रविवार, २२ मे, २०११

चारोळ्या भाग 1

प्रस्तावना 
प्रेमात 'भेट' म्हणजे एक अविस्मरणीय क्षण...
चला तर मग वाचूया भेटीवर आधारित काही चारोळ्या,कविता...

 प्रत्येक वेळी...
प्रत्येक वेळी भेटीचे वाचन मीच मागायचे का?
पहा, कधीतरी स्वताहून देता आले तर!
पाखर सुद्धा भेटतात परस्परांना ओढीन,
बघ, त्यांच्या कडून काही शिकता आले तर!

तुला भेटून मी...
तुला भेटून मी
घरी जायला निघतो
जाताना शरीर घेतो
मन मात्र तिथेच ठेवतो... 
तू समोर असलीस कि...
तू समोर असलीस कि,
मला काहीच सुचत नाही,
तुझ्या शिवाय जगण्याची
  मला कल्पना सुद्धा रुचत नाही.. 
तुझा आणि माझा एकपणा...
तुझा आणि माझा एकपणा,
कसा कालवा शब्दांना,
दोन आपल्या भिन्न आकृती,
अंतकरणात एकच प्रीती.
भाषा प्रेमाची आज मला काळात आहे...
भाषा प्रेमाची आज मला काळात आहे.,
नकळत मन माझे तुझ्या कडे वळत आहे...
दूर असूनही मन मनाशी जुळत आहे,
आठवणीतील सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळत आहे..

जीवन जगण्याची आशा आहेस तू...
जीवन जगण्याची आशा आहेस तू,
माझ्या हृदयाची राणी आहेस तू,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहेस तू,
माझ्या विचारांपेक्ष्याही  सुंदर आहेस तू...
-हर्षु जाधव

1 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

khupach chhan ahe yamdhe premabaddal barch kahi ahe