गुरुवार, २८ जून, २०१२

आज दिवस असा आहे की...

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं
एक दिवस असा होता की
... कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
एक दिवस असा होता की
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं...!

रविवार, २२ एप्रिल, २०१२

प्रेमायण..


तू म्हणजे

तू म्हणजे अशी नशा
ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला,
की ग्लास सुद्धा होई शराब !!!
तू म्हणजे अशी हट्टी की ;
आधीच घाट रस्ता
आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!!

तू म्हणजे वैशाख वणव्यात
वळवाचा पाऊस !!
तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत
आईस्क्रीम खायची हौस !!!

तू म्हणजे काळे ढग
आणि नाचणारा मोर
तू म्हणजे हळूच चिमटा
काढणारं खोडकर पोर

तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती
तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती

तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी
आणि हवासुध्दा अशी धुंद
तू म्हणजे पावसची पहिली सर,
आणि सुटलेला मातीचा गंध...

कधी कधी तू इतकी शांत इतकी गप्प...
जसा माझ्या मनानं माझ्याशीच पुकारलेला बंद
आणि आपले सगळेच वाद / संवाद ठप्प !!!

कधी तू अशी कि जशी शांत, निवांत वेळ
आणि माझा माझ्याच सावल्यांशी चाललेला खेळ !!!

रीएक्शन्स..

बॉयफ्रेंन्ड
नसलेल्या मुलीची रीएक्शन्स..

1] मी अशा भानगडीत पडतचं
नाही..
... 2] माझ्या घरचेचं हे
माझ्यासाठी महत्वाचे आहेत
त्यांच्यासमोर बॉयफ्रेंन्ड वेगेरे
कोणीचं काही नको..
 
3] सगळी पोर
हि नालायकचं असतात..
बॉयफ्रेंन्ड झाल्यानतर

मुलीची रीएक्शन्स..!

1] यार माहित नाही कसे प्रेम
झाले आता त्याच्याशिवाय दुसरं
काहीचं दिसत नाही..
 
2] घरच्यांना कसेही करून
समजवावेचं लागेल,
मी त्याला आता सोडू
शकत नाही..
 
3] तो बाकी मुलांप्रमाणे
नाही आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते..

तू बरोबर असतेस तेव्हा...

तू बरोबर असतेस तेव्हा,

खूप खूप बोलावसं वाटत,

नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...
...
तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुलाच पाहावस वाटत,

नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

खूप खूप हसावसं वाटत,

नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,

नाहीतर मनात सगळं दुखं,
दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच,
पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
जगावसं वाटत,

नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,

नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!
 
 

सकाळ सकाळी या कातरवेळी ...


 होतात तुझे मला भास्
आवाज तुझा येतो कानास

... थेंबाचा स्पर्श पानास
मिलनाची आस ही खुळी ..

भरल्या उन पावसात
पाहतो तुझ्या दर्पनात

तू माझ्या मनात
खेळुन देतेस टाळी...

धुके डोळ्यात येतात
पूसत पुसत हसतात

मी गुडुप स्वप्नात
पाहतो गालाची खळी...


सकाळ सकाळी या कातरवेळी ...

 

एक सुंदर प्रपोज-


 मुलगी- तु माझा पाठलाग
का करतो आहे?

मुलगा- जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या आईने
मला सांगितले होते नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा..


खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!


माझी आठवण तुला येईल...!!!

एक दिवस जेव्हा
माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
की माझे प्रेम कमी होईल..
... ... ... .
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी
आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल...!!!

रविवार, ८ एप्रिल, २०१२

मी तुझा निरोप घेत असताना..

मी तुझा निरोप घेत असताना

पावले माझी सतत अडली होती
....
वेडे डोळ्यांचे काय घेऊन बसलीस
...
तेव्हा तर प्रत्येक पापणी रडली होती ...
.
.
मी तुला निरोप देत असताना

मन माझे रडले होते

....
डोळ्यात नसलेले अश्रू

काळजाला भीडले होते .
.
माझ्यासाठी अडलेली तुझी पावले

एक सुख देऊन गेली ..
.
तुझ्यासाठी मी काय आहे

ते नकळत सांगून गेली ..