शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

प्रेमाची परिभाषा. . .



प्रेम ♥
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत
नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...
...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक
भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....♥♥♥

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।



रागवू नकोस मला
मनवता येणार नाही,

लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

... डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ
नाही......
असं मी म्हणतं नाही कारण.... तुझ्याशिवाय जीवनात जीवच
राहणार नाही।

गरज आहे आज मला...


गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या आधाराची

अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

...
गरज आहे आज मला....♥.
त्या तूझ्या मोहक मिठीची

दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून
टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला....♥.
त्या तुझ्या कोमल प्रीतीची

भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला....♥.
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची

सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे....♥.

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

तो बॉयफ्रेंन्ड असतो. .


 आपली चूक
असताना जो माफी मागतो,
तो प्रामाणिक असतो..
आपली चूक आहे की नाही,
याची खात्री नसतानाही जो माफी मागतो,
तो शहाणा असतो..
आपली चूक
नसतानाही जो माफी मागतो,
तो बॉयफ्रेंन्ड असतो..:p:p:p
बरोबर ना ?????

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

चारोळ्या


चारोळ्या. .





सुपर प्रेम कविता. .





 मिठीतल्या कविता..



शनिवार, १ डिसेंबर, २०१२

स्मितहास्य . .



प्रियकर :- एक सांगू

प्रेयसी :- सांगना.

प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे

प्रेयसी :- मी एक सांगू

प्रियकर :- सांगना

प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे !!! ♥

♥ Love is not taking a credit but giving a credit, is't keep loving .... ♥

प्रेमाची किंमत. .

♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥

प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात, त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत ..... मला नाही आवडत असं, अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व तिला विचारतो ह्याची किंमत किती ?


प्रेयसी :- पाचशे !!

प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :- "आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"

प्रेयसी :- पाचशेच !!

प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू, लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥

प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते. .



"एक कुटुंब गरीब होत, तरीपण ते नेहमी गरीब लोकांना मदत करायचे, हे बघून देवाला आनंद झाला व त्याने ३ सुंदर पर्या त्यांच्याकडे पाठविल्या,
बायकोने दरवाजा उघडला व त्या ३ अतिशय सुंदर पर्यांना बघून ती आश्चर्य चकित झाली, तेव्हा ....

पहिली परी :- मी प्रेम आणले आहे.
दुसरी परी :- मी पैसा आणला आहे.
तिसरी परी :- मी प्रसिद्धी आणली आहे.
आमच्यापैकी तुम्ही एकीची निवड करू शकता .........

बायकोला कोणाची निवड करावी हे सुचत नव्हते, म्हणून ती नवर्याला म्हणाली, "आपण पैसा घेऊया, आपल्याला फार गरज आहे".

नवरा :- नको !! आपण प्रसिद्धी घेऊया, म्हणजे पैसा आपोआप येईलच.

त्यावरून हे दोघे वाद घालायला लागले, ते पाहून त्यांची मुलगी रडायला लागली व म्हणाली," मला प्रेम हवे आहे, आपल्या घरात भांडणे नको"

तिचे बोलणे ऐकून सर्वांनी प्रेम-परीला आत बोलाविले ................. पण पुढे आश्चार्यची गोष्ट हि झाली कि त्या प्रेम परीबरोबर पैसा व प्रसिद्धी परी देखील आत आल्या.

त्यावर त्या कुटुंबाने विचारले असता, प्रेम-परी म्हणाली ♥ ," जर तुम्ही पैसा-परी निवडली असती तर बाकी परी निघून गेल्या असत्या, पण देवाच्या नियमा प्रमाणे जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी नको म्हणतले तरी येतेच, म्हणून ह्या दोघी माझ्या बरोबर येत आहेत" ♥ ♥ ♥

तात्पर्य :- आकाशातून परी येण हि जरी काल्पनिक गोष्ट असली तरी, "प्रेम जिथे जिथे नांदते तिथे तिथे पैसा व प्रसिद्धी देखील नांदते हे मात्र १००% खरे आहे", म्हणून सदैव चांगुलपणा अंगात ठेवून प्रेम करत रहावे"

♥ " Love is what all we need .... Keep Loving Truly ♥

माझे बाकी राहिलेले आयुष्यभर. .



"प्रेयसी :- माझ्यावर प्रेम करशील , माझे बाकी राहिलेले आयुष्यभर ? 


प्रियकर :- नाही, तुझ्यावर प्रेम करत राहेन, माझे बाकी राहिलेले आयुष्यभर"



 "To love is to have a heart; to be in love, is to make it beat." ♥