मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

चारोळ्या..


तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले
-- शुभा


जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो
-- शुभा


मी रोज खिडकीत उभी असते
तु येतोस का ते पाहण्या साठी
ये ना कधी तरी असाच
माझं मन राखण्या साठी
-- शुभा

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

 
तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले

तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली

ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले

तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती
तरंगातूनी काय कोणता संदेश वदती

ती:
शांत पाण्याला जीवन देण्या
तरंग असले आले जन्मा
जळात ते जवळी राहून
लडीवाळ काही गोड गुपीत बोलले

तो:
फुले माळलीस तू या वेणी
गंध तयांचा गेला रानी

ती:
भ्रमर झाला बघ तो वेडा
जवळी आला रस घेण्या चुंबूनी
भ्रमर कुणी का तो नसे काही वेडा
बोल प्रितीचे मी त्यातून ऐकले

- पाभे

सोमवार, २३ जानेवारी, २०१२

मिठीत घेता धुंद अबोली ....


निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....


कवि : रुपेश सावंत

“तु प्रेम आहेस माझं”


“तु प्रेम आहेस माझं”

तु प्रेम आहेस माझं,
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..

तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..

तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
तु प्रेम आहेस माझं.....!!!!

तू बरोबर असतोस तेव्हा,

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
... फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...

आणि रोज माझ हस होत...

तुला पाहण्यासाठी,
आता माझ्या बरोबर चंद्र हि थांबतो,
तारे हि लाऊन बसतात डोळे, तुझ्या वाटेकडे,
वाराहि गाऊ लागतो, तूझ्या येण्याचे गाणे,
अन वेडे होऊन वाट पाहतो, आम्ही सारे शहाणे...
...
तू दिसताच, चंद्र हि लाजतो,
तारे हसू लागतात,
अन वारा नाचू लागतो...

मी हि हसतो, तुला पाहून ,
वार्या बरोबर नाचतो, मी हि थोडा जाऊन...
आज तरी सांगेन तुला मनातल गुपित ,
अस रोज मी ठरवतो...
पण तू समोर येताच,
कळतच नाही कधी, मी तुझ्यातच हरवतो...

रात्र निघून जाते तुझ्याशी बोलण्यात,
पण मनातल गुपित मनातच राहत...
तुला पाहून रोज माझ असच होत,
रोज ठरवतो मी बोलायचं,
अन तू समोर येताच,
शब्द गोठतात माझे,
आणि रोज माझ हस होत...
आणि रोज माझ हस होत...

ह्रषिकेश व्हटकर....

तिला सहज विचारलं

तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? 
ती म्हणाली 
माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...? 
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...? 
* *
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? ... 
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...? 
... ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का ?

आपल्याला हि कोणी तरी मिळत...

कळतच नाही कधी मनाशी मन जुळत ,
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,
... आपल्याला हि कोणी तरी मिळत...
आपल्याला हि कोणी तरी मिळत...

ह्रषिकेश व्हटकर... @>`~~

"चाहूलं...!"

मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...
जीवनात चालू आलं... माझ्या प्रियेचं पाऊलं...
रिक्त चौकट भरली... सारी सारुनिया धूळ...
गहिवरला गाभारा... असं सजलं राउळं...
... मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

ओढ लागली जीवाला... जणू पडली भुरळ...
मोहोरला रानोमाळी... एक विरक्त बकुळ...
रोमी शहारे उठवी... तिच्या आठवांचे खूळ...
स्पर्शभासाने फुलली... गोड गुलाबांची फुलं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

को-या आकाशी दाटली... गर्द ढगांची झाकोळं...
टपोर थेंब टिपायला... मनचातक व्याकूळ...
गर्दी जाहली स्वप्नांची... आतुरलं स्वप्नांकुल...
दारी उंबराही झाला... तिच्या स्वागता काकुळं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!
.........महेंद्र

मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
तू नक्कीच होशील माझी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
तू असशील माझ्या बाहूपाशी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
... माझ्या मनीच्या भावना, समजू लागतील तुलाही;
माझी स्वप्नं सत्यात उतरतील, मी वाट
पाहतोय त्या दिवसाची....
तुझ्याही मनात रुजू लागेल, प्रितीची निखळ
भावना;
मोडून बंधनं तू येशील मजपाशी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
सर्वांच्या मग अनुमतीने, नात्याला आपल्या रुप
मिळेल;
तू बनशील माझी अर्धांगी, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....
आयुष्य माझे सखे, समृध्द करशील तू सहवासाने; आमरण आपुली साथ असेल, मी वाट पाहतोय
त्या दिवसाची....