शुक्रवार, २७ मे, २०११

उखाणे...

 काही दिवसांनी तिच्या आणि त्याच्या स्वप्नातील  संसार प्रत्येक्षात थाटला जातो...
आणि लग्नाच्या या समारंभात तिने त्याची अशी नावे घेतली...




मस्त वाजतो तबला,
मस्त वाजतो विना,
......रावांचे नाव घेते वन्स मोअर्र म्हणा.



माणसाला समाधान देते देवापुढची सांजवात,
 संसाराच्य सुखी वाटचाली करिता  _ _ _ _रावांच्य हाथी दिला हाथ..


नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा




 आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास

 आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा



अमुल्य आहेत तुम्हा सर्वाचे  आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठीशी  राहोत हिच माझि मनिषा

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

बारिक मणी घरभर पसरले,
-----रावान साठी माहेर विसरले

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...रावांची सुन
 

 मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, 
 ---रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

 केळीच पान पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना लई  भारी  वाटत




शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने


संथ संथ वाहे वारा,मंद मंद चाले गाडी,
देवा सुखी ठेव ------- ची जोडी


 रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


 श्रावणात पडतात सरीवर सरी
                                                              ----- रावांचे  नाव घेताना मी होते बावरी 

 

0 टिप्पणी(ण्या):