रविवार, २२ एप्रिल, २०१२

प्रेमायण..


तू म्हणजे

तू म्हणजे अशी नशा
ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला,
की ग्लास सुद्धा होई शराब !!!
तू म्हणजे अशी हट्टी की ;
आधीच घाट रस्ता
आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!!

तू म्हणजे वैशाख वणव्यात
वळवाचा पाऊस !!
तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत
आईस्क्रीम खायची हौस !!!

तू म्हणजे काळे ढग
आणि नाचणारा मोर
तू म्हणजे हळूच चिमटा
काढणारं खोडकर पोर

तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती
तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती

तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी
आणि हवासुध्दा अशी धुंद
तू म्हणजे पावसची पहिली सर,
आणि सुटलेला मातीचा गंध...

कधी कधी तू इतकी शांत इतकी गप्प...
जसा माझ्या मनानं माझ्याशीच पुकारलेला बंद
आणि आपले सगळेच वाद / संवाद ठप्प !!!

कधी तू अशी कि जशी शांत, निवांत वेळ
आणि माझा माझ्याच सावल्यांशी चाललेला खेळ !!!

रीएक्शन्स..

बॉयफ्रेंन्ड
नसलेल्या मुलीची रीएक्शन्स..

1] मी अशा भानगडीत पडतचं
नाही..
... 2] माझ्या घरचेचं हे
माझ्यासाठी महत्वाचे आहेत
त्यांच्यासमोर बॉयफ्रेंन्ड वेगेरे
कोणीचं काही नको..
 
3] सगळी पोर
हि नालायकचं असतात..
बॉयफ्रेंन्ड झाल्यानतर

मुलीची रीएक्शन्स..!

1] यार माहित नाही कसे प्रेम
झाले आता त्याच्याशिवाय दुसरं
काहीचं दिसत नाही..
 
2] घरच्यांना कसेही करून
समजवावेचं लागेल,
मी त्याला आता सोडू
शकत नाही..
 
3] तो बाकी मुलांप्रमाणे
नाही आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते..

तू बरोबर असतेस तेव्हा...

तू बरोबर असतेस तेव्हा,

खूप खूप बोलावसं वाटत,

नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...
...
तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुलाच पाहावस वाटत,

नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

खूप खूप हसावसं वाटत,

नाहीतर उदास रहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,

नाहीतर मनात सगळं दुखं,
दाबून ठेवावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,

नाहीतर खिडकीतूनच,
पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,
जगावसं वाटत,

नाहीतर जग सोडून जावस वाटत...

तू बरोबर असतेस तेव्हा,

फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,

नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...!
 
 

सकाळ सकाळी या कातरवेळी ...


 होतात तुझे मला भास्
आवाज तुझा येतो कानास

... थेंबाचा स्पर्श पानास
मिलनाची आस ही खुळी ..

भरल्या उन पावसात
पाहतो तुझ्या दर्पनात

तू माझ्या मनात
खेळुन देतेस टाळी...

धुके डोळ्यात येतात
पूसत पुसत हसतात

मी गुडुप स्वप्नात
पाहतो गालाची खळी...


सकाळ सकाळी या कातरवेळी ...

 

एक सुंदर प्रपोज-


 मुलगी- तु माझा पाठलाग
का करतो आहे?

मुलगा- जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या आईने
मला सांगितले होते नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा..


खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!


माझी आठवण तुला येईल...!!!

एक दिवस जेव्हा
माझा श्वास बंद होईल..
.
नको विचार करुस
की माझे प्रेम कमी होईल..
... ... ... .
अंतर फक्त एवढं असेल..?
.
आज मी तुझी
आठवण काढत आहे..
.
उद्या..?
.
माझी आठवण तुला येईल...!!!

रविवार, ८ एप्रिल, २०१२

मी तुझा निरोप घेत असताना..

मी तुझा निरोप घेत असताना

पावले माझी सतत अडली होती
....
वेडे डोळ्यांचे काय घेऊन बसलीस
...
तेव्हा तर प्रत्येक पापणी रडली होती ...
.
.
मी तुला निरोप देत असताना

मन माझे रडले होते

....
डोळ्यात नसलेले अश्रू

काळजाला भीडले होते .
.
माझ्यासाठी अडलेली तुझी पावले

एक सुख देऊन गेली ..
.
तुझ्यासाठी मी काय आहे

ते नकळत सांगून गेली ..

विश्वास..

♥ ऐक सुंदर प्रेम कथा जरूर वाचा ........ ♥ ♥ ♥

ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते .
कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर
त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो

मुलगा त्या खुर्ची वर बसतो
मुलगी : तू माझ्यावर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो
मुलगी : घाबरू नकोस . देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना
आपण परत एकदा प्रयत्न करून बघू

मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो )
काही कळल का तुम्हाला ?

जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसला
तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला
यालाच म्हणतात प्रेम .................

♥ म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिजे ♥

म्हटलं चला सहज एक फोन करून बघू...

म्हटलं चला सहज एक फोन करून बघू
काय कसं चाललंय,सहज विचारून बघू
महिन्यांवर महिने उलटले मधे जरी
आवाजातल्या ओलाव्यात जीव भिजवून बघू

तसं फोन करून काही बदल घडणार नव्हता
फोन करून बोलणार काय, विषय सापडत नव्हता
का त्या शब्दांसाठी मन एवढं आसुसल होतं
तिचा साधाच call , तिला फरक पडणार नव्हता

नुसतंच झुरणं झालं होतं,मागे फिरणं झालं होतं
डोळ्यातल्या डोळ्यात खेळण्यापलीकडे जास्त काही झालं नव्हतं
बोलण्याची हिंमत तुझ्या डोळ्यात हरवून बसलो होतो
हिंमत झाली जागी,पण तुला हरवून बसलो होतो

म्हटलं जावं विसरून पण number तुझा save दिसतो
एक दोन बटनांच्या अंतरावर तू उभी दिसते
विसरू तरी कसा,number delete करू कसा
नेमका ह्याच कामामध्ये mobile माझा फसतो

म्हटलं चला करूच एक, होईल काय ते बघू
आवाजातला कंप जरा hold करूनऐकू
तुझी तशीच असेल का माझी जी स्थिती
पाच-दहा मिनिटांचा गारवा, मनात साठवून बघू