सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत..

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत.. 
 
गीतकार
- आरती प्रभू
गायक
- लता मंगेशकर
संगीतकार
- पं. हृदयनाथ मंगेशकर
नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी..

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी..
 
 
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची

तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची
गीतकार
आरती प्रभू
गायक
पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीतकार
पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट
निवडुंग

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची...

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची...
 
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची

घन ओथंबून येती...

घन ओथंबून येती...
घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

मधु इथे अन चंद्र तिथे...

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे...

 
कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा 
... रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून
जातांनाही पायभर मखमल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा मग धरासारी भिजवेल ना?
गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर 
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

सुंदर ते रूप ......

 
सुंदर ते रूप ......
सुंदर ते रूप तुझे मनोहर 
नाही दिसे परी रुतले मनात........... 

काय वर्णू ख्याती बोलण्याची 
काय सांगू मी चाल हरिणीची 
गाली खळी फुलते गुलाबाची 
सुंदर ते रूप .......

थोडसं लाजणे,थोडसं रागवणे
तरीही पुन्हा वळून तेच पाहणे 
अशी माझीच तू सुंदरी सखे 
सुंदर ते रूप.......

काय तुझा तो हळवा अबोला
काय तुझा तो लटका रुसवा
मनी नसे कधीही तो दुरावा 
सुंदर ते रूप............

हा दिखावा दाखवणे मजला 
 तुझा हा नुसताच ग बहाणा 
ओळखून आहे सखे तुजला 
सुंदर ते रूप...........

नको दूर सारू आज मजला 
साथ ना कुणाची एकट्याला 
नको फेकू काट्यांत जीवाला 
सुंदर ते रूप...............

तुझाच आहे ना मी या समया 
प्रिये सांग ना एकदा तू मजला 
साक्ष ठेवून स्वतःच्या मनाला 
सुंदर ते रूप.............

नको दाखवू मनीच्या भावना 
तरीही मी जानिल्या साऱ्या
केव्हाच पहिल्या मनी माझ्या 
सुंदर ते रूप................

वर वरले सर्व मज समजले 
अंतरी काय हे मी जाणिले 
नको समजावू शब्दात आज हे 
सुंदर ते रूप....................

वाट मी पाहीन त्याच क्षणाची 
या जन्मी मज जमले जर नाही 
तर पुढला जन्म घेईन तुजसाठी 
सुंदर ते रूप....................

रुक्मिणीच्या एका तुलसीपत्राने 
श्रीकृष्ण मनोमन आनंदे हसले 
नको स्वार्थ, फ़क़्त ते "प्रेम"जगी असुदे  
सुंदर ते रूप.

ती बघते तेव्हा..!






 
ती बघते तेव्हा..!
.
ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!" 
... 

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे 


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो 
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो 


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते 

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो 
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो 

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो  
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !

मिलन ...

 
 मिलन 

मनातल्या त्या हूर हुरीला, 
किती थांबवायचं ग..

मिलनाच्या त्या उत्कटतेला, 
किती लांबवायच ग.....

  
दररोज उद्या च्या आशेवर, 
किती जगायचं ग..


हातात रोज फोटो घेवून तुझा, 
किती पाहायचं ग ..


मनीच्या भावनांना काव्यात, 
किती गोवायचं ग ..


तुला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्यांना,
किती विचारायचं ग ..


तुझ्या घराकडे जाणाऱ्या वाटेला,  
किती बघायचं ग...

नजर..

 
नजर..
ती नजर, ती नजर, वेड जीवाला लावते
का कशी, कुठेही कधीही, भुरळ मनाला पाडते
प्रेम इथे रुजतंय, प्रेम इथे रुजतंय... 

न बोलता, न हसता, ती अशी बघते
पापण्या झुकलेल्या, अशी उचलते
धस्स मनी होतंय, धस्स मनी होतंय

ती जेव्हा हसते, अशी बघते, मन विरघळते
क्षण साठवते, सतत आठवते, स्वतःवरतीच खुश होते
मन रिमझिम भिजतंय, मन रिमझिम भिजतंय

नजर झुकवते, खळी गाली पडते, ती अशी लाजते
ती बोलली नाही जरी, नजरच सांगते 
तिचही मन बसतंय, तिचही मन बसतंय...