शनिवार, ९ मार्च, २०१३

तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं....तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
आपण
दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून,
तोडकं मोडकं का होईना,पण
आपला दोघांचं छानसं असं घरटं बांधायचं,
दोघानी एकाच ताटात जेवायचय, ...
मग थोडसं उपाशी राहून
पन सोबत जेवताना एकमेकांना भरवत,
मग मात्र पोटभर जेवायचं,
तूला आवडत ना म्हणून एक घरटं
बांधायचं……..
थंडीत कूडकूडताना थोडी तूला थोडी मला
असं करत एकाच चादरीत झोपतांना,
तूझ्या प्रेमाच्या उबेत मात्र,
मला संपूर्ण आयूश्य घालवायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं
बांधायचं……..
खूप खूप प्रेम करतांना, थोडसं तुझ्यावर
रागवायचंय,
तूझा प्रेमात प्रत्येक दिवस
नव्या उमेदिने जगायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
तोडकं मोडकं का होईना,पण आपल्या दोघांच छानसं असं घर
बांधायचंय……….
♥♥♥