरी कधी?
तू माझं होशील का ..?"
मी - "मी तुझाच आहे गं.." फक्त तुला ते उशिरा कळतंय ...
तिच्या स्वप्नात येऊन मी सर्वस्वी तिचा झालो.. प्रत्यक्षात तिचा होण्याआधी … भावनेनी व्याकूळ दोघे..एकमेकांच्या घट्ट मिठीत अडकलो..अन अशी एक संध्याकाळ अविस्मरणीय ठरली..

भेट तुझी माझी..
तू ..... माझ्यासाठी...
♥
प्रियकर :- तुझे सर्वात आवडते मराठी अक्षर कोणते ?
प्रेयसी :- तुझे नांव विशाल आहे म्हणून माझे आवडते अक्षर "व" आहे .....आणि तुझे ?
प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर म्हणजे "ल" आहे.
प्रेयसी :- पण माझे नांव तर "ल" वरून नाही सुरु होत ....... कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;)
... प्रियकर :- कारण ...
ल ......... लाल रंगा साठी
लाल रंग ......... रक्ता साठी
रक्त .............. हृदयासाठी
हृदय .............. प्रेमासाठी
प्रेम ...... तुझ्यासाठी
तू ............... माझ्यासाठी" ♥ ♥ ♥

छान प्रेमकथा
पुरावा मिळाला...
♥ ♥ ♥ त्या संध्याकाळी अचानक तू माझ्या समोर आलीस, ..... मला असे वाटते कि त्यावेळी आकाशातील सारे तारे जणू आपल्या भेटीची वाटच बघत लटकले होते ............ ♥ कारण,"ज्या क्षणी तुला मी पाहिले त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तेव्हड्यात तिकडे तो तारा सुद्धा गळून पडला ....... आणि "आपण दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत" ह्याचा आपल्याला पुरावा मिळाला " ♥ ♥ ♥
लेबल:
माझी प्रेरणा वाक्ये
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)