शनिवार, १ डिसेंबर, २०१२

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1

एक मिश्किल प्रेमकहाणी भाग 1
अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेँड्स होते,पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले,जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला,चार पाच वर्षांच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली,पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्याने तिथे ओळखीचं असं नव्हतंच कोणी.पण मुंबईत गेल्यावर कळलं कि इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे.काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्
ता शोधुन काढला.घरात प्रवेश करताच त्याला जयश्री दिसली.जयश्रीचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ त्याच्या मनात काहुर निर्माण करुन गेलं.अतुलला पाहुन जयश्रीलादेखील आश्चर्य वाटलं.पण थोड्या वेळेच्या शांतते नंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं.ती म्हणाली,आमच्या लग्नांनंतरच्या तीन वर्षांत त्यांना एका अपघातात ते गेले..
तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला..शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता.त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी त्याला सांगितली,तिला आनंदझाला.पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली,तु इथेच राहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल.पण तो म्हणाला,अगं पण तुझे mistar नाहियेत ना आता,त्यामुळे लोक उगाच गैरसमज करुन घेतील त्यामुळेनको.
अरे लोकांना हजार तोँडं असतात,पण सत्य तर एकच असतं ना?त्यामुळे तु इथे बिनधास्त राहा मी लोकांची परवाह नाही करत..
त्यानंतर ते दोघे एकत्रच राहु लागले..दोघांचेह ी workind periods जवळ जवळ same असल्याने,ते एकत्र जेवण घेऊ लागले,एकमेकांसो बत वेळ घालवु लागले.कंटाळवाणं आयुष्य जगणार्या जयश्रीच्या जीवनात रंग चढु लागला,एकमेकांसो बत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परतआल्यासारखे भासु लागले.
अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा.म्हणुन जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलवर ठेवुन जायची.नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा.
हळुहळु त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली.लोक त्यांच्या विषयी कायकाय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही.अतुल हळुहळु जयश्रीच्या प्रेमात पडला होता.शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली.जया लगेच त्याच्यावर भडकली,मी तुला फक्त एक चांगला मित्र मानत होते,पण तु असं बोलुन आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस.एका विवाहीत स्त्रिलाअसं विचारणं तुला शोभतं का अतुल?
अगं पण तुझा नवरा या जगात नाहीये,आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर...
पण मला हे मंजुर नाहीये,मी माझ्यानवर्यावर अजुनही खुप प्रेम करते,आणि मी त्याला विसरु शकत नाही..
.
ठीकेय तुझी जी इच्छा असेल ती मला मान्य आहे,असं बोलुन तो झोपी गेला.सकाळी जया उठुन त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन जॉबवर निघुन गेली.दुपारी launch time मध्ये जेव्हा ती घरी आली तेव्हा तो नाष्टा तसाच टेबलवर होता.आणि एक चिठ्ठी तिथे होती.त्यामध्ये त्याने आत्तापर्यँत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते.आणि तो तिथुन निघुन गेला होता.
तिने अतुल जिथे काम करतो तिथे त्याची चौकशी केली,पण कळलं कि अतुल राजीनामा देऊन काम सोडुन गेला आहे.
दिवसामागे दिवस जात होते,तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली.जेवताना त्याच्या बरोबर केलेली मस्ती,एक मेकांसोबतकेलेले छोटेमोठे वाद तिला आठवु लागले.हळुहळु तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत गेलं,त्याची आठवण सतावु लागली.सर्व गोष्टी समोर असायच्यापण मन सैरभैर असायचं.कशातच लक्ष लागेनासं झालं.तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीणिला सांगितली,मैत्री णीने सांगितलं की,तुझं प्रेम जडलंय त्याच्यावर.जर खरंच या परिस्थितीतुन तुला बाहेर यायचं असेल,तर अतुलशी तु लग्न करुन टाक.आणि तसंही तु या समाजाला जुमानत नाहीस,त्यामुळे त्यांची तु अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस.तिचं म्हणणं जयाला पटलं.दिवसभराची रजा टाकुन ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली.तिथे त्याची म्हातारी आई होती.याआधीही आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच.अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या,तो सकाळपासुन बाहेरच आहे,कुठे गेलाय ते नाही माहीती.हळुहळु वेळ पुढे सरकत होती,जया तिची वाट पाहत होती.जेवणेही त्यांनी उरकुन घेतली.पण अतुल अजुन आला नव्हता.सायंकाळच े चार,चाराचे पाच वाजले.दुसर्या दिवशी कामावर हजर राहायचं होतं.शेवटी वैतागुन जयाने आईँचा निरोप घेतला,आणि ती मुंबईच्या गाडीत बसली.गाडी चालु झाली,त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती.गाडीतुन जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं,जुन्या आठवणी त्याज्या झाल्या.गाडी थांबवुन ती थोडावेळ उतरली.कॉलेजचे गेट,क्लास हे बघुन आपण केलेला दंगा,मागे बसुन मैत्रीणीँच्या काढलेल्या खोडी,कॉलेजचे तास चुकवुन कॅँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवु लागल्या.
.
काय झालं जयाचं?काय अतुलचं प्रेमयशस्वी झालं?जयाला अतुलची साथ लाभली?अतुल गेला कुठे? या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर थोड्याच वेळेत ईथेच या प्रेमकथेचा उर्वरीत भाग प्रदर्शित होईल तोपर्यँत वाट पहाया कथेच्या पुढच्या भागाची.......


एक मिश्कील प्रेमकहाणी(भाग २)
या कथेचा हा दुसरा पार्ट आहे,हा वाचण्याआधी काल पोस्ट झालेली कथा"एक मिश्कील प्रेमकहाणी"ही वाचा.तरच हा भाग तुम्हाला समजेल....
part 2
त्या निश्चल स्टेजकडे पाहुन अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला,ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं.जे तिला प्रचंड आवडलं होतं.बंद वर्गाँवरून नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती,ज्याचा दरवाजा उघडा होता,तिला वाट

लं कदाचित तिथे कोणीतरी असावं.ती आत गेली,तर खिडकीतुन सुसाट येणार्या वार्याने एका बॅँचवर ठेवलेली एक notebook जिची पाने आपोआप पलटत होती.तिने ती खिडकीची दारे बंद केली,आणि ती notebook आपल्या हाती घेतली.जेव्हा तिने पाहीलं कि यात लिहीलेली कविता कुठेतरी वाचली आहे.तेव्हा तिच्या लक्षात आलं कि ही कविता अतुलनेच लिहीली होती,जेव्हा college चा शेवट दिवस होता त्याच वेळी ही कविता त्याने सर्वाँसमोर वाचली होती.त्यावेळेस तिच्या लक्षात आलं कि अतुल ईथेच कुठेतरी आहे.तिने कॉलेजभर त्याची शोधाशोधसुरु केली.तो कुठे सापडत नव्हता.शेवटी ती टेरेरेस वर त्याचा शोध घेत गेली.अतुल टेरेरेसच्या कडावंर दोन हात टेकवुन,येणार्या हवेची झुळुक डोळे झाकुन अनुभुवत होता,त्याला पाहताच जयाच्या डोळ्यातले अश्रु थांबले नाहीत.आणि आनंदाच्या भराततिने पळत जाऊन अतुलला मागुन मिठी मारली.
अतुलचे डोळे मिटलेलेच होते.तो म्हणाला,आलीस तु, किती वाट पाहीली तुझी.मला माहीती होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता.काय जादु आहे या प्रेमात....आता नाही ना सोडुन जाणार मला?
नाही रे माझ्या राजा,कधीच नाही.तु दुर गेल्यानंतर कळलं,कि तु किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या....त् यामुळे मी कधीच तुला नाही सोडुन जाणार.......
.
मित्रांनो ही होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी,अतुल ने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज,आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवसरोप होईल,रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा म्हणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याला त्याचं प्रेम मिळवुन दिलं......
तर मित्रांनो कथेतुन घ्यायचा बोधतो एवढाच की,आपण म्हणतो की "माझं या मुलीवर प्रेम आहे/मुलावर प्रेम आहे."
या वाक्यातला बाकीच्या गोष्टी ठीक आहेत हो,पण प्रेम,प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय गृहीत धरता ते महत्त्वाचं आहे."प्रेम"या शब्दात अक्षरे जरी अडीच असली तरीही,त्या अडीच अक्षरांसोबत खुपशा गोष्टी जोडलेल्या असतात,ज्यांचा आपण रिलेशनशिपमध्ये असताना कधीही विचार नाही करत.त्या गोष्टी म्हणजे,विश्वास, समजुन घेणे,वेळोवेळी प्रेमाची जाणीव करुन देणे,कठीण प्रसंगी साथ न सोडणे,त्याग,निष ्ठा,आपुलकी....
एका typical महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या हे शब्द डोक्यावरुन जातील पण खर्या प्रेमाची जाणीव असणार्याँना त्यांचा अर्थ आणि महत्त्व नक्कीच समजेल.......





0 टिप्पणी(ण्या):