रविवार, २५ डिसेंबर, २०११

बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
... बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!

तुझा हात सोडून जावे कुठे?



तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?

खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!

आजहि मन माझे खूप उदास....
अजून होतो तुझ्या त्या ,
आठवणींचाच आभास ....
होत नाही आजही विश्वास....
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

ती आवडते मला, मी हि तिला आवडे...

ती आवडते मला, मी हि तिला आवडे
हे बोलण्याची गरज आम्हाला कधीच ना पडे
तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे
पण एक अनोळखी मर्यादा नेहमीच नडे

... ती सोबत असताना वाटे समयही स्तब्द व्हावा
तो एक क्षण कधीच पुढे न जावा
जगून घेतो आम्ही सर्व आयुष्य त्या क्षणात
कोणास ठाऊक काय घडणार आहे भविष्यात

तीझी सावली जाताच भासे उन्हाची झळ
ती म्हणजे... माझ्या आयुष्यातलं मृगजळ
काही नात्यांना नावांमध्ये नाहीच बांधता येत
काही नात्यांना नावांमध्ये खरच.... नाहीच बांधता येत..

मला तिला Prapose करायचय...

 
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
... मला तिला सांगायच्य तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ...
माझ्या स्वप्नातली परी म्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू .. कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्त प्रिय वाटते म्हणू ..

म्हणू तर काय म्हणू ???

रविवार, १८ डिसेंबर, २०११

फक्त तुझ्या तुझ्यासोबतच जगायचं........

 "कोण आहेस तू माझा....तुला कसं रे सांगू....?
श्वास माझा तू ...पण उत्तर शब्दात कसं मांडू?

जग माझं आता तुझ्यापासून सुरु होतं,
तुला आठवणंच माझ्या हास्याला आता पुरं होतं..
... ...
तुझ्याशिवाय जगणं आता नाही रे जमत,
तुझ्याशिवाय मन आता कुठेच नाही रमत...

अंधारलेल्या वाटेवर हात नाही सोडणार ना?
विश्वास माझा तुझ्यावरचा कधी नाही मोडणार ना?

वचन नको मला...पण साथ दे तुझी...
तुझ्या सोबत जगण्याची स्वप्न आहेत माझी..

नको हा दुरावा....आता मला सहन नाही करायचं,
ठरवलंय आता फक्त तुझ्या तुझ्यासोबतच जगायचं........

**कळलेच नाही**

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही..
.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

मी एकटाच असेन..

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..

बुधवार, ७ डिसेंबर, २०११

तू आणि तुझं सर्व विश्व...


तू आणि तुझं सर्व विश्व...

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...

तडजोड करा..

जुळवून घेणे
आणि
तडजोड करणे
ह्या दोन्ही ही गोष्टी
आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत....

जुळवून घ्या.. ... जेव्हा कोणाला तरी तुमच्या बरोबर रहावस ... वाटत,
आणि तडजोड करा.. जेव्हा तुम्हाला कोणाबरोबर तरी रहावस वाटत.......