गुरुवार, ३० जून, २०११

 डाव मांडुन भांडून मोडू नको..
गीतकार- ना. घ. देशपांडे
 गायक - सुधीर फडके
                                                                                         संगीतकार-- राम फाटक
 
डाव मांडुन भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको ...

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
डाव मोडू नको ...

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको
डाव मोडू नको ...

काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
डाव मोडू नको ...

0 टिप्पणी(ण्या):