शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

सुंदर ते रूप ......

 
सुंदर ते रूप ......
सुंदर ते रूप तुझे मनोहर 
नाही दिसे परी रुतले मनात........... 

काय वर्णू ख्याती बोलण्याची 
काय सांगू मी चाल हरिणीची 
गाली खळी फुलते गुलाबाची 
सुंदर ते रूप .......

थोडसं लाजणे,थोडसं रागवणे
तरीही पुन्हा वळून तेच पाहणे 
अशी माझीच तू सुंदरी सखे 
सुंदर ते रूप.......

काय तुझा तो हळवा अबोला
काय तुझा तो लटका रुसवा
मनी नसे कधीही तो दुरावा 
सुंदर ते रूप............

हा दिखावा दाखवणे मजला 
 तुझा हा नुसताच ग बहाणा 
ओळखून आहे सखे तुजला 
सुंदर ते रूप...........

नको दूर सारू आज मजला 
साथ ना कुणाची एकट्याला 
नको फेकू काट्यांत जीवाला 
सुंदर ते रूप...............

तुझाच आहे ना मी या समया 
प्रिये सांग ना एकदा तू मजला 
साक्ष ठेवून स्वतःच्या मनाला 
सुंदर ते रूप.............

नको दाखवू मनीच्या भावना 
तरीही मी जानिल्या साऱ्या
केव्हाच पहिल्या मनी माझ्या 
सुंदर ते रूप................

वर वरले सर्व मज समजले 
अंतरी काय हे मी जाणिले 
नको समजावू शब्दात आज हे 
सुंदर ते रूप....................

वाट मी पाहीन त्याच क्षणाची 
या जन्मी मज जमले जर नाही 
तर पुढला जन्म घेईन तुजसाठी 
सुंदर ते रूप....................

रुक्मिणीच्या एका तुलसीपत्राने 
श्रीकृष्ण मनोमन आनंदे हसले 
नको स्वार्थ, फ़क़्त ते "प्रेम"जगी असुदे  
सुंदर ते रूप.

0 टिप्पणी(ण्या):