शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!

हृदयस्पर्शी कथा
ती दोघं...
त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ
काढायची..
तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण ते भांडण मिटवायच म्हणून तो
तिला सिनेमाला घेऊन गेला पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार
नव्हती.
तिचा चेहराच सांगत होता कि,
तिचा निर्णय झालेला होता..
ते घरी परतत होते.
तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच.. "मला वाटत..,
हे अस रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही..
मला वाटत आपण आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव..
मी तरी तसा निर्णय घेतलाय..
यापुढे आपण न भेटनच योग्य...!
ते ऐकून त्याला धक्काच बसला..
त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे
पाण्याने डबडबले ,
त्यान खिशात चाचपून पाहिलं.
एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले..
आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली..
थेट यांच्या गाडीवरच येऊन
आदळली..
त्या अपघातात 'तो' जागीच ठार झाला..
आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..
ते एकदम उघडून तीन पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य
लिहिलेलं होत ..
'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!

तो खरच त्याक्षणी मेला होता..
प्रेम असंही असत...
जे मागू ते देऊन मोकळ होत..
मागायचं काय, मरण कि जगण...
हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागत....!

मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी...

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड
प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच,
मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये
घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे
मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥

तुझ्याकडून शिकावं लागेलं...

तुझ्याकडे प्रेमाची
शिकवणी लावावी लागेलं
डोळ्यांनी कसं बोलावं
हे शिकावं लागेलं
जाळ कसं विणतेस
हे बघावं लागेलं
कटाक्षान कसं फसवाव
ते शिकावं लागेलं
प्रश्न हा आहे प्रिये
माझे डोळे बोलके नाहीत
तुझ्याइतके सुंदर
न जादूभरे नाहीत
तूच घे प्रिये
माझ्या मनाचा ठावं
दिसेल तुला हृदयात
तुझ्या प्रेमाचा गावं
मग तूच म्हणशील
इतकं कसं प्रेम करतोस
प्रेम कसं करावं
तुझ्याकडून शिकावं लागेलं...

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२

खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस.

खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस...... नाक उडवून, गाल फुगवून
लटकं राग धरून, ज...
ेव्हा माझ्यावर रुसुन
बसतेस..
खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस......
कधी कधी मला कोड्यात टाकतेस..
काहीच सुचत नाही, काय करावं कळतनाही कधी तर इमोशनल
अत्याचारच करतेस..
खरं सांगु तेव्हा तू खुप गोड दिसतेस......... .
काही कधी बोलतच नाहीस,
विनवण्या करुनही हसत नाहीस
स्वतः अबोल राहुन, मला मात्र बोलकंकरतेस..... खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस......... .
कधी कधी " जा !!!,मी तुझ्याशीबोलणारच नाही"
अशी गोड धमकी जेंव्हा मला देतेस.....
खरं सांगु तेँव्हा तु खुप गोड दिसतेस......... .
नाही रागावलो कधी, नाही ओरडलोतुझ्यावर कधी
,नाही वागलो मनाविरुध्द तरी " तुझं मुळी माझ्यावर प्रेमच नाही" असं
तुझ्या मैत्रीनींत खोटं खोटं सांगतफिरतेस...
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस......... .
जीव ओवाळुन टाकतो
तुझ्यावर्, फिदा होतो तुझ्या एकाअदेवर
दिवसभर भांडुन ,जेव्हा संध्याकाळीकुशीत शिरुन खुदकन हसतेस.....
खरं सांगु तेंव्हा तु खुप छान दिसतेस...

तुझी आठवण आली कि,

तुझी आठवण आली कि,
मला माझाच राग येतो..
संपले ना सर्व तुझ्याकडुन
मग असा का ञास देतोस?
नको त्या खोट्या शपथा,
...
... नको त्या सुखद आठवणी..
आठवुण सर्व काय करु
मग डोळ्यात येतं पाणी..
आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत...
तुला इतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना थोपवुन..
खोटे हसु आणायचे तरी कसे?
ते अश्रु लपवण्याच्या प्रयत्नांत..
मग मी तुलाच दोष देत राहते..
आणि या खोट्या प्रयत्नांत..
तुला आणखीनच आठवत राहते...